Home /News /maharashtra /

Nagpur Crime : नागपूर हादरलं, जावायानं मध्यरात्री केली सासू-सासऱ्यांची हत्या

Nagpur Crime : नागपूर हादरलं, जावायानं मध्यरात्री केली सासू-सासऱ्यांची हत्या

नागपूरमध्ये मध्यरात्री दुहेरी हत्याकांडाची (Nagpur Double Murder) धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणातील आरोपीनं सासू आणि सासऱ्याची कुऱ्हाडीनं हत्या केली आहे.

नागपूर, 26 जून : नागपूरमध्ये मध्यरात्री दुहेरी हत्याकांडाची (Nagpur Double Murder) धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणातील आरोपीनं सासू आणि सासऱ्याची कुऱ्हाडीनं हत्या केली आहे. त्याचबरोबर पत्नी आणि मुलीलाही गंभीर जखमी केलंय. शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन परिसरातील अमर नगर भागामध्ये हा प्रकार घडला आहे. काय आहे प्रकरण? नरमू यादव असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. त्यानं कौटुंबिक वादातून हे पाऊल उचलले आहे. त्यानं भगवान  रेवारे व सासू पुष्पा  रेवारे यांची कुऱ्हाडीने वार हत्या केली. यावेळी आरोपीची पत्नी कल्पना यादव आणि मुलगी मुस्कान या गंभीर जखमी झाल्या आहेत. तर आरोपीनं मुलगा महेंद्र नरकू याला कोणतीही इजा पोहचवली नाही, अशी माहिती आहे. आरोपीचे मागील दोन-तीन दिवसांपासून पत्नीशी सतत भांडण सुरू होते. रात्री 12.30 च्या सुमारास त्याने पत्नीशी भांडण सुरु केले. तिला मारहाण केली भांडण सोडवायला आधी सासरा धावला तर त्याला कुऱ्हाडीने ठार केले नंतर घरातून पत्नीला ओढत बाहेर काढले सासू भांडण सोडवायला धावली घरासमोर रस्त्यावर  सासूला सुद्धा कुऱ्हाड व दगडाने मारून ठार केले. पत्नीच्या खांद्यावर सुद्धा कुऱ्हाडीने वार केला व दगडाने डोक्यावर मारहाण केली. भ्रष्टाचाराच्या आरोपात IAS ऑफिसरला अटक, मुलाची हत्या केल्याचा पोलिसांवर आरोप शेजारच्या लोकांनी त्यांना  सोडविण्याचा प्रयत्न केला त्यांच्या मागे सुद्धा मोठा दगड घेऊन धावला त्यामुळे हा थरार थांबला नाही. सर्व मेल्याची खात्री झाल्यावर आरोपीने स्वतः चे रक्ताने माखलेले कपडे बदलले व घरून पळून गेला त्यानंतर गावकऱ्यांनी एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली गेली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
Published by:Onkar Danke
First published:

Tags: Crime, Nagpur, Nagpur News

पुढील बातम्या