मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

अमेरिकेच्या सीमेवर 4 भारतीयांचे मृतदेह आढळल्याने खळबळ; एका नवजात बाळाचाही समावेश

अमेरिकेच्या सीमेवर 4 भारतीयांचे मृतदेह आढळल्याने खळबळ; एका नवजात बाळाचाही समावेश

या चौघांचे मृतदेह सीमेपासून 9 ते 12 मीटरच्या अंतरावर पडले होते.

या चौघांचे मृतदेह सीमेपासून 9 ते 12 मीटरच्या अंतरावर पडले होते.

या चौघांचे मृतदेह सीमेपासून 9 ते 12 मीटरच्या अंतरावर पडले होते.

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 21 जानेवारी : अमेरिका-कॅनडा (America Border) च्या सीमेवर एक धक्कादायक घटना (Shocking News) घडली आहे. भारतीय कुटुंबातील चार सदस्यांचा थंडीमुळे मृत्यू झाला आहे. यात एक नवजात बाळाचाही समावेश आहे.

या प्रकरणात मानवी तस्करीची शक्यता व्यक्त केली जात आहे. मीडियामध्ये आलेल्या वृत्तानुसार, मॅनटोबा रॉयल कॅनडियन माऊंटेड पोलिसांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, एमर्सनच्या जवळ कॅनडा-अमेरिकेच्या सीमेवर (US Canada border ) बुधवारी चार मृतदेह सापडले. ज्यात दोन वृद्धाचे तर एक तरुणाचा आणि एक नवजात बाळाचा आहे. (Shocking! 4 Indian bodies found US Canada border Including a newborn baby)

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हे मृतक भारतातून आले होते आणि कॅनडातून अमेरिकेच्या सीमेत दाखल होण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र ही घटना अत्यंत दु:खदायक आहे. या चौघांचे मृतदेह सीमेपासून 9 ते 12 मीटरच्या अंतरावर पडले होते. मॅनटोबा RCMP ला अमेरिका सीमा शुल्क आणि सीमा रक्षा विभागाकडून बुधवारी याबाबत माहिती मिळाली होती. यानुसार एमर्सनच्या जवळ लोकांचा एक समूह सीमा पार करीत अमेरिकेत दाखल झाला आहे आणि एका वयस्क व्यक्तीच्या हातात लहान मुलासाठीच्या वस्तू आहेत.

हे ही वाचा-चर्चमधील चेंगराचेंगरीत 29 जणांचा मृत्यू, दरोडेखोरांना पाहून उडाला गोंधळ

यानंतर सीमेवर शोध अभियान सुरू झालं आणि दुपारी वयस्क पुरुष, महिला आणि नवजात बाळाचा मृतदेह दिसला. तर एका लहान मुलाचा मृतदेह काही अंतरावर दिसला. तरी या प्रकरणात मानवी तस्करीच्या आरोपाखाली फ्लोरिडाच्या 47 वर्षीय स्टीव शँड याला अटक केली आहे.

First published:

Tags: America, Canada, Shocking news