Home /News /videsh /

चर्चमधील चेंगराचेंगरीत 29 जणांचा मृत्यू, दरोडेखोरांना पाहून उडाला गोंधळ

चर्चमधील चेंगराचेंगरीत 29 जणांचा मृत्यू, दरोडेखोरांना पाहून उडाला गोंधळ

चर्चेमध्ये कार्यक्रमासाठी लोक जमले असताना अचानक दरोडेखोरांचा एक गट शस्त्रं घेऊन त्यांच्या दिशेनं येताना दिसला. त्यानंतर झालेल्या धावपळीमुळे चेंगराचेंगरी होऊन 29 जणांनी आपले प्राण गमावले.

    मोन्रोव्हिया, 20 जानेवारी: लिबेरियाची राजधानी (Liberia) मोन्रोव्हियामध्ये (Monrovia) झालेल्या चेंगराचेंगरीत (Stampede) 29 जणांनी आपले प्राण गमावले (29 killed) आहेत. न्यू क्रू टाऊन परिसरातील एका चर्चमध्ये (Church) रात्रीच्या वेळी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमादरम्यान ही घटना घडल्याची माहिती लिबेरिया सरकारनं दिली आहे. अचानक काही असामाजिक घटक गर्दीत घुसल्यानंतर उडालेल्या गोंधळामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडून ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.  अशी घडली घटना लिबेरियाची राजधानी मोन्रोव्हियामध्ये रात्रीच्या वेळी एका चर्चमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शेकडो नागरिक एकत्र जमले होते. त्याच वेळी गर्दीच्या दिशेनं काही दरोडेखोर शस्त्रं घेऊन येताना दिसले. हे दरोडेखोर शस्त्रांचा वापर करून आपल्याला जखमी करतील, या भीतीने नागरिकांनी चोरांच्या विरुद्ध दिशेनं धावायला सुुरवात केली. यावेळी अनेक नागरिकांचा तोल गेला आणि ते खाली पडले. मात्र गर्दीतील नागरिक एवढे घाबरले होते की खाली पडलेल्या नागरिकांना तुडवून ते पुढे निघून गेले.  चेंगराचेंगरीत 29 जणांचा मृत्यू या घटनेत झालेल्या चेंगराचेंगरीत 29 जणांचा मृत्यू झाला आहे. नागरिक एकमेकांच्या अंगावरून धावत गेल्यामुळे अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यातील अनेकांची प्रकृती सध्या गंभीर असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. आतापर्यंत उपचारादरम्यान वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये मिळून 29 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी जाहीर केली आहे.  हे वाचा - प्रत्यक्षदर्शींच्या प्रतिक्रिया या कार्यक्रमाला हजर असणाऱ्या एक्सोडर मोरियास नावाच्या व्यक्तीनं दिलेल्या प्रतिक्रियेनुसार काही गुंड आणि दरोडेखोर आपल्या दिशेनं येत असल्याचं पाहून गर्दीच्या शेवटच्या टोकाला असणाऱ्या नागरिकांनी धावायला सुरुवात केली. अनेकांना तर ही धावाधाव का सुरु आहे, हेदेखील समजलं नव्हतं. मात्र सगळेच धावत असल्याचं पाहून तेदेखील धावू लागले. काही शस्त्रास्त्रधारी गुंडांमुळे भल्यामोठ्या गर्दीवरील नियंत्रण सुटून एकच गोंधळ निर्माण झाला. त्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Crime, Death, Weapons

    पुढील बातम्या