मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

बगदाद असो वा खुरासान, प्रत्येक ठिकाणी करू शियांचं शिरकाण! ISISचा जाहीर इशारा

बगदाद असो वा खुरासान, प्रत्येक ठिकाणी करू शियांचं शिरकाण! ISISचा जाहीर इशारा

 बगदाद असो किंवा खुरासान, प्रत्येक ठिकाणच्या (Shiya muslims will be targeted in the world warns ISIS) शिया मुस्लिमांना संपवणं हेच आपलं उद्दिष्ट असल्याची घोषणा आयसीसनं केली आहे.

    काबुल, 17 ऑक्टोबर :  बगदाद असो किंवा खुरासान, प्रत्येक ठिकाणच्या (Shiya muslims will be targeted in the world warns ISIS) शिया मुस्लिमांना संपवणं हेच आपलं उद्दिष्ट असल्याची घोषणा आयसीसनं केली आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यापासून देशातील दहशतवादी (Increase in terror acts) कारवायांमध्ये सातत्यानं वाढ होत चालली आहे. विशेषतः तालिबानला विरोध असणाऱ्या आयसिस-के या संघटनेनं आतापर्यंत अफगाणिस्तानात (Blasts in Afghanistan) अनेक बॉम्बस्फोट घडवून आणले आहेत. त्यानंतर जारी केलेल्या संदेशात जगभरातील शिया मुस्लिमांना इशारा दिला आहे. काय म्हटलंय संदेशात? जगभरातील शिया मुस्लीम हे धोकादायक असून त्यांना संपवणं हेच आपलं उद्दिष्ट असल्याचं आयसीसनं म्हटलं आहे. खामा प्रेसनं आपल्या रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार आयसीसकडून प्रकाशित होणाऱ्या अल-नबा या साप्ताहिकातून हा इशारा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे अफगाणिस्तानात राहणारे शिया मुस्लिम हा इस्लामी जगासाठी सर्वात मोठा धोका असल्याचं आयसीसनं म्हटलं आहे. शिया मशिदींवर केले होते हल्ले शुक्रवारी आयसीस-के संघटनेनं अफगाणिस्तानमधील शिया मशिदीत जोरदार बॉम्बस्फोट घडवून आणला होता. त्यात 60 पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर 80 पेक्षा अधिक शिया मुस्लीम गंभीर जखमी झाले होते. त्यापूर्वी गेल्या शुक्रवारीदेखील शिया समाजाच्या मशिदीत नमाज सुरू असताना जोरदार बॉम्बस्फोट करण्यात आला होता. त्यात 100 पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले होते. अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतरचा हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. हे वाचा - कधी काळी बेघरासाठी राहत होती एका बाळाची आई; असं विचित्र काम करून झाली कोट्यवधी शिया विरुद्ध सुन्नी वाद आयसीस संघटना ही सुन्नी मुस्लिमांची दहशतवादी संघटना असून जगातून शिया मुस्लिमांचं अस्तित्व संपवणं, हा या संघटनेचा मुख्य उद्देश असल्याचं चित्र आहे. आतापर्यंत पश्चिम आशियातील अनेक मुस्लीमबहुल देशात आयसीसनं स्फोट आणि दहशतवादी हल्ले घडवून आणले असून शिया मुस्लिमांची कत्तल केली आहे. आता पुन्ह एकदा या संघटनेनं शिया मुस्लिमांची हत्या करण्याचा इशारा दिल्यामुळे तालिबान सरकारसमोरचं आव्हान बिकट झालं आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Afghanistan, ISIS, Taliban

    पुढील बातम्या