मराठी बातम्या /बातम्या /विदेश /सेक्स वर्कर बनली सीरियल किलर; गोळ्या घालून ग्राहकांची करायची हत्या

सेक्स वर्कर बनली सीरियल किलर; गोळ्या घालून ग्राहकांची करायची हत्या

या सेक्स वर्करने अनेक ग्राहकांवर गोळी झाडून त्यांची हत्या केली.

या सेक्स वर्करने अनेक ग्राहकांवर गोळी झाडून त्यांची हत्या केली.

या सेक्स वर्करने अनेक ग्राहकांवर गोळी झाडून त्यांची हत्या केली.

वॉशिंग्टन, 12 नोव्हेंबर : अमेरिकेच्या (America News) मिशिगनमध्ये जन्माला आलेल्या एलीन वुर्नोस हिचं नाव नेटफ्लिक्सवर (Netflix) आलेल्या चित्रपटामुळे चर्चेत आलं आहे. एलीनला सात जणांची हत्या केल्याच्या आरोपाखाली मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सेक्स वर्कर असलेल्या एनीनने आपल्या 7 ग्राहकांची गोळी घालून हत्या केली होती.

मात्र हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेक युजर्सनी तिच्याविषयी सहानुभूती व्यक्त केली आहे. अनेकांचं म्हणणं आहे की, एलीनचं आयुष्य चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात आलं आहे. (Sex Worker Becomes Serial Killer Killing customers with bullets)

जाणून घ्या काय आहे प्रकरण?

एलीन वुर्नोस हिचा जन्म 1956 मध्ये झाला होता. एलीनचे आई-वडील तिच्या जन्मापूर्वीच वेगळे झाले होते. जेव्हा ती चार वर्षांची होती, तेव्हा तिला आणि भावाला आजी-आजोबांसोबत राहायला पाठवण्यात आलं होतं. किशोरावस्थेत तिने शाळा सोडली आणि त्यानंतर सेक्स वर्कर बनली.

सात जणांवर गोळी घालून केला खून

रिपोर्टनुसार, 1989-1990 मध्ये फ्लोरिडामध्ये एलीनने सात जणांची गोळी घालून हत्या केली. असा दावा केला जात आहे की, लोक तिच्यावर जबरदस्ती करीत होते, आणि सर्व हत्या स्वत:ची रक्षा करण्यासाठी करण्यात आली आहे. सातही जणं तिच्याकडे ग्राहक बनून आले होते.

हे ही वाचा-बाईकच्या हँडलमुळे तरुणीच्या प्रायव्हेट पार्टला जबर मार; जर्नलमध्ये केस दाखल

कोर्टाने सुनावला मृत्यूदंड

कोर्टाने एलीनला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. एलीनला 2002 मध्ये विषाचं इंजेक्शन देऊन मारण्यात आलं होतं.

19 वर्षे जुनी केस पुन्हा चर्चेत..

एलीन वुर्नोसच्या मृत्यूनंतर 19 वर्षांनी पुन्हा तिचं नाव चर्चेत आलं आहे. यामागे नेटफ्लिक्सवरील चित्रपट असल्याचं सांगितलं जात आहे. True Crime Show च्या दुसर्या एपिसोडमध्ये एलीनच्या गुन्ह्यासंदर्भातील घटनांबद्दल दाखविण्यात आलं आहे.

काय आहे पोलीस रेकॉर्ड..

कायदपत्रांनुसार, हत्यांपूर्वी एलीनने अनेकदा अटक करण्यात आली आहे. तिच्यावर हल्ला, सशस्त्र चोरी, कार चोरी, नशा करून गाडी चालवणे आदी कारणांसाठी अटक करण्यात आली आहे.

First published:
top videos

    Tags: America, Crime news, Sexual assault