Home /News /videsh /

बाईकच्या हँडलमुळे तरुणीच्या प्रायव्हेट पार्टला जबर मार; मेडिकल जर्नलमध्ये केस दाखल

बाईकच्या हँडलमुळे तरुणीच्या प्रायव्हेट पार्टला जबर मार; मेडिकल जर्नलमध्ये केस दाखल

तरुणीची अवस्था पाहून डॉक्टरही हैराण झाले. त्यांनी याआधी असं कधीच पाहिलं नव्हतं.

    डबलिन (Dublin), 12 नोव्हेंबर : रस्ते अपघाताच्या (Road Accident) अनेक घटना तुम्ही वाचल्या वा ऐकल्या असतील. मात्र अशा काही घटना असतात ज्याची नोंद करणे आवश्यक ठरलं. अशीच एक घटना डबलिनमध्ये घडली आहे. येथे 18 वर्षीय मुलीसोबत असा अपघात झाला जो पाहून डॉक्टरही हैराण झाले. ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये (British Medical Journal) या घटनेची नोंद करण्यात आली आहे. येथए बाईक चालवणाऱ्या एका तरुणीचा अपघात झाला. यादरम्यान बाईकचा हँडला मुलीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये (Bike Hit Vagina) घुसला. (handle of the bike hit the young womans private part hard Case filed in medical journal) योनीमार्गाच्या चारही बाजूने रक्त झालं जमा मेडिकल जर्नलमध्ये (Medical Journal) मुलीच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. मात्र तिची संपूर्ण कहाणी येथे शेअर करण्यात आली आहे. जेव्हा ती डॉक्टरकडे आली तर तिच्या योनीमार्गातून रक्तस्त्राव सुरू होता. चारही बाजूंनी सूज आली होती. डबलिनमधील रोटुंडा रुग्णालयातील (Rotunda Hospital) डॉक्टरांनी जेव्हा योगीची परिस्थिती पाहिली तर तेदेखील हैराण झाले. मुलीने सांगितलं की, तिला खूप वेदना होत आहेत. आणि लघुशंका होत नाही. हे ही वाचा-फाशीच्या आधीच कैदी निघाला कोरोना पॉझिटिव्ह; न्यायाधीशांनी घेतला हा निर्णय डॉक्टरांनी सांगितलं की, बाइकच्या हँडलमुळे मुलीच्या योनीमार्गाला धक्का बसला आहे. सुरुवातील मुलीला वाटलं की छोटीफार जखम असेल. त्यामुळे पहिले तीन दिवस तिने डॉक्टरांना दाखवलं नाही. मात्र जेव्हा वेदना वाढल्या तर ती तातडीने रुग्णालयात पोहोचली. यापूर्वी अशी जखम पाहिली नाही.. डॉक्टरांनी सांगितलं की योगी मार्गाच्या चारही बाजूने रक्त जमा झालं होतं. जेव्हा महिला बाळाला जन्म देते तेव्हा अशा प्रकारची स्थिती उद्भवते. मात्र जखमेमुळे मुलीची परिस्थिती बिकट झाली आहे. डॉक्टर एमी वॉरॉल आणि त्यांच्या टीमने मेडिकल जर्नलमध्ये या केसचा उल्लेख केला. तरुणीवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. तिला मूत्रविसर्जन करता येत नव्हते, आधी त्यासाठी औषधं देण्यात आली. या तरुणीवर तीन महिन्यांपर्यंत उपचार सुरू होते, यानंतर तिच्या प्रकृतीत सुधारण झाली.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Bike accident, PRIVATE part, Shocking news

    पुढील बातम्या