Home /News /videsh /

राष्ट्राध्यक्षपदामुळे होती सुरक्षितता; आता क्रिमिनल केस उघड झाल्या तर कसे अडकतील ट्रम्प?

राष्ट्राध्यक्षपदामुळे होती सुरक्षितता; आता क्रिमिनल केस उघड झाल्या तर कसे अडकतील ट्रम्प?

अध्यक्षपदामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना जे कायदेशीर संरक्षण मिळालं आहे ते दूर झाल्यावर कदाचित ट्रम्प यांच्याबद्दल असे काही खुलासे होऊ शकतात

    वॉशिंग्टन, 10 नोव्हेंबर : एकीकडे नेते जो बायडन (Joe Biden) हे अमेरिकेचे पुढचे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. तर दुसरीकडे सध्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना हे पद सोडावं लागणार आहे. माजी वकिल आणि कायदेतज्ज्ञांच्या हवाल्याने काही बातम्या प्रसिद्ध होत आहेत. त्यात असं म्हटलं गेलंय की जर अध्यक्षपदामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना जे कायदेशीर संरक्षण मिळालं आहे ते दूर झाल्यावर कदाचित ट्रम्प यांच्याबद्दल असे काही खुलासे होऊ शकतात, ज्यामुळे ते प्रचंड अडचणीत येऊ शकतात. जानेवारी 2017 मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून ट्रम्प यांच्या विरोधात विविध गुन्हेगारी प्रकरणांमध्ये चौकशी सुरू आहे. आणि जर या वृत्तांवर विश्वास ठेवला गेला तर बायडन यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर आणि ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस सोडल्यानंतर ट्रम्प यांना कायदेशीर लढाई खूपच महागात पडण्याची शक्यता आहे. 1 एका चौकशीतून समोर आलेल्या अनेक गोष्टी ट्रम्प आणि त्यांची फॅमिली कंपनी ट्रम्प ऑर्गनायझेशनविरुद्ध दोन वर्षांहून अधिक काळापासून गुन्ह्याचा तपास करणाऱ्या मॅनहॅटन जिल्हा अटर्नी सायरस व्हान यांच्या चौकशीत अनेक गोष्टींचे खुलासे झाले आहेत. 2016 मधील निवडणुकांपूर्वी दोन महिलांनी ट्रम्प यांच्याशी ‌लैंगिक संबंध असल्याचं सांगितलं होतं. ज्याला त्यांनी नकार दिला होता. परंतु या महिलांना ट्रम्प यांचे माजी वकील मायकल कोहेन यांनी गुप्तपणे पैसे दिल्याचं बोललं जातंय. या खटल्यामधील चौकशी अहवाल अलीकडेच कोर्टासमोर सादर करण्यात आला आहे. या तपासाचा आवाका बँक, कर, इन्शुरन्स घोटाळा आणि बेकायदेशीर धंद्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. व्हान्स यांनी ट्रम्प यांच्या गेल्या आठ वर्षांच्या टॅक्स रिटर्नची माहिती गोळा करायला सुरुवात केली आहे. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष असल्याने त्यांना असं दोषी ठरवता येणार नाही असं म्हणत न्यायालयाने व्हान्स यांच्या तपासाला दूर सारलं होतं पण आता राष्ट्राध्यक्षपद गेल्यावर हा खटला पुन्हा सुरू होऊ शकतो. 2 न्याय विभागाकडून केली जाऊ शकेल का चौकशी? अमेरिकेच्या न्याय मंत्रालय ट्रम्प यांच्या विरोधात आरोपांची चौकशी करू शकतो. न्यूयॉर्क टाइम्समधील वृत्तानुसार ट्रम्प यांनी 2016 आणि 2017 मध्ये फक्त 750 डॉलर कर भरला आहे. त्यामुळे कर बुडवल्याबद्दल त्यांची चौकशी होऊ शकते. ट्रम्प यांनी या आरोप फेटाळून मी कोट्यावधी डॉलर्स कर भरला आहे असे सांगितले आहे. याबाबत दुसरीकडे कायदेतज्ज्ञ असे म्हणतात की संपूर्ण कागदपत्र न पाहता काहीही आरोप करणे कठीण आहे. बायडन यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की न्याय विभागाला जे बरोबर वाटेल त्यांनी ती कारवाई करावी. हे ही वाचा-व्हाइट हाउस सोडताच 'या' गुन्ह्यांमुळे ट्रम्प यांची होणार जेलमध्ये रवानगी3 न्यूयॉर्क सिव्हील फ्रॉड तपास ॲटर्नी जर्नल लेटर जेम्सदेखील कर घोटाळ्याबाबत ट्रम्प यांच्याविरुद्ध चौकशी करत आहेत. ट्रम्प यांनी पैशाची बचत करण्यासाठी आणि मालमत्ता कर कमी करण्यासाठी मालमत्ता वाढवून दाखवली असल्याचे त्यांचे वकील मायकल कोहेल यांनी काँग्रेसला सांगितलं. तेव्हा डेमोक्रॅट जेम्स यांनी चौकशी सुरू केली. या राजकीय आकसाने कारवाई केली जात असल्याचं ट्रम्प ऑर्गनायझेशननी म्हटलं होतं. पण हा तपास दिवाणी पद्धतीचा असल्याने जरी ट्रम्प दोषी सिद्ध झाले तरीही त्यांना आर्थिक दंडच भरावा लागेल. 4 कॅरोल यांनी लावला बलात्काराचा आरोप एका प्रसिद्ध मासिकाच्या माजी लेखिका कॅरोल यांनी ट्रम्प यांनी 1990 साली एका डिपार्टमेंट स्टोअरमध्ये आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप लावला होता. या प्रकरणात कॅरोलने 2019 मध्ये ट्रम्पविरुद्ध मानहानीचा दावा सुद्धा केला होता. ऑगस्टमध्ये न्यायाधीशांनी या प्रकरणात खटला पुढे चालवण्याची परवानगी दिली होती. याचा अर्थ असा आहे की कॅरोलने दिलेल्या तिच्या ड्रेसच्या तुकड्यांवरून डीएनए तपासणी होऊ शकते. आता बायडन आल्याने या प्रकरणात कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. 5 विनयभंगाचं प्रकरण 2005 मध्ये ट्रम्प यांच्या रियालिटी टीव्ही शो 'द ॲप्रेंटिस' मध्ये स्पर्धक म्हणून सामील झालेली समर झेरॉव्हसने आरोप केला आहे की 2007 मध्ये एका मीटिंगच्या वेळेला ट्रम्प यांनी तिला जबरदस्ती किस केलं आणि नंतर हॉटेलमध्ये तिच्याशी लैंगिक गैरवर्तन केलं होतं. त्यावेळी ट्रम्प यांनी हा आरोप फेटाळला व जेव्हा तिने त्यांच्यावरती मानहानीचा खटला दाखल केला. या प्रकरणातही त्यांनी हेच सांगितले की ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत म्हणून त्यांच्यावर अशा खटल्यांची सुनावणी होऊ शकत नाही. परंतु आता हे पद त्यांच्या हातून गेल्यानंतर कदाचित काही प्रकरणात अडकण्याची शक्यता आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Donald Trump, US elections

    पुढील बातम्या