बीबीसीच्या रिपोर्टनुसार, ट्रम्प यांच्या कार्यकाळात झालेल्या कथित घोटाळ्यांच्या चौकशीतून असे दिसून आले आहे की अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्यावरील आरोपांची चौकशी सुरू होईल. राष्ट्रपती पदावर असल्यामुळे त्यांच्यावर खटला चालविला जाऊ शकत नाही, त्यामुळे ट्रम्प राजीनामा देण्याचे टाळत आहेत. (फोटो-AFP)
याआधी ट्रम्प यांची महाभियोगाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाली होती. मात्र या प्रकरणाची चौकशी ट्रम्प अध्यक्षपदी असताना झाली होती. न्याय विभाग वारंवार असे म्हणत आहे की अध्यक्षपदावर असताना त्यांच्यावर फौजदारी खटला चालविला जाऊ शकत नाही. डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरूद्ध कायदेशीर कारवाईचा आधार हा तपास करता येतो, असे तज्ज्ञांनी सांगितले. (फोटो-AFP)