जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / पाकच्या हाती लागला अफगणिस्तानचा सीक्रेट डेटा! कागदपत्रांनी भरलेली 3 विमान काबुलहून रवाना

पाकच्या हाती लागला अफगणिस्तानचा सीक्रेट डेटा! कागदपत्रांनी भरलेली 3 विमान काबुलहून रवाना

आपण पाहतो की विमानातील खिडक्या (Why aeroplane’s windows are round) या नेहमी गोल असतात. यामागे एक शास्त्रीय कारण आहे.

आपण पाहतो की विमानातील खिडक्या (Why aeroplane’s windows are round) या नेहमी गोल असतात. यामागे एक शास्त्रीय कारण आहे.

अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था नियंत्रित करण्याच्या उद्देशाने पाकिस्तानने तिथे आर्थिक योजनांची घोषणा केली होती. यानंतर आता अफगाणिस्तानचे कित्येक गुप्त दस्तऐवज (Afghanistan Secret data) पाकिस्तानच्या हाती लागल्याचं सूत्रांकडून समजत आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    काबुल, 11 सप्टेंबर : अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था नियंत्रित करण्याच्या उद्देशाने पाकिस्तानने तिथे आर्थिक योजनांची घोषणा केली होती. यानंतर आता अफगाणिस्तानचे कित्येक गुप्त दस्तऐवज (Afghanistan Secret data) पाकिस्तानच्या हाती लागल्याचं सूत्रांकडून समजत आहे. यांपैकी कित्येक कागदपत्रं देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय (Afghan defence important documents) महत्त्वाची आहेत. लोकांच्या मदतीसाठी पाठवण्यात आलेल्या तीन C170 विमानांतून ही कागदपत्रं पाकिस्तानला (Pakistan stole Afghan data) नेल्याचं सांगण्यात येत आहे. अफगाणिस्तानच्या माजी सुरक्षा सल्लागारांसोबत काम करणाऱ्या एका सूत्रानं सांगितलं, की पाकिस्तानची गुप्तचर एजन्सी असलेल्या आयएसआयने (ISI) ही महत्त्वाची कागदपत्रं आपल्यासोबत नेली आहेत. यांमध्ये एनडीएस क्लासिफाइड डॉक्युमेंट्स (NDS classified documents), हार्ड डिस्क आणि इतर डिजिटल रेकॉर्ड (Afghanistan digital records stolen) यांचा प्रामुख्याने समावेश आहे. आयएसआयने ही माहिती आपल्या फायद्यासाठी वापरल्यास अफगाणिस्तानला मोठा धोका उद्भवू शकतो. तसंच, यामुळे तालिबान सरकारदेखील पाकिस्तानच्या ताटाखालचं मांजर होऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. हे ही वाचा- EXCLUSIVE: तालिबानवर दबाव टाकण्यासाठी आमच्याकडे अनेक मार्ग, अमेरिकेचा इशारा अफगाणिस्तान सरकारला कल्पनाही नव्हती की तालिबान देश ताब्यात घेईल. त्यामुळेच हा सर्व डेटा नष्ट करता आला नव्हता. या डेटाची देखरेख करणारे कर्मचारीही कामावर येऊ न शकल्यामुळे हा सर्व डेटा लाइव्ह (Afghanistan defence data live) स्वरूपातच पडून होता. म्हणजेच पुन्हा कधी तालिबानच्या हातातून अफगाणिस्तान पुन्हा स्वतंत्र झाला, तरी त्याला पाकिस्तानचा धोका असणारच आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या डेटाच्या तस्करीची पूर्ण कामगिरी अफगाणिस्तानमधले पाकिस्तानी राजदूत मन्सूर अहमद (Pakistani Ambassador to Afghanistan) यांच्या देखरेखीखाली पार पडली. काही दिवसांपूर्वीच तालिबानने अफगाणिस्तानचे नवं चलन म्हणून पाकिस्तानी रुपयाचा (Taliban currency) स्वीकार केला आहे. यामुळे पाकिस्तानी रुपया मजबूत होऊन, अफगाणिस्तानमधल्या व्यापारी समुदायावर पाकिस्तानचं वर्चस्व राहणार आहे. यासोबतच काही दिवसांपूर्वी आयएसआयचे प्रमुख (ISI chief) हामिद फैजदेखील काबूल दौऱ्यावर गेले होते. युनायटेड नेशन्स (UN) आणि अमेरिकेने ज्या ‘हक्कानी नेटवर्क’ला (Hakkani Network) दहशतवादी संघटना घोषित केलं आहे, त्याला आयएसआयचं संरक्षण लाभलं आहे असं म्हणतात. यातच हामिद यांच्या काबूल दौऱ्यानंतर हक्कानी नेटवर्कचा कमांडर सिराजुद्दीन हक्कानी याला तालिबानने गृहमंत्री (Taliban Home minister) म्हणून घोषित केलं होतं. हे ही वाचा- नशीब! तालिबाननं घेतला मोठा निर्णय, ‘तो’ सोहळा केला रद्द एकूणच कोणत्याही मार्गाने पाकिस्तान तालिबानवर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे. शिवाय यासाठी देशाची गुप्तचर यंत्रणाही त्यांनी कामी लावली आहे. दरम्यान, तालिबान आज (11 सप्टेंबर) अफगाणिस्तानात आपलं सरकार औपचारिकरीत्या स्थापन करणार होतं; मात्र आज अमेरिकेतल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरच्या (9/11 attacks) हल्ल्याला 20 वर्षं पूर्ण होत असल्यामुळे हा शपथविधी सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात