जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / Titanic Submersible: टायटॅनिक पाहण्यासाठी गेलेल्या बेपत्ता पाणबुडीचा शोध सुरूच; पाण्यातून येतोय आवाज पण.., 10 अपडेट

Titanic Submersible: टायटॅनिक पाहण्यासाठी गेलेल्या बेपत्ता पाणबुडीचा शोध सुरूच; पाण्यातून येतोय आवाज पण.., 10 अपडेट

बेपत्ता पाणबुडीचा शोध सुरूच

बेपत्ता पाणबुडीचा शोध सुरूच

बेपत्ता झालेल्या पर्यटक पाणबुडीमध्ये अवघ्या काही तासांचा ऑक्सिजन शिल्लक आहे. अटलांटिक महासागराच्या पाण्याखाली आवाज ऐकू आले आहेत. अशा परिस्थितीत, हे अपेक्षित आहे की अजूनही यातील लोक जिवंत आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली 21 जून : अटलांटिक महासागरात बुडालेलं टायटॅनिक जहाज पाहण्यासाठी गेलेल्या बेपत्ता पर्यटक पाणबुडीचा शोध सुरू आहे. यूएस कोस्ट गार्डच्या म्हणण्यानुसार, टायटॅनिकच्या अवशेषाजवळ हरवलेल्या ‘सबमर्सिबल’च्या शोधादरम्यान अटलांटिक महासागराच्या पाण्याखाली येणारे आवाज ऐकू आले आहेत. अशा परिस्थितीत, हे अपेक्षित आहे की अजूनही यातील लोक जिवंत आहेत. बेपत्ता झालेल्या पर्यटक पाणबुडीमध्ये अवघ्या काही तासांचा ऑक्सिजन शिल्लक आहे. यूएस कोस्ट गार्ड, कॅनेडियन जॉइंट रेस्क्यू सेंटर आणि एक फ्रेंच संशोधन जहाज हे ऑर्का-आकाराची पाणबुडी शोधण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत. टायटॅनिक पाहण्यासाठी गेलेली पाणबुडी 2 दिवसांपासून बेपत्ता; प्रत्येकी 2 कोटी तिकीट, 5 पर्यटकांपैकी एक अरबपती शोध पथकाने सांगितले की, आतापर्यंत यातील लोक जिवंत असल्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे बेपत्ता पर्यटक पाणबुडीपर्यंत पोहोचण्यासाठी टीम सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. बचावकर्त्यांनी, सोनार तंत्रज्ञानाचा वापर करून, दोन दिवसांपूर्वी पर्यटक पाणबुडी जिथे गायब झाली होती तिथे पाण्याखाली “मोठा आवाज” देखील शोधला. अनेक अमेरिकन एजन्सी म्हणतात की दर 30 मिनिटांनी आवाजाची पुनरावृत्ती होत आहे. यूएस कोस्ट गार्डच्या म्हणण्यानुसार, जहाजावरील पाच जणांकडे फक्त 30 तासांचा ऑक्सिजन शिल्लक आहे. सिरट टायटन ही हरवलेली पाणबुडी आपत्कालीन परिस्थितीत 96 तासांपर्यंत ऑक्सिजन पुरवण्यासाठी तयार करण्यात आली आहे. यूएस कोस्ट गार्डने सांगितलं की मिशनचे ऑपरेटर, ओशनगेट एक्स्पिडिशन्स यांना या ठिकाणाची बरीच समज आहे. कार्बन फायबर आणि टायटॅनियमपासून बनलेले आणि 6.7 मीटर उंच असलेल्या हरवलेल्या टायटनला शोधण्यात आतापर्यंतचे हवाई शोध अयशस्वी ठरले आहेत. उत्तर अटलांटिकच्या 20,000 चौरस किलोमीटरचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असताना बचावकर्ते कमी दृश्यमानता आणि खराब हवामानाशी झुंज देत आहेत. टायटॅनिक तज्ञ टिम माल्टिन यांनी एनबीसी न्यूज नाऊला सांगितलं की, “तिथे खूप अंधार आहे. खूप थंडही आहे. समुद्राचा तळ चिखलाने भरलेला आहे आणि तिथे लहरी आहेत. तुम्ही तुमच्या चेहऱ्यासमोर ठेवलेला हातही पाहू शकत नाही.” या पाणबुडीमध्ये पाकिस्तानी अब्जाधीश उद्योगपती प्रिन्स दाऊद आणि त्यांचा मुलगा सुलेमान, ब्रिटिश उद्योगपती हमिश हार्डिंग यांचाही समावेश आहे. अॅक्शन एव्हिएशनचे अध्यक्ष हमिश हार्डिंग हे देखील बेपत्ता आहेत. व्हाईट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन किर्बी यांनी सांगितलं की, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन बेपत्ता पर्यटक पाणबुडीच्या शोधावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात