मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

कोट्यवधी रुपयांचं पत्र! आइन्स्टाइन यांच्या हस्ताक्षरातल्या E=mc² ला लिलिवात मिळाली एवढी किंमत

कोट्यवधी रुपयांचं पत्र! आइन्स्टाइन यांच्या हस्ताक्षरातल्या E=mc² ला लिलिवात मिळाली एवढी किंमत

जुन्या पत्राला, मग ते कितीही प्रसिद्ध व्यक्तीने लिहिलेलं असू दे आजच्या जगात किती किंमत असावी? पण विज्ञानाला आधार देणारा सिद्धांत पहिल्यांदा ज्या कागदावर उतरला तो कागद म्हणजे ते पत्र असेल तर...

जुन्या पत्राला, मग ते कितीही प्रसिद्ध व्यक्तीने लिहिलेलं असू दे आजच्या जगात किती किंमत असावी? पण विज्ञानाला आधार देणारा सिद्धांत पहिल्यांदा ज्या कागदावर उतरला तो कागद म्हणजे ते पत्र असेल तर...

जुन्या पत्राला, मग ते कितीही प्रसिद्ध व्यक्तीने लिहिलेलं असू दे आजच्या जगात किती किंमत असावी? पण विज्ञानाला आधार देणारा सिद्धांत पहिल्यांदा ज्या कागदावर उतरला तो कागद म्हणजे ते पत्र असेल तर...

बॉस्टन, 14 मे: एखाद्या जुन्या पत्राला, मग ते कितीही प्रसिद्ध व्यक्तीने लिहिलेलं असू दे आजच्या जगात किती किंमत असावी? पण विज्ञानाला कलाटणी देणारा किंवा आधार देणारा सिद्धांत पहिल्यांदा ज्या कागदावर उतरला तो कागद म्हणजे ते पत्र असेल तर? प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन (Albert Einsten) यांचं E=mc² हे समीकरण जगप्रसिद्ध आहे. स्वतः आइन्स्टाइन यांनी हाती लिहिलेल्या एका पत्रात या समीकरणाचा उल्लेख असून, त्या पत्राचा लिलाव होणार आहे. तब्बल 2,82,000 ग्रेट ब्रिटन पौंड (GBP) एवढी त्याची किंमत ठेवण्यात आली आहे.

भारतीय रुपयांत त्याचं मूल्य दोन कोटी 91 लाख 94 हजार 106 रुपये एवढं होतं. 26 ऑक्टोबर 1946 रोजी हे पत्र आइन्स्टाइन यांनी संशोधक विद्यार्थ्याला लिहिलं होतं. हे समीकरण वापरून त्याचा प्रश्न सुटू शकतो, असं आइन्स्टाइन यांनी त्या पत्रात लिहिलं होतं. आइन्स्टाइन यांनी स्वहस्ताक्षरात हे समीकरण लिहिल्याचे केवळ चारच पुरावे ज्ञात आहेत. त्या चारपैकी हे एक पत्र आहे.

कोरोनामुळं अनाथ झालेल्या मुलांना दत्तक घ्यायच्या विचारात असाल, तर असे आहेत नियम

बॉस्टनमधल्या आर. आर. ऑक्शन (R. R. Auction)यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे एक पानी पत्र असून, प्रिन्स्टन विद्यापीठाच्या (Princeton University)आइनस्टाइन यांच्या वैयक्तिक लेटरहेडवर लिहिलेलं आहे. हे पत्र या लिलावात विक्रीला ठेवण्यात आलं असून, तो लिलाव 20 मेपर्यंत सुरू राहणार आहे. या पत्रासोबत नॉन फंजिबल टोकनही (NFT) दिलं जाणार असून, 'ARTMYN' द्वारे संचलित केलाजाणारा फाइव्ह डी बायोमेट्रिक आर्ट पासपोर्टही (Art Passport)दिला जाणार आहे.

त्यामुळे मूळ पत्राशी कोणतीही छेडछाड न होण्याची खात्री देता येईल. तसंच, हे पत्र विकत घेणाऱ्या ग्राहकाला त्याद्वारे त्या पत्राची स्थिती वेळोवेळी तपासताही येईल. आर्ट पासपोर्ट हा डिजिटल पोर्टफोलिओ म्हणूनही काम करील. त्यात या पत्राशी संबंधित सर्व कागदपत्रांचा समावेश असेल,असं आर.आर. ऑक्शन या साइटने म्हटलं आहे.

Sputnik भारतात नवी लस उपलब्ध; कुणाला मिळाला पहिला डोस, किंमत किती, जाणून घ्या

आइन्स्टाइन हे जन्माने जर्मनअसलेले भौतिकशास्त्रज्ञ. प्रिन्स्टन विद्यापीठाच्या आपल्या लेटरहेडवर जर्मनभाषेत आइन्स्टाइन यांनी हे पत्र लिहिलं आहे. पोलिश-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ लुडविक सिल्बरस्टेन (Ludwik Silberstein)यांना आइन्स्टाइन यांनी हे पत्र लिहिलं आहे. त्यांनी त्याआधी एकदा आइन्स्टाइन यांच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताच्या काही भागावर आक्षेप नोंदवला होता.

'तुमच्या प्रश्नाचं उत्तर E = mc² या समीकरणाच्या आधारे सहज मिळू शकतं,' असं आइन्स्टाइन यांनी या पत्रात लिहिलं आहे.

आइन्स्टाइन आणि सिल्बरस्टेन यांच्यामध्ये वैचारिक मतभेद असले, तरी या पत्रव्यवहारानंतर सिल्बरस्टेनही आइन्स्टाइन यांच्याच मार्गाने विचार करू लागले होते. सिल्बरस्टेन आज प्रामुख्याने ओळखले जातात ते आइन्स्टाइनचेसापेक्षतावादाचे (General & Specific Relativity)सिद्धांत विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये आणण्यासाठी.

डॉ. सिल्बरस्टेन यांच्या खापरपणतूने हे पत्र लिलावासाठी ठेवलं आहे, असं डेली मेलच्या वृत्तात म्हटलं आहे.

First published:

Tags: Coronavirus, Einst