मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

कोरोनामुळं अनाथ झालेल्या मुलांना दत्तक घ्यायच्या विचारात असाल, तर असे आहेत नियम

कोरोनामुळं अनाथ झालेल्या मुलांना दत्तक घ्यायच्या विचारात असाल, तर असे आहेत नियम

हल्ली मुलांना स्वयंपाक करायची आवड लागली आहे. मुलांना जेवण बनवायचं असेल एखादी डिश करायची असेल तर, त्यांना त्यात मदत करा किंवा त्यांची मदत घ्या.

हल्ली मुलांना स्वयंपाक करायची आवड लागली आहे. मुलांना जेवण बनवायचं असेल एखादी डिश करायची असेल तर, त्यांना त्यात मदत करा किंवा त्यांची मदत घ्या.

कोरोनामुळे (Coronavirus) कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. कित्येक मुलं अनाथ झाली आहेत. अनेक जण अशा मुलांना दत्तक (Adopt children) घेण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. त्यासाठी काय आहेत नियम?

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 13 मे : अलीकडेच समोर आलेल्या एका अहवालानुसार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात (Corona second Wave) एक हजाराहून अधिक मुलं अनाथ झाली आहेत. एखादं कुटुंब कोरोनामुळं पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. मुलांना त्यांच्या आई-वडिलांचा आसरा कायमचा गमवावा लागला. जर कोणी अशा अनाथ झालेल्या मुलांना दत्तक (Adopt children) घेण्याचा विचार करत असेल तर त्यासाठीचे नियम जाणून घेऊयात.

जर तुम्हाला एखाद्या ओळखीच्या, नर्सिंग होममधील किंवा एखाद्या रुग्णालयांमधील किंवा एनजीओ(NGO)मधील एखादे मूल दत्तक घ्यायचे असल्यास त्याला आपण असेच घेऊ शकत नाही. त्यासाठी वेगळी कायदेशीर प्रक्रिया आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या अधिकृत दत्तक एजन्सीद्वारे सर्व प्रक्रिया पूर्ण करावी लागते.

भारतामध्ये CARA (Central adoption resource authority) नुसार या दत्तक प्रक्रियेची पूर्ण माहिती देण्यात आली आहे. जर तुम्हाला मूल दत्तक घ्यायचे असल्यास सर्वात प्रथम www.cara.nic.in या संकेत स्थळावर जाऊन संपूर्ण माहिती वाचून घेणे गरजेचे आहे. येथे देण्यात आलेल्या प्रक्रियेनुसारच आपण एखाद्या मुलाला दत्तक घेऊ शकतो. या संकेतस्थळावर नोंदणी शुल्क वगळता कोणतेही इतर शुल्क भरावे लागत नाहीत.

कोण मूल स्वीकारू शकेल

जर आपण मुलाला दत्तक घेण्याचा विचार केला असेल तर भविष्यात दत्तक पालकांनी शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या स्थिर आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून घरी येणाऱ्या नव्या बाळाचे आयुष्य सुखरुप असेल आणि त्याला जगण्यासाठी योग्य साधणं उपलब्ध होतील.

- विवाहित जोडप्याच्या बाबतीत, मूल दत्तक घेण्यासाठी दोन्ही पती-पत्नीची संमती आवश्यक असेल.

-एकटी महिला कोणत्याही मुलाला (मुलगी/मुलगा) दत्तक घेऊ शकते.

- एकटा पुरुष मुलगी दत्तक घेण्यास पात्र ठरणार नाही.

हे वाचा - कोण म्हणतं सलमानची जादू ओसरली? पहिल्याच दिवशी राधेनं विदेशात केली कोट्यवधींची कमाई

कमीतकमी दोन वर्षे वैवाहिक संबंध स्थिर असल्याशिवा कोणतेही जोडपे मुलाला दत्तक घेऊ शकत नाही.

संभाव्य दत्तक पालकांचे वय, नोंदणीच्या तारखेपासून, पात्रता निश्चित करण्यासाठी मोजले जाईल आणि संभाव्य दत्तक पालकांच्या वयाच्या वेगवेगळ्या वयोगटातील मुलांसाठी अर्ज करण्याची पात्रता वेगवेगळी असेल.

कोणते वय आवश्यक आहे

'कारा'च्या नियमांनुसार, मूल आणि दत्तक घेत असलेल्या कोणत्याही पालकांच्या वयातील किमान अंतर पंचवीस वर्षांपेक्षा कमी नसावं. दुसरीकडे, सावत्र आई किंवा वडील किंवा नातेवाईक यांनी दत्तक मूल घेतल्याल या प्रकरणात भविष्यातील दत्तक पालकांसाठी वयाचे निकष लागू होणार नाहीत. याशिवाय कारामध्ये विशिष्ट नियम असा आहे की, ज्या पालकांना आधीच तीन किंवा चार मुले आहेत त्यांना कोणत्याही परिस्थितीत मूल दत्तक घेता येत नाही.

First published:

Tags: Adoption, Childhood struggle, Parents and child