जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / COVID19: 30 सेकंद हा Mouthwash वापरा आणि कोरोनाला गुडबाय करा!

COVID19: 30 सेकंद हा Mouthwash वापरा आणि कोरोनाला गुडबाय करा!

COVID19: 30 सेकंद हा Mouthwash वापरा आणि कोरोनाला गुडबाय करा!

डॉक्टरांनी पेशंट्सला दवाखाण्यात प्रवेश देण्यापूर्वी अशा पद्धतीने गुळण्या करायला सांगावं असा सल्लाही देण्यात आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

सोल 9 जून: कोरोना व्हायरसवर जगभर संशोधन सुरू आहे. मात्र त्यावर अजुन औषध मिळालेलं नाही. मात्र कोरोना व्हायरसला दूर ठेवण्यासाठी अनेक पर्याय आज उपलब्ध झाले आहेत. दक्षिण कोरियाच्या युनिव्हरसिटी ऑफ मेडिसिनच्या जर्नलमध्ये नुकताच एक शोध निबंध प्रसिद्ध झाला आहे. त्यात असा दावा करण्यात आला आहे की Chlorhexidine Mouthwash वापरला तर कोरोनाव्हारसचा प्रसार रोखता येतो. दर दोन तासांनी तीस सेकंद या Mouthwashने गुळण्या केल्या तर व्हायरसचा प्रसार रोखता येतो असा दावा त्यात करण्यात आला आहे. भारतातली ICPA Health Products Ltd ही कंपनी अशा प्रकारचे Mouthwash तयार करते. 35 पेक्षा जास्त देशांमध्ये ही कंपनी आपली उत्पादनं निर्यात करते. करोनाचा व्हायरसचा सगळ्यात जास्त हा लाळेद्वारे प्रसार होतो असं आत्तापर्यंतच्या अभ्यासातून पुढे आलं आहे. त्यामुळे दर दोन तासांनी किमान तीस सेकंद या Mouthwashच्या गुळण्या केल्या तर हा प्रसार रोखता येतो असा त्यांचा दावा आहे. मात्र दोन तासांनी त्याचा प्रभाव कमी होतो. त्यामुळे दर दोन ते तीन तासांनी अशा प्रकारच्या गुळण्या कराव्यात असा सल्लाही त्यांनी दिला आहे. त्यामुळे डॉक्टरांनी पेशंट्सला दवाखाण्यात प्रवेश देण्यापूर्वी अशा पद्धतीने गुळण्या करायला सांगावं असा सल्लाही देण्यात आला आहे. तर डेंटिस्ट डॉक्टरांनी दर 15-20 मिनिटांनी अशा गुळण्या कराव्यात आणि पेशंटलाही सांगितलं पाहिज असा सल्लाही देण्यात आला आहे. दोन तास या Mouthwashचा प्रभाव राहात असल्याने प्रवासात त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. हेही वाचा -  कोरोनावर आणखी एक प्रभावी औषध, 3 दिवसांतच रुग्णांना आराम; शास्त्रज्ञांचा दावा लशीशिवाय ‘या’ देशानं कोरोनाला हरवलं! तीन महिन्यात असा झाला कोरोनामुक्त संपादन - अजय कौटिकवार

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात