जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / चीनचा खोटारडेपणा आला समोर, कोरोना संसर्गाबाबत सगळ्यात मोठा रिसर्चनं केली पोलखोल

चीनचा खोटारडेपणा आला समोर, कोरोना संसर्गाबाबत सगळ्यात मोठा रिसर्चनं केली पोलखोल

कोरोनाव्हायरस या अदृश्य रोगाशी सारं जग दोन हात करत असताना आता आणखी एक रोगाची चाहुल लाहली आहे. या आजाराने आधीच जगातील कोट्यवधी लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाव्हायरस या अदृश्य रोगाशी सारं जग दोन हात करत असताना आता आणखी एक रोगाची चाहुल लाहली आहे. या आजाराने आधीच जगातील कोट्यवधी लोकांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिकेसह कित्येक देशांनी चीननं कोरोनाबाबत खरी माहिती लपवल्याचा आरोप केला आहे. मात्र चीननं वेळोवेळी हे आरोप खोटे असल्याचं सांगितलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

लंडन, 09 जून : अमेरिका (US) आणि विशेषत: अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) चीनवर कोरोनाव्हायरस (Coronavirus) हा वुहानच्या (Wuhan) प्रयोगशाळेतून पसरल्याचा आरोप सातत्यानं केला जात आहे. दरम्यान, आता हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या संशोधनातून (Harvard medical school) असे दिसून आले आहे की ऑगस्ट महिन्यातच चीनमध्ये कोरोना पसरण्यास सुरुवात झाली. याचे पुरावे देखील सापडले आहे. दरम्यान, चीननं 31 डिसेंबर रोजी जगाला कोरोना संसर्गाची माहिती दिली होती. जगभरात कोरोनाचे जवळजवळ 70 लाखांहून अधिक रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 4 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेसह कित्येक देशांनी चीननं कोरोनाबाबत खरी माहिती लपवल्याचा आरोप केला आहे. मात्र चीननं वेळोवेळी हे आरोप खोटे असल्याचं सांगितलं आहे. मात्र हार्वर्डच्या रिसर्चमध्ये असे दिसून आले आहे की, चीनमध्ये व्हायरस डिसेंबरमध्ये नाही तर त्याआधीच पसरण्यास सुरुवात झाली होती. वाचा- 500 लोकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या धक्कादायक घटनेप्रकरणी अखेर गुन्हा दाखल सॅटेलाइट इमेजरीच्या मदतीने केला दावा  या संशोधन पथकाने, कमर्शियल सॅटेलाइट इमेजरीच्या मदतीने वुहान शहराच्या काही फोटोंचा अभ्यास केला आहे. ही चित्रे 2019 ऑगस्ट मधील आहेत. वुहान शहरातील रुग्णालयांच्या बाहेर मोठ्या संख्येने वाहने दिसत आहेत. याआधीच्या महिन्यांत आणि वुहानमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये अशी गर्दी केवळ संसर्गामुळे दिसून आली आहे. अभ्यासानुसार कोव्हिड-19 चा उद्रेक होण्यापूर्वीच चीनमध्ये त्याचा प्रसार झाला होता. चीनला नव्हती माहिती रिसर्चनुसार ही देखील शक्यता वर्तवली जात आहे की, चीनला स्वतःच याची माहिती नव्हती. संशोधनानुसार, ऑगस्टपासून वुहानच्या पाच मोठ्या रुग्णालयांच्या बाहेर वाहनांची मोठी गर्दी होती. असेही होऊ शकते की जे रुग्णालयात पोहोचले त्यांना हवामानामुळे खोकला-ताप असावा. कोरोनाची लक्षणे देखील सामान्य आहेत आणि डॉक्टरांना याबद्दल कळाले नसावे. वाचा- लक्षणं नसलेल्या रुग्णांकडून कोरोनाचा प्रसार होतो का? WHOचा नवा खुलासा रिसर्चमुळं खरी माहिती आली समोर या संशोधनाचे नेतृत्व करणारे डॉ. जॉन ब्राउनस्टीन म्हणाले की संशोधनातून बरीच मदत झाली. एका टीव्ही मुलाखतीत ते म्हणाले की व्हायरसचे उद्दीष्ट समजून घेण्यासाठी हे महत्त्वाचे आहे. ते असेही म्हणाले की, ऑक्टोबरमध्ये काहीतरी घडले होते. कोरोना विषाणूचा प्रसार होण्यापूर्वी वुहानमधील रुग्णालयात खूप गर्दी झाली होती. डिसेंबर 2019 च्या सुरूवातीस चीनने न्यूमोनियासारख्या आजाराबद्दल WHO ला सांगितले होते. 31 डिसेंबर रोजी चीनने कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावाची अधिकृत घोषणा केली. वाचा- कोरोनावर मात करतोय भारत , दिलासादायक आकडेवारी आली समोर संकलन, संपादन-प्रियांका गावडे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: corona
  • First Published :
जाहिरात
जाहिरात