कोरोना व्हायरस : 500 लोकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या धक्कादायक घटनेप्रकरणी अखेर गुन्हा दाखल

कोरोना व्हायरस : 500 लोकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या धक्कादायक घटनेप्रकरणी अखेर गुन्हा दाखल

कोरोनाबाधित रुग्णाच्या मयताला शेकडो लोकांनी हजेरी लावली. यामुळे आता अर्नाळा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • Share this:

वसई, 9 जून : वसई विरारमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्यामोठ्या झपाट्याने वाढत असताना अर्नाळा परिसरात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या परिसरातील एका कोरोनाबाधित रुग्णाच्या मयताला शेकडो लोकांनी हजेरी लावली. यामुळे आता अर्नाळा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे या रुग्णांच्या मृत्यूनंतर त्याचे कोरोना चाचणीचे अहवाल हाती आले नसतानाही रुग्णालयाने त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. नातेवाईकांनी मोठ्या गर्दीत त्यांचे अंत्यसंस्कार उरकल्यानंतर मृत व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे वसई-विरार महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त सुभाष जाधव यांनी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा केला आहे.

अर्नाळा येथे राहणारे 58 वर्षीय प्रतिष्ठित गृहस्थ यकृताच्या आजारासाठी वसईच्या कार्डिनल ग्रेसीस (बंगली)रुग्णालयात उपचार घेत होते. यावेळी रुग्णालयाने त्यांचे नमुने कोविड 19 च्या चाचणीसाठी पाठवले होते. पण त्यांचा अहवाल येण्याच्या आधीच रुग्णालयाने त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला

संबंधित व्यक्तीच्या अंत्ययात्रेला पाचशेहून अधिक जनसमुदाय उपस्थित होता. त्यामुळे वसई विरार पालिकेकडून वसई पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे.

काय आहे रुग्णालयाचं म्हणणं?

या धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आता रुग्णालयाकडून याबाबत खुलासा केला आहे. कार्डिनल ग्रेसीस रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजेश शहा यांनी आम्ही सर्व नियम पाळून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला असून मृतदेहातून कोरोनाचा प्रादुर्भाव होत नसल्याचे त्यांनी सांगितले.

संपादन - अक्षय शितोळे

First published: June 9, 2020, 8:54 AM IST

ताज्या बातम्या