मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

4 लग्न, या बॉलिवूड अभिनेत्रीसोबत अफेअर..; पुस्तकांसोबतच लव्ह लाईफमुळेही चर्चेत राहिलेत सलमान रुश्दी

4 लग्न, या बॉलिवूड अभिनेत्रीसोबत अफेअर..; पुस्तकांसोबतच लव्ह लाईफमुळेही चर्चेत राहिलेत सलमान रुश्दी

सलमान रश्दी आपल्या लेखणीमुळे जितके चर्चेत राहिले तितकेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि लग्नांमुळेही चर्चेत राहिले. सलमान रश्दी यांनी चार विवाह केले आहेत (Salman Rushdie)

सलमान रश्दी आपल्या लेखणीमुळे जितके चर्चेत राहिले तितकेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि लग्नांमुळेही चर्चेत राहिले. सलमान रश्दी यांनी चार विवाह केले आहेत (Salman Rushdie)

सलमान रश्दी आपल्या लेखणीमुळे जितके चर्चेत राहिले तितकेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि लग्नांमुळेही चर्चेत राहिले. सलमान रश्दी यांनी चार विवाह केले आहेत (Salman Rushdie)

    मुंबई 13 ऑगस्ट : मूळचे भारतीय पण परदेशात स्थायिक झालेले प्रसिद्ध लेखक सलमान रुश्दी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. एका कार्यक्रमादरम्यान त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची जगभरात चर्चा होत आहे. सलमान रश्दी आपल्या लेखणीमुळे जितके चर्चेत राहिले तितकेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि लग्नांमुळेही चर्चेत राहिले. सलमान रश्दी यांनी चार विवाह केले आहेत. क्लेरिसा लुआर्ड, मारियन विगिन्स, एलिझाबेथ वेस्ट आणि सुपरमॉडेल पद्मा लक्ष्मी यांच्यासोबत त्यांच्या लग्नाच्या आणि विभक्त झाल्याच्या बातम्याही चर्चेत होत्या. पहिला विवाहः सलमान रुश्दी यांचं पहिलं लग्न 1976 मध्ये क्लॅरिसा लुआर्डसोबत झालं होतं. त्यांना जफर नावाचा मुलगा आहे. दोघांची पहिली भेट 1969 मध्ये एका कॉन्सर्टमध्ये झाली होती. क्लॅरिसाने यांनी कारकिर्दीची सुरुवात लंडनमधील एका प्रकाशन गृहात प्रसिद्धी व्यवस्थापक म्हणून केली. कलेच्या क्षेत्रात काम करत असताना सलमान आणि क्लॅरिसा एकमेकांच्या जवळ आले आणि प्रेमात पडले. त्यांचं लग्न झालं आणि 1979 मध्ये मुलगा जफरचा जन्म झाला. काही वर्षातच दोघांमध्ये वाद होत असल्याच्या बातम्या समोर आल्या आणि 1987 मध्ये दोघंही विभक्त झाले. कॅन्सरमुळे पुढे क्लॅरिसा यांचा मृत्यू झाला. प्रसिद्ध लेखक सलमान रुश्दी यांच्यावर हल्ला करणारा संशयित अटकेत दुसरं लग्न : सलमान यांचं दुसरं लग्न 1988 मध्ये अमेरिकन कादंबरीकार मारियन विगिन्ससोबत झालं होतं. क्लॅरिसापासून वेगळं झाल्यानंतर सलमानने लंडनमध्ये विगिन्ससोबत नवी सुरुवात केली. हा तो काळ होता जेव्हा सलमान त्यांच्या पुस्तकामुळे वादात सापडले होते. इराणच्या धार्मिक नेत्याने त्यांच्या विरोधात फतवा काढला होता. या वादामुळे विगिन्स आणि सलमान बराच काळ लपून बसले होते. दोघेही जवळपास 5 वर्षे एकत्र राहिले आणि 1993 मध्ये त्यांचे मार्ग वेगळे झाले. 1993 मध्ये विगिन्स यांना त्यांच्या कादंबरीसाठी हिडिंगर काफ्का पुरस्कार मिळाला. तिसरं लग्न : सलमान यांचं तिसरं लग्न लेखिका एलिझाबेथ वेस्टसोबत झालं होतं. दोघांनी 1997 मध्ये लग्न केलं. वेल्सच्या ग्रामीण भागावर आधारित एलिझाबेथच्या पुस्तकाची खूप चर्चा झाली. सलमान आणि एलिझाबेथ वेस्ट यांनी मिररवर्क - 50 इयर्स ऑफ इंडियन रायटिंग 1947-1997 हे पुस्तक एकत्र लिहिलं. काही काळानंतर या दोघांना एक मुलगा झाला, त्याचे नाव मिलन रुश्दी. लग्नाच्या 7 वर्षानंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. 2004 मध्ये सलमान आणि एलिझाबेथचा घटस्फोट झाला. काँग्रेसमध्ये Covid 19 लाट! प्रियांकांपाठोपाठ सोनिया गांधींनाही कोरोनाची लागण चौथं आणि सर्वात जास्त चर्चेत असलेलं लग्न: सलमान यांचा चौथा विवाह सुपरमॉडेल पद्मा लक्ष्मीसोबत झाला. त्यांच्या या लग्नाची सर्वाधिक चर्चा झाली. त्यांनी एलिझाबेथपासून विभक्त झाल्यानंतर काही दिवसांनी पद्मा लक्ष्मीशी लग्न केलं. दोघांचे फोटो आणि लव्ह लाईफ जगभर चर्चेत होती. अमेरिकन मॉडेल पद्मा लक्ष्मीनेही हे पुस्तक लिहिलं जे लो-फॅट रेसिपीवर आधारित होतं. या पुस्तकामुळे त्यांचा करिअरचा आलेख झपाट्याने वाढला. पद्मा लक्ष्मीची कारकीर्द उंचावर पोहोचली आणि 2006 मध्ये त्या शेफ कुकिंग स्पर्धेच्या जज बनल्या. सलमान रुश्दीचा चौथा घटस्फोट यानंतर एकाच वर्षाने म्हणजे 2007 मध्ये झाला. सलमान यांच्याबद्दल असे अनेक लेख आहेत, ज्यात त्यांच्या आयुष्यात स्त्रियांची कमतरता कधीच नव्हती असे म्हटले आहे. असं म्हणतात की त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जादू अशी होती की, त्यांना जी स्त्री आवडायची, ती मिळायचीच. चार बायकांव्यतिरिक्त त्यांचं नाव वेळोवेळी काही महिलांशी जोडले जात राहिले. त्यांचे नाव बॉलिवूड अभिनेत्री रिया सेन हिच्यासोबतही जोडलं गेलं होतं. दोघांच्या वयात खूप फरक होता. दोघांच्या अफेअरच्या बातम्या आल्या पण हे नातं टिकलं नाही.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Attack, Marriage

    पुढील बातम्या