नवी दिल्ली 13 ऑगस्ट : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट करून ही माहिती दिली की ‘आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा कोविड-19 चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सरकारने जारी केलेल्या प्रोटोकॉलनुसार त्या आयसोलेशनमध्ये राहणार आहेत’. सोनिया गांधी यांना याआधी कोरोना झाला होता. ‘दोघांचा आवडता एकच शब्द, मंत्रिमंडळ…’ अजितदादांचा शिंदे-फडणवीसांना सणसणीत टोला 10 ऑगस्ट रोजी प्रियंका गांधी यांनीही सांगितलं होतं की त्यादेखील पुन्हा कोविड पॉझिटिव्ह झाल्या आहे.प्रियांका गांधी यांनी ट्विट करून म्हटलं होतं, की आज पुन्हा कोविडची लागण झाली आहे. मी घरी आयसोलेट राहीन आणि सर्व प्रोटोकॉलचे पालन करीन. प्रियंका गांधी 3 महिन्यांत दुसऱ्यांदा कोविड पॉझिटिव्ह झाल्या आहेत. जूनमध्ये त्यांना कोरोना झाला होता. मात्र तेव्हा सौम्य लक्षणे होती. मंगळवारी संध्याकाळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले. सोनिया गांधी यांनाही जून महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांना फंगल इन्फेक्शनही झालं होतं. त्यांना 12 जून रोजी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या नाकातून रक्त येत होतं. शिंदे गट प्रतिशिवसेनाभवन उभं करणार का? दीपक केसरकर म्हणाले…. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विट करून म्हटलं की काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांच्या प्रकृतीची काळजी वाटत आहे, त्या कोविड पॉझिटिव्ह आहेत. त्या लवकरात लवकर बऱ्या व्हाव्या अशी माझी इच्छा आहे. त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.