मराठी बातम्या /बातम्या /विदेश /Russia-Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धाचे भारतावर काय होणार परिणाम?

Russia-Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धाचे भारतावर काय होणार परिणाम?

रशियाचे अध्यक्ष  व्लादिमीर पुतिन (Russian President Vladimir Putin) यांनी युक्रेनशी युद्ध करण्याची घोषणा केली आहे. . रशिया-युक्रेन युद्ध (Russia - Ukraine War) भारतीय भूमीपेक्षा बरंच लांब सुरू आहे. पण, याचे परिणाम भारतावरही होणार आहेत.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russian President Vladimir Putin) यांनी युक्रेनशी युद्ध करण्याची घोषणा केली आहे. . रशिया-युक्रेन युद्ध (Russia - Ukraine War) भारतीय भूमीपेक्षा बरंच लांब सुरू आहे. पण, याचे परिणाम भारतावरही होणार आहेत.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russian President Vladimir Putin) यांनी युक्रेनशी युद्ध करण्याची घोषणा केली आहे. . रशिया-युक्रेन युद्ध (Russia - Ukraine War) भारतीय भूमीपेक्षा बरंच लांब सुरू आहे. पण, याचे परिणाम भारतावरही होणार आहेत.

पुढे वाचा ...

मुंबई, 24 फेब्रुवारी :  रशियाचे अध्यक्ष  व्लादिमीर पुतिन (Russian President Vladimir Putin) यांनी युक्रेनशी युद्ध करण्याची घोषणा केली आहे. गेल्या महिनाभरापासून या युद्धाची चाहूल जगाला लागली होती. हा संघर्ष टळवा यासाठी अमेरिका आणि युरोपीयन देशांनी केलेले प्रयत्न अयशस्वी झाले आहे. रशिया-युक्रेन युद्ध (Russia - Ukraine War) भारतीय भूमीपेक्षा बरंच लांब सुरू आहे. पण, याचे परिणाम भारतावरही होणार आहेत.

शेअर बाजारात घसरण

रशिया-युक्रेन युद्धाचा मोठा फटका जगभरातील शेअर बाजाराला बसला आहे. भारतीय शेअर बाजारही याला अपवाद नाही. युद्धाच्या धास्तीने गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये मंदीचे वातावरण आहे. कोरोना संकटानंतर सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेला या मंदीच्या वातावरणाचा फटका बसणार आहे.

पेट्रोल -डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ

कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींमुळे देशभरात पेट्रोल (Petrol Diesel rates) आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. रशिया-युक्रेन युद्धामुळे हे दर आणखी वाढणार आहेत. भारत आपल्या गरजेच्या 80 टक्क्यांहून अधिक तेल आयात करतो आणि तेलाच्या किमती वाढल्याचा परिणाम चालू खात्यातील तुटीवर होऊ शकतो.

तेल-गॅस पुरवठ्यावर परिणाम

रशिया-युक्रेन तणावाच्या पार्श्वभूमीवर गेल्या एका महिन्यात तेलाच्या किमती 14 टक्क्यांनी वाढल्या आहेत. परिस्थिती नियंत्रणात न राहिल्यास तेलाची किंमत प्रति बॅरल 125 डॉलरपर्यंत पोहोचू शकते. अशा स्थितीत त्याचा भारतावरही मोठा परिणाम होणार आहे.

Breaking News: युक्रेनविरुद्ध वॉर, पुतीन यांची घोषणा; कीवमध्ये अनेक Blast

गव्हाच्या किंमती वाढणार

रशिया हा जगातील पहिल्या क्रमांकाचा गहू (wheat) निर्यातदार देश आहे, तर युक्रेन हा गव्हाचा चौथा मोठा निर्यातदार आहे. एकूण जागतिक गव्हाच्या निर्यातीपैकी एक चतुर्थांश वाटा या दोन्ही देशांचा आहे. अशा परिस्थितीत युद्ध झाल्यास जगात आणि भारतात गव्हाचे भाव वाढू शकतात.

धातूच्या किमती वाढतील

रशियावरील निर्बंधांच्या भीतीने मागच्या काही आठवड्यांमध्ये ऑटोमोटिव्ह एक्झॉस्ट सिस्टम आणि मोबाइल फोनमध्ये वापरल्या जाणार्‍या पॅलेडियमची या धातूची किंमत वाढली आहे. रशिया हा जगातील सर्वात मोठा (Palladium) पॅलेडियम निर्यात करणारा देश आहे.

Russia-Ukraine Crisis: युक्रेनच्या संकटामुळे बिअर कंपन्या का आहेत चिंतेत? हे आहे कारण

रशिया-चीनची मैत्री

अमेरिकेनं युक्रेनला पाठिंबा दिला. या प्रकरणात रशियावर निर्बंध लादण्याची तयारी देखील अमेरिकेनं सुरू केलीय. अमेरिकेच्या या बंदीच्या पार्श्वभूमीवर रशिया चीनवर अधिक अवलंबून राहणार आहे. रशिया आणि चीन हे दोन देश या निमित्तानं अधिक जवळ येणार आहेत. बीजिंगमधील हिवाळी ऑलिम्पिकमध्येही याचे उदाहरण जगाला दिसले. रशिया-चीन यांची वाढती मैत्री भारतासाठी डोकेदुखी असेल.

संरक्षण करारावर परिणाम

2018 साली झालेल्या करारानुसार भारत रशियाकडून S-400 खरेदी करणार आहे. अशा स्थितीत युक्रेन आणि रशियामधील वाढलेल्या तणावामुळे अमेरिका भारतावर कठोर निर्बंध लादू शकते.

चीनवरील फोकस कमी

पॅसिफिक महासागारातील चीनची दादागिरी, तसेच भारत-चीन सीमेवरील चीनच्या मुजोरीकडे गेल्या काही वर्षात अमेरिकेचे लक्ष वेधले गेले होते. आता बदलत्या समीकरणामध्ये अमेरिका आणि युरोपीयन देशांचा चीनवरील फोकस कमी होणार आहे.  भारत-चीन सीमेवर आजही 1 लाख सैन्य तैनात आहे.

Ukraine Crisis: रशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात; रशियाकडून अनेक ठिकाणी बॉम्बहल्ले, पहिला VIDEO आला समोर

भारतीय नागरिकांची काळजी

संयुक्त राष्ट्रातील भारतीय प्रतिनिधिनं दिलेल्या माहितीनुसार युक्रेनमध्ये 20 हजारपेक्षा जास्त भारतीय नागरिक आहेत. यामध्ये मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्याचबरोबर व्यावसायिक आणि आयटी प्रोफेशनलचाही समावेश आहे. या सर्वांच्या सुरक्षेची भारताला काळजी आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरूप परत आणण्याचे काम भारत सरकारनं सुरू केलं आहे.

First published:
top videos

    Tags: India, President Vladimir Putin, Russia, Russia Ukraine, Ukraine news, Vladimir putin