कीव, 12 एप्रिल : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध (Russia-Ukraine War) सुरू होऊन 50 दिवस होत आले आहेत. आज युद्धाचा 48 वा दिवस आहे. या लढाईत युक्रेनमधील (Ukraine) अनेक शहरं उद्ध्वस्त झाली आहेत. बुचा (Bucha), मारियुपोल (Mariupol') आणि ल्विव्हमध्ये मोठा विनाश झाला आहे. बुचा येथील हत्याकांडाची छायाचित्रे समोर आल्यानंतर आता युक्रेनच्या संसदेच्या मानवाधिकार आयुक्तांनी (Humana Rights Commission in Ukraine) मोठा दावा केला आहे.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, युक्रेनच्या संसदेच्या मानवाधिकार आयुक्त ल्युडमिला डेनिसोवा यांनी सांगितलं की, 'रशियन सैनिकांनी बुचामध्ये महिला आणि तरुणींवर बलात्कार केला. तळघरात सुमारे 25 मुलींना ओलीस ठेवण्यात आलं होतं. रोज त्यांच्यावर बलात्कार होत होते. यातील बहुतांश मुली 14 ते 24 वयोगटातील आहेत. बंदी बनवलेल्या बहुतांश मुली आता गरोदर आहेत.
हे वाचा -
बापरे! 'हे' आहे जगातील सर्वात शुद्ध आणि महाग मीठ; किंमत ऐकून तोंडाची जाईल चव
डेनिसोवा यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर किमान दोन अल्पवयीन, एका 14 वर्षांच्या आणि 11 वर्षाच्या मुलीची प्रकरणं समोर आणणारी एक पोस्ट शेअर केली आहे. डेनिसोवा यांनी युरोपमधील सुरक्षा आणि सहकार्य संघटना (OSCE) आणि संयुक्त राष्ट्रांना या तथ्यांची चौकशी करण्याचे आवाहन केलं आहे.
"पृथ्वीवर किंवा नरकात अशी कोणतीही जागा नाही जिथे हे वर्णद्वेषी गुन्हेगार बदला घेण्यापासून लपून राहू शकतील," युक्रेनियन खासदार डेनिसोवा म्हणाल्या की, आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्यावरील 1949 च्या जिनिव्हा कन्व्हेन्शन अंतर्गत बलात्कार "सक्तपणे प्रतिबंधित" आहे.'
हे वाचा -
झोपडपट्टीतील आग पोहोचली थेट गोशाळेपर्यंत; भीषण आगीनं घेतला तब्बल 40 गायींचा जीव
युक्रेनच्या उपपंतप्रधानांनी दावा केला आहे की 500 हून अधिक युक्रेन महिलांना देखील रशियन सैन्याने कैद केले आहे. त्यांना वाईट वागणूक दिली जात आहे, त्यांना बसू दिले जात नाही. याशिवाय त्याचे केसही कापण्यात आले आहेत.
लोक आपला जीव गमावत आहेत आणि आम्हाला शस्त्रे मिळत नाहीत - जेलेन्स्की
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर जेलेन्स्की यांनी पुन्हा एकदा पाश्चिमात्य देशांना लक्ष्य केलं आहे. ते म्हणाले की, आम्हाला सर्व प्रकारची शस्त्रे हवी आहेत. येथे लोक मरत आहेत आणि पाश्चात्य देश शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्यास विलंब करत आहेत. जर आम्हाला शस्त्रं मिळाली तर आम्ही मारियुपोलला वाचवू शकू, असं ते म्हणाले.
बेलारूसपासून पूर्व युक्रेनमध्ये रशियन सैन्य तैनात केले जाईल
दुसरीकडे, कीव रिकामं केल्यानंतर, रशियन सैन्यानं पूर्व युक्रेनमध्ये त्यांच्या लष्करी कारवाईवर लक्ष केंद्रित केलं आहे. दरम्यान, ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयानं म्हटलंय की, बेलारूसमधून रशियन सैन्य मागे घेऊन त्यांना पूर्व युक्रेनमध्ये तैनात करण्याची तयारी सुरू आहे, जेणेकरून युक्रेनमध्ये सुरू असलेल्या लष्करी कारवाईला गती मिळू शकेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.