Home /News /videsh /

कोण आहे ही रशियन महिला, जिनं स्वत:च्या पतीला युक्रेनी महिलांवर बलात्कार करायला सांगितलं?

कोण आहे ही रशियन महिला, जिनं स्वत:च्या पतीला युक्रेनी महिलांवर बलात्कार करायला सांगितलं?

अहवालात दावा करण्यात आला आहे की रोमन आणि त्याच्या पत्नीने नकार देऊनही, दोघांचे आवाज फोन कॉल्सशी जुळले. मात्र, या दोघांवरही आतापर्यंत बलात्काराचा कोणताही आरोप नसून दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

    नवी दिल्ली, 16 एप्रिल : युक्रेनियन सुरक्षा सेवेनं (Ukrainian Security Service) एक ऑडिओ जारी केला. या फोन कॉलद्वारे एक रशियन सैनिक आपल्या पत्नीला युक्रेनी महिलांवर बलात्कार (Ukrainian women rape) करण्याची परवानगी मागत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या सैनिकाच्या पत्नीने त्याला युक्रेनी महिलांवर बलात्कार करण्यास मान्यता दिली, असंही यात म्हटलं आहे. आता एका वृत्तसंस्थेने या दोघांच्या Identity बाबत (ओळख) मोठा दावा केला आहे. रेडिओ फ्री युरोप/रेडिओ लिबर्टी (Radio Free Europe/Radio Liberty ) या यूएस सरकार-अनुदानित एजन्सीने दावा केला आहे की, या फोनकॉलमधील पुरुषाचा आवाज 27 वर्षीय रोमन बायकोव्स्कीचा आहे. तर, महिलेचा आवाज त्याची पत्नी ओल्गा बायकोव्स्कीचा आहे. युक्रेनच्या सुरक्षा सेवेने देशातील खेरसन भागातून आलेला हा कॉल इंटरसेप्ट केला होता. यामध्ये एक महिला एका पुरुषाला युक्रेनियन महिलांवर बलात्कार करण्याची परवानगी देताना ऐकू येत आहे. या पुरुषाने तशी परवानगी मागितल्यानंतर ती महिला हसली आणि म्हणाली - 'होय, मी परवानगी देते.' हे वाचा - रशियानं 'मोस्कवा'च्या विनाशाचा घेतला बदला, 'नेपच्यून' निर्मितीचा प्लँटच उडवला सोशल मीडिया अकाउंटद्वारे संपर्क साधला RFE/RL च्या रशियन सेवा आणि योजनांच्या पत्रकारांनी RFE/RL च्या युक्रेनियन सेवेसह संयुक्त तपासणी प्रकल्प आयोजित केला. युक्रेनच्या सुरक्षा सेवेने त्यांच्या सूत्रांद्वारे फोनवर बोलत असलेल्या दोन्हीकडच्या लोकांचे फोन नंबर काढले. फोन नंबरद्वारे ते रोमन आणि त्याच्या पत्नीच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोहोचले. रोमनची आई इरिना बायकोव्स्कीच्या सोशल मीडिया पोस्टने तो रशियन लष्कराची सदस्य असल्याचे उघड केले. नंतर, RFE/RL ला रोमनने सांगितले की तो रशियन सैन्याशी संबंधित आहे. त्याची नियुक्ती क्राइमीन बंदर, सेवास्तोपोल येथे झाली. मात्र, इंटरसेप्टेड फोन कॉलवर तो स्वत: असल्याचं त्यानं नाकारलं. ओल्गा बायकोव्स्कीनेदेखील कबूल केलं की तिचा पती सेवास्तोपोलमध्ये आहे. RFE/RL ने संपर्क साधला असता, ओल्गा म्हणाली की रोमन जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यानंतर तिने एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. हे वाचा - आई-वडिलांनी मुलीसाठी आयोजित केलं स्वयंवर! 14 वर्षांच्या मुलीने निवडला 'Boyfriend रोमन आणि ओल्गा यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल नाही अहवालात दावा करण्यात आला आहे की रोमन आणि त्याच्या पत्नीने नकार देऊनही, दोघांचे आवाज फोन कॉल्सशी जुळले. मात्र, या दोघांवरही आतापर्यंत बलात्काराचा कोणताही आरोप नसून दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. अशीही शक्यता आहे की, हे दोघेही फोन कॉलवर थट्टा-मस्करी करत असावेत. पण हा अहवाल अशा वेळी आला आहे, जेव्हा मोठ्या संख्येने युक्रेनियन महिला रशियन सैनिकांवर बलात्काराचा आरोप करत आहेत. मात्र, रशियाने युक्रेनच्या या आरोपांना उत्तर दिलेलं नाही. मात्र, रशियन अधिकाऱ्यांनी युक्रेनच्या नागरिकांना लक्ष्य केल्याचा इन्कार केला आहे.
    Published by:Digital Desk
    First published:

    Tags: Gang Rape, Rape, Russia Ukraine, Russia's Putin, War

    पुढील बातम्या