मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

आई-वडिलांनी मुलीसाठी आयोजित केलं स्वयंवर! 14 वर्षांच्या मुलीने निवडला 'Boyfriend'

आई-वडिलांनी मुलीसाठी आयोजित केलं स्वयंवर! 14 वर्षांच्या मुलीने निवडला 'Boyfriend'

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

मुलीची आई लुआनने असंही म्हटलंय की, 'प्रिसिल्ला आता या मुलासोबत साखरपुडा (engagement) करेल आणि ती 25 वर्षांची झाल्यावर लग्न करेल. प्रिसिल्लाची याबाबत कोणतीही तक्रार नाही. ती गृहिणीची (house wife) भूमिका साकारण्यासाठी उत्सुक आहे.'

    नवी दिल्ली, 15 एप्रिल - काही वर्षांपूर्वी अशी स्थिती होती की, मुला-मुलींसाठी त्यांचे आई-वडील आणि इतर नातेवाईक भावी वधू किंवा वर निवडत असत. त्यापूर्वीच्या काळात मोठ-मोठ्या राजे-रजवाड्यांनी त्यांच्या मुलींसाठी स्वयंवर आयोजित केल्याचंही आपण वाचलेलं आहे. आताच्या काळात मुले-मुली स्वतःच आपला जोडीदार निवडत आहेत. मात्र, आजही काही जमातींमध्ये मुलींसाठी स्वयंवर आयोजन करण्याची पद्धत आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? नुकतीच एक मुलगी वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी तिच्या भावी पतीला भेटली. तिच्या पालकांनी तिला एका पार्टीत पाठवलं होतं. तिथं तिला तिच्या स्वप्नातला राजकुमार भेटला. ही मुलगी अमेरिकेतल्या जिप्सी (Gypsy) या भटक्या जमातीतली असून ती आई-वडिलांसोबत जिप्सींच्या वस्तीवर राहते. त्यांच्या समाजात अशाच प्रकारे लग्न करण्याची संस्कृती आहे. टीव्ही शोमध्ये झालेल्या एका मुलाखतीत मुलीने आणि तिच्या पालकांनी याचा खुलासा केला आहे. 'द सन'च्या रिपोर्टनुसार, या मुलीचे नाव प्रिसिल्ला (Priscilla) आहे. ती अमेरिकेतल्या जॉर्जियामध्ये वडील पॅट बेबी आणि आई लुआन यांच्यासोबत त्यांच्या तांड्यामध्ये (वस्ती) राहते. वयाच्या 12 व्या वर्षीच प्रिसिल्लाने शाळा सोडली. तिची कथा नुकतीच TLC चॅनलच्या टीव्ही शोमध्ये (जिप्सी ब्राइड्स यूएस - Gypsy Brides US) दाखवण्यात आली. हे वाचा - जगातल्या या देशात सलग 13व्या वर्षी दुष्काळ, पाणी मिळतंय रेशनिंगवर PHOTOS ज्या समाजात प्रिसिल्ला येते, त्या समाजातील लोक भटक्या जमातीतले असून ते जगण्यासाठी एका ठिकाणाहून दुसरीकडे जात राहतात. प्रिसिल्लाची आई लुआन म्हणते- 'आमच्या संस्कृतीत स्त्रिया घरातच राहतात आणि पतीची काळजी घेतात. हे आमचं काम आहे आणि अशा प्रकारे मी प्रिसिल्लाला लहानपणापासून वाढवलं आहे.' प्रिसिल्लालाही आपली संस्कृती पाळायची होती, असं तिचं म्हणणं आहे. त्यामुळेच तिला हॅलोवीनच्या (Halloween) एका पार्टीत पाठवण्यात आलं, जेणेकरून ती तिथे आपला आवडता जीवनसाथी निवडू शकेल. मुलीची आई लुआनने असंही म्हटलंय की, 'प्रिसिल्ला आता या मुलासोबत साखरपुडा (engagement) करेल आणि ती 25 वर्षांची झाल्यावर लग्न करेल. प्रिसिल्लाची याबाबत कोणतीही तक्रार नाही. ती गृहिणीची (house wife) भूमिका साकारण्यासाठी उत्सुक आहे.' हे वाचा - Russia-Ukraine युद्धामुळे विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थेवर भयंकर परिणाम? प्रिसिल्लाच्या पालकांनी गेल्या वर्षी हॅलोविनची पार्टी ठेवली होती. यामध्ये त्यांच्या समाजातल्या तरुणांना आमंत्रित करण्यात आलं होतं. या पार्टीत त्यांनी प्रिसिलियाला तिच्या आवडीनुसार 'वर' निवडण्याची संधी दिली. पार्टीच्या दिवशी, प्रिसिल्लाने खूप भारी ड्रेस परिधान केला होता. अनेक मुलं तिच्यावर फिदा झाली. मात्र, या पार्टीत प्रिसिल्लाने जिमी (Jimmy) नावाच्या मुलाची जीवनसाथी म्हणून निवड केली. प्रिसिलियाचे वडील पॅट बेबी म्हणतात की, त्यांना त्यांच्या मुलीसाठी एक चांगला मुलगा हवा होता आणि जिमी हा चांगला मुलगा आहे.
    Published by:Digital Desk
    First published:

    Tags: Boyfriend, Bride, Bridegroom, Engagement, Girlfriend, Marriage

    पुढील बातम्या