बुखारेस्ट (रोमानिया) 2 मार्च : रशियाने युक्रेनवर केलेल्या बॉम्बफेकीमुळे परिस्थितीत दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. प्रत्येकजण जीव वाचवण्यासाठी धडपडताना दिसत आहे. अशा कठीण काळात भारताच्या तिरंगा ध्वजामुळे तिथे अडकलेल्या भारतीय नागरिकांचे प्राण तर वाचलेच, पण पाकिस्तान आणि तुर्कस्तानचे (Pakistani Students in Ukraine) नागरिकही युद्धग्रस्त देशातून बाहेर पडण्यात यशस्वी झाले. युक्रेनपासून ते रोमानियाच्या बुखारेस्ट शहरातील भारतीय विद्यार्थ्यांनी जे सांगितले त्यामुळे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल. भारतीयांनी नोंदवले की तिरंग्याने त्यांना अनेक चेक पॉईंट सुरक्षितपणे पार करण्यास मदत केली तर काही पाकिस्तानी आणि तुर्की विद्यार्थ्यांनाही. भारतीय तिरंग्यामुळे या विद्यार्थ्यांना चेक पॉईंट सुरक्षितपणे पार करण्यास मदत झाली. युक्रेनमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना घरी आणण्यासाठी भारत सरकार ऑपरेशन गंगा राबवत आहे. अशा परिस्थितीत युक्रेनमधून रोमानिया शहरात पोहोचलेल्या या भारतीय विद्यार्थ्यांना विशेष विमानाने आणले जात आहे. युक्रेनच्या शेजारील देशांमधून एअर इंडिया, स्पाइस जेट आणि इंडिगोची विमाने सातत्याने भारतात येत आहेत. तिरंगा आला धावून.. युद्धभूमीत भारताचा तिरंगा भारतीय विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून आला. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे कीव्हमधून हे विद्यार्थी मोल्डोवा या देशाच्या सीमेकडे निघाले होते. या विद्यार्थ्यांना भारताचा झेंडा बसवर लावण्याची सूचना करण्यात आली. त्यावर विद्यार्थ्यांनी तातडीने बाजारात धाव घेत तिरंग्याचे रंग मिळवले, भारताचे कापडी झेंडे रंगवण्यात आले. आणि ते बसच्या पुढे फडकवण्यात आले. पुतीन यांच्या पक्षाचे बिहारी आमदार म्हणतात रशियाचा युक्रेनवरील हल्ला योग्यचं! पाकिस्तानी विद्यार्थ्यांनाही तिरंग्याचा आसरा ते म्हणाले की, काही पाकिस्तानी आणि तुर्की विद्यार्थ्यांनीही भारतीय झेंडे घेऊन चौक्या ओलांडल्या. एका भारतीय विद्यार्थ्याने सांगितले की, अशा वेळी भारताच्या तिरंगा ध्वजाने पाकिस्तानी आणि तुर्की विद्यार्थ्यांना खूप मदत केली. त्यांनी सांगितले की, पाकिस्तान आणि तुर्कीचे विद्यार्थीही हातात भारताचा तिरंगा घेऊन आले होते. ओडेसातील हे विद्यार्थी मोल्दोव्हाहून रोमानियाला पोहोचले. भारताच्या झेंड्यामुळे पाकिस्तानींचाही जीव वाचला. VIDEO काढत असतानाच रशियन टँकचा हल्ला; व्यक्तीने डोळ्यासमोर पाहिला मृत्यू एका विद्यार्थ्याने सांगितलं, ‘आम्ही ओडेसा इथून बस बुक केली आणि मोल्डोव्हा सीमेवर पोहोचलो. मोल्डोव्हाचे नागरिक चांगले आहेत. त्यांनी आम्हाला मोफत राहण्याची सोय केली आणि आम्हाला रोमानियाला पोहोचता यावे म्हणून टॅक्सी आणि बसची व्यवस्था केली. भारतीय विद्यार्थ्यांनी सांगितले की, भारतीय दूतावासाने आधीच व्यवस्था केल्यामुळे त्यांना मोल्डोव्हामध्ये फारशी समस्या आली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.