मॉस्को, 2 मार्च : रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर जगभरातील अनेक देशांनी याचा विरोध केला आहे. रशियातही काही ठिकाणी याला विरोध होत आहे. अशा परिस्थितीत रशियाचे (Russia) अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्या पक्षात सहभागी झालेले भारतीय वंशाचे डॉक्टर अभय कुमार सिंग (Abhay Kumar Singh) यांनी युक्रेनवरील हल्ल्याचे समर्थन केले आहे. यावेळी त्यांनी सध्याच्या परिस्थितीची तुलना भारत आणि चीनमधील स्थितीशी केली. विशेष बाब म्हणजे अभय कुमार सिंग पुतिन यांच्या युनायटेड रशिया पक्षाचे डेप्युटी (भारतातील आमदार समतुल्य) आहेत. रशियाने मंगळवारी युक्रेनच्या दाट लोकवस्तीच्या शहरांमध्ये हल्ले तीव्र केले.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, अभय कुमार सिंग रशियाच्या युक्रेनविरोधातील कारवाईच्या बाजूने उभे आहेत. युक्रेनला युद्धाचा निर्णय घेण्याआधी चर्चेसाठी अनेक संधी देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. भारताचा उल्लेख करत ते म्हणाले, की चीन बांगलादेशमध्ये लष्करी तळ उभारत असेल तर परिस्थिती काय होईल? असे सांगितले. इंडिया टुडेशी झालेल्या संभाषणात ते म्हणाले, "जर युक्रेन नाटोमध्ये सामील झाले तर नाटोचे सैन्य आमच्या जवळ येईल, कारण युक्रेन हा आमचा शेजारी आहे आणि ते कराराचे उल्लंघन असेल."
अभय कुमार सिंह म्हणाले की, रशियाचे राष्ट्राध्यक्ष आणि संसदेकडे युक्रेनविरुद्ध युद्ध करण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र, यावेळी त्यांनी युक्रेनवर अण्वस्त्र हल्ल्याची चर्चा नाकारली आहे. दुसर्या देशाने रशियावर हल्ला केला आणि त्याला प्रत्युत्तर द्यायचे असेल तरच अण्वस्त्र कवायती केल्या जात असल्याची पुतिन यांनी घोषणा केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
बुखारेस्ट विमानतळावर ज्योतिरादित्य सिंधियांनी साधला मराठीत संवाद, VIDEO
डॉ. अभय कुमार सिंह कोण आहेत?
सिंह यांचा जन्म बिहारमधील पाटणा येथे झाला. 1991 मध्ये ते वैद्यकशास्त्र शिकण्यासाठी रशियाला गेले. यानंतर ते भारतात आले आणि डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करू लागले. पण, नंतर ते पुन्हा रशियात गेले. तिथे त्यांनी औषधांचा व्यवसाय सुरू केला. ते 2015 मध्ये पुतिनच्या पक्षात सामील झाले. कुर्स्कमधून 2018 च्या प्रांतीय निवडणुकीत ते विजयी झाले.
बायडेन यांचा इशारा
अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी त्यांच्या पहिल्या स्टेट ऑफ द युनियन भाषणात त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर युक्रेन विरुद्ध "पूर्वनियोजित आणि अप्रत्यक्ष" युद्ध पुकारल्याचा आरोप केला. ते म्हणाले, की अमेरिका त्यांच्यासमोरील आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार आहे. "आमच्या संपूर्ण इतिहासात, आम्ही धडा शिकलोय की जेव्हा हुकूमशहा त्यांच्या आक्रमकतेची किंमत चुकवत नाहीत, तेव्हा ते अधिक अराजकता पसरवतात." ते पुढे जात राहतात आणि अमेरिका आणि जगाला धोका वाढत जातो.
कीवमधून बाहेर पडलेत सगळे भारतीय; भारतात परत आणण्यासाठी आहे असं नियोजन
पुतिन यांची खिल्ली उडवत बायडेन म्हणाले, "म्हणूनच दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपमध्ये शांतता आणि स्थैर्य सुनिश्चित करण्यासाठी नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO) ची स्थापना करण्यात आली." अमेरिकेसह इतर 29 देश त्याचे सदस्य आहेत. अमेरिकन मुत्सद्देगिरी महत्त्वाची आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Russia Ukraine