कीव, 24 फेब्रुवारी : युक्रेन (Ukraine) आणि रशिया (Russia) यांच्यात गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू असलेल्या वादाचे पर्यवर्सन अखेर युद्धात झाले आहे. युक्रेन (Ukraine) आणि रशिया (Russia) यांच्यातील युद्धाने जग ढवळून निघाले आहे. युक्रेनमधील जवळपास प्रत्येक शहर युद्धाच्या विळख्यात आहे. रशियाने एकाच वेळी युक्रेनमधील अनेक शहरांवर हल्ले केले आहेत. क्षेपणास्त्र ते बॉम्बस्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. रशियन रणगाडेही युक्रेनमध्ये घुसले आहेत. युक्रेनमध्ये अनेक भारतीय देखील अडकले आहेत, या पार्श्वभूमीवर युक्रेनमधील भारतीय राजदूतांनी एक निवेदन जारी केले आहे. पार्थ सत्पथी म्हणाले, कीवमधील दूतावास सुरू असून कार्यरत आहे. या कठीण परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी आम्ही मिशन मोडवर काम करत आहोत. ते म्हणाले, परिस्थिती तणावपूर्ण असून हवाई क्षेत्रही बंद आहे. तुम्ही जिथे असाल तिथेच राहा. कठीण परिस्थिती सोडवण्यासाठी पावले उचलली जात आहेत. रिपोर्टिंग दरम्यान आला रशियाच्या Fighter Jet चा भयंकर आवाज, पाहा LIVE VIDEO युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या प्रकरणावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, केंद्र सरकारने आधीच सल्लागार जारी केला आहे. केंद्राने तिथे विमाने पाठवली आहेत पण माझ्या माहितीनुसार विमान तिथे उतरू शकत नाही. सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. परिस्थिती विचित्र आहे, यात शंका नाही. युक्रेन-रशिया मुद्द्यावर राजनाथ सिंह म्हणाले, भारताला शांतता हवी आहे, हा प्रश्न चर्चेने सोडवला पाहिजे, युद्धाची परिस्थिती निर्माण होता कामा नये. दुसरीकडे परराष्ट्र मंत्रालय युक्रेनमधून विद्यार्थ्यांसह सुमारे 18,000 भारतीयांना परत आणण्यासाठी पावले उचलत आहे. युक्रेनमधील हवाई क्षेत्र बंद आहे, त्यामुळे भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री व्ही मुरलीधरन म्हणाले, केंद्र सरकार सर्व भारतीयांच्या सुरक्षेची काळजी घेईल. युक्रेन सैन्यांच्या शस्त्रांनी भरलेल्या गोदामात Blast, एयरस्पेस ही केलं बंद ते म्हणाले, मी युक्रेनमधील मल्याळी विद्यार्थ्यांशी फोनवर बोललो. युक्रेनच्या दक्षिण भागात राहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांनी आम्हाला अन्न, पाणी आणि वीज मिळत असल्याचे सांगितले. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी घाबरू नका. इराकसारख्या ठिकाणाहूनही सरकारने भारतीयांना परत आणले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.