मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

Russia Ukraine War: युक्रेन सैन्यांच्या शस्त्रांनी भरलेल्या गोदामात Blast, एयरस्पेस ही केलं बंद

Russia Ukraine War: युक्रेन सैन्यांच्या शस्त्रांनी भरलेल्या गोदामात Blast, एयरस्पेस ही केलं बंद

Russia Ukraine War: पुतिन (Russian President Vladimir Putin) यांनी युद्धाची घोषणा केल्यानंतर युक्रेननं (Ukraine) आपले एयरस्पेस (airspace)  बंद केलेत. दरम्यान आताच समोर आलेल्या युक्रेनियन सैन्याच्या शस्त्रांनी भरलेल्या गोदामात (Ukrainian army exploded) स्फोट झाला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Pooja Vichare

युक्रेन, 24 फेब्रुवारी: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russian President Vladimir Putin) यांनी युद्धाची घोषणा केल्यानंतर युक्रेननं (Ukraine) आपले एयरस्पेस (airspace) बंद केलेत. दरम्यान आताच समोर आलेल्या युक्रेनियन सैन्याच्या शस्त्रांनी भरलेल्या गोदामात (Ukrainian army exploded) स्फोट झाला आहे. या स्फोटाचा व्हिडिओ समोर आला आहे.

रशियन हल्ल्यादरम्यान युक्रेनला भीती वाटत आहे की त्यांच्याकडे येणाऱ्या विमानांवर सायबर हल्ला होऊ शकतो. याशिवाय नागरी उड्डाणांना लक्ष्य करून गोळीबार होण्याचाही धोका आहे. युक्रेन स्टेट एअर ट्रॅफिक सर्व्हिसच्या म्हणण्यानुसार, धोका लक्षात घेऊन युक्रेनमधील एयरस्पेस गुरुवारी नागरी उड्डाणांसाठी बंद करण्यात आलं आहे.

एजन्सीनं दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलमधील तेल अवीव येथून कॅनडातील टोरंटोला जाणाऱ्या विमानानं रात्री उशिरा युक्रेनच्या हवाई क्षेत्रातून अचानक यू-टर्न घेतला. या घटनेनंतर उड्डाणांबाबत सतर्कता आणखी वाढवण्यात आली आहे.

युरोपच्या विमान (aviation regulator) वाहतूक नियामकाने लष्करी हालचालींमुळे रशिया आणि बेलारूसच्या सीमेवर असलेल्या भागात उड्डाण करण्याच्या धोक्यांबद्दल आधीच इशारा दिला होता. युद्धाच्या काळात नागरी उड्डाणाबद्दल गैरसमज होऊ शकतो, असे युरोपने म्हटलं होतं. असे झाल्यास अनेकांच्या जीवाला धोका निर्माण होणार आहे. त्याच वेळी, गुरुवारी एअर इंडियाचे फ्लाइट क्रमांक AI1947 युक्रेनची राजधानी कीव येथून दिल्लीला परतलं आहे. यामध्ये मेडिकल विद्यार्थ्यांसह अनेक भारतीय नागरिक मायदेशी आले आहेत.

रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने एक इशारा पाठवला

युरोपियन युनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सी (EASA) ने दावा केला आहे की, रशियानं ग्रीनविच मीन टाइम 12.45 (GMT) च्या फ्लाइट्सबाबत चेतावणी जारी केली होती. लष्करी उपकरणांच्या वापरामुळे उड्डाणांना धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे युक्रेनची हवाई वाहतूक त्वरित बंद करण्यात यावी.

युक्रेनच्या केंद्रीय लष्करी कमांडनं (Ukraine's Central Military Command) रशियानं कीव बोरीस्पिल, निकोलायव्ह, क्रॅमतोर्स्क, खेरसन यासह अनेक विमानतळांवर बॉम्बहल्ला केल्याचा अहवाल दिला आहे. खार्किव लष्करी विमानतळ आता धुमसताना दिसत आहे. याचा व्हिडिओ समोर आला आहे.

रशियाचे पाच फायटर आणि एक हेलिकॉप्टर उडवलं, युक्रेन लष्कराचा दावा

एएफपीच्या वृत्तानुसार, आता रशियन सैन्यानं (Russian forces) म्हटलं की, त्यांनी युक्रेनच्या (Ukraine) लष्करी आणि हवाई तळांना लक्ष्य करून ते नष्ट केले आहेत. दुसरीकडे युक्रेननं हार मानणार नसल्याचं म्हटलं आहे. लुहान्स्क भागात रशियाची पाच विमाने (Russian planes) आणि एक रशियन हेलिकॉप्टर (Russian helicopter) पाडण्यात आल्याचं युक्रेनच्या लष्करानं म्हटलं आहे.

युक्रेनची राजधानी कीवमध्ये रशियाने क्रूझ आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे. युक्रेनमधील ओडेसा येथील ब्लॅक सी बंदरात स्फोट झाल्याची माहिती एएफपीनं दिली आहे. गुरुवारी सकाळपासून युक्रेनच्या विविध भागातून स्फोटाचं वृत्त येत आहे. याआधी युक्रेनच्या पूर्वेकडील भाग आणि कीवमधून स्फोट झाल्याच्या बातम्या आल्या होत्या.

रशियन सैनिक युक्रेन महिलांना बोलावत आहेत डेटसाठी, Tinderवर करताहेत फ्लर्टी मेसेज

रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनमध्ये मार्शल लॉ लागू करण्यात आला आहे. युक्रेनकडून युद्ध थांबवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. राजधानी कीवचे विमानतळ रिकामे करण्यात आलं आहे.

First published:

Tags: Russia, Russia Ukraine, Ukraine news, War