Home /News /videsh /

चीनच्या कर्जातून का सुटू शकत नाहीत देश? यामुळे श्रीलंका, पाकिस्तानची आर्थिक स्थिती बिघडली!

चीनच्या कर्जातून का सुटू शकत नाहीत देश? यामुळे श्रीलंका, पाकिस्तानची आर्थिक स्थिती बिघडली!

गेल्या दशकात चीनने अनेक देशांना कर्ज दिलं आहे. कर्जाच्या माध्यमातून विकसनशील देशांना चीनवर अवलंबून राहण्यास भाग पाडल्याचा आरोप अमेरिकेने (America) केला आहे. सध्या चीनचा जगभरातून निषेध केला जात आहे.

  बीजिंग, 14 एप्रिल - चीनवर (China) जगभरातून टीका होत आहे. कर्ज कूटनितीच्या (debt diplomacy of China) माध्यमातून विकसनशील देशांना चीनवर अवलंबून राहण्यास भाग पाडल्याचा आरोप अमेरिकेने (America) केला आहे. श्रीलंका (Sri lanka) आणि पाकिस्तान (Pakistan) हे यापैकीच असलेले देश आहेत. गेल्या दशकात चीनने अनेक देशांना कर्ज दिलं आहे. अलीकडच्या काही वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर, चीनच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी विकसनशील देशांना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीपेक्षा जास्त कर्ज दिले आहे. चीनने कर्जाच्या अटीही अशा केल्या आहेत की, विकसनशील देशांना त्यांचं पालन करणं कठीण जातं. याबाबतीत ताजं प्रकरण श्रीलंकेचं आहं. तिथलं आर्थिक संकट अधिक गडद झालं आहे. आता श्रीलंका चीनकडून आणखी कर्ज मागत आहे. मात्र, चीनने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं आहे. श्रीलंकेनं चीनकडे 2.5 अब्ज डॉलर्सची मदत मागितली होती. परंतु, याला चीनने प्रतिसाद दिलेला नाही. आंतरराष्ट्रीय आर्थिक तज्ज्ञांचं मत आहे की, कोरोना महामारीनंतर रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे जगातील परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. दरम्यान, श्रीलंका आणि पाकिस्तानची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. त्यांनी चीनला मदतीचं आवाहनही केलं आहे. पाकिस्तानने 4 अब्ज डॉलर्सच्या कर्जाची मागणी केली होती. चीनचे शी जिनपिंग सरकार श्रीलंकेतील आणीबाणी आणि पाकिस्तानमधील नवीन सरकारनंतरच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. राष्ट्रपतींना हटवण्यासाठी श्रीलंकेत मोठ्या प्रमाणावर निदर्शनं होत आहेत. अशा परिस्थितीत चीनकडून आर्थिक मदत मिळण्याची शक्यता कमीच दिसत आहे. तथापि, पाकिस्तान आणि श्रीलंका दोन्ही देशांना आशा आहे की, चीन लवकरच त्यांना मदत स्वरूपात कर्ज देऊ शकेल.
  कोरोनाचा कहर, थेट चीनवर परिणाम अमेरिकन वृत्तसंस्था ब्लूमबर्गने आर्थिक तज्ज्ञ राफेलो पँतुची यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, चीनमध्ये कोरोनाचा कहर झाला असून त्यातून बाहेर पडणं चीनसाठी जड झालं आहे. चीनच्या सरकारी बँकांच्याही लक्षात आलं की, जे देश कर्ज घेत आहेत, ते कर्ज फेडण्याची त्यांची क्षमता नाही. त्या देशांतील परिस्थिती सातत्यानं खालावत चालली आहे. अशा वेळी चीननं कोरोनाचा सामना करण्यासाठी स्वतःवर पैसा खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. आता चीन अशा देशांना कर्ज देण्याचे टाळू इच्छितो, ज्यांच्याकडून कर्जाची परतफेड करण्याची अपेक्षा नाही. कोरोनामुळे चीनचा तंत्रज्ञान व्यवसाय आणि अनेक देशांच्या गुंतवणुकीवरही वाईट परिणाम झाला आहे. अनेक कंपन्यांनी चीनमधून त्यांचा आर्थिक गाशा गुंडाळला आहे.
  Published by:Digital Desk
  First published:

  Tags: China, Pakistan, Sri lanka

  पुढील बातम्या