मराठी बातम्या /बातम्या /विदेश /Ukraine Russia War: युक्रेन महिलांना रशियन सैनिकांचे फ्लर्टी मेसेज, Tinder वर बोलावत आहेत डेटसाठी

Ukraine Russia War: युक्रेन महिलांना रशियन सैनिकांचे फ्लर्टी मेसेज, Tinder वर बोलावत आहेत डेटसाठी

Ukraine Russia War: एका युक्रेनियन महिलेनं दावा केला आहे की रशियन सैनिक तिला Tinderवर फ्लर्टी मेसेज पाठवत आहेत.

Ukraine Russia War: एका युक्रेनियन महिलेनं दावा केला आहे की रशियन सैनिक तिला Tinderवर फ्लर्टी मेसेज पाठवत आहेत.

Ukraine Russia War: एका युक्रेनियन महिलेनं दावा केला आहे की रशियन सैनिक तिला Tinderवर फ्लर्टी मेसेज पाठवत आहेत.

युक्रेन, 24 फेब्रुवारी: युक्रेन आणि रशियामधील युद्ध जवळपास सुरू झालं आहे. राजधानी कीव (Kyiv) आणि खार्किव (Kharkiv) शहरासह युक्रेनच्या विविध भागात स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा केली तेव्हापासूनच स्फोटांची ही मालिका सुरू झाली आहे. दरम्यान, एका युक्रेनियन महिलेनं दावा केला आहे की रशियन सैनिक तिला Tinderवर फ्लर्टी मेसेज पाठवत आहेत.

युक्रेनचे दुसरे सर्वात मोठं शहर Kharkiv पासून रशियन सैन्य फक्त 20 मैल दूर आहे. रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War)यांच्यात युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान युक्रेनच्या एका महिलेनं एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. ज्यामध्ये रशियन सैनिक फ्लर्ट करण्याच्या उद्देशानं मेसेज सोशल मीडियावर पाठवत असल्याचा दावा केला आहे. अनेक सैनिकांनी त्यांच्या पदांची माहिती त्यांच्या फोटोंसह महिलांना पाठवली आहे.

द सनच्या रिपोर्टनुसार, युक्रेनियन महिलांना आकर्षित करण्यासाठी आंद्रेई, अलेक्झांडर, ग्रेगरी आणि मायकेल यांच्यासह डझनभर रशियन सैनिकांनी डेटिंग अॅपवर त्यांचे प्रोफाइल तयार केले आहेत. दशा सिनेलनिकोवा (Dasha Synelnikova) नावाच्या महिलेनं सांगितलं की, गेल्या काही दिवसांपासून अनेक रशियन सैनिक तिला Tinder वर मेसेज आणि रिक्वेस्ट पाठवत आहेत.

युक्रेनच्या महिलांना मेसेज आणि रिक्वेस्ट पाठवणं

33 वर्षीय Dasha Synelnikova ने 'The Sun'ला सांगितलं की, मी युक्रेनमधील कीव येथे राहते, मात्र एका मित्रानं मला सांगितले की टिंडरवर बरेच रशियन सैनिक आले आहेत, म्हणून मी माझं लोकेशन सेटिंग बदलून खार्किव केलं. तिथंही मला रशियन सैनिकांचे मेसेज येऊ लागले.

Ukraine new 2

दशा पुढे म्हणाली- पाठवलेल्या फोटोत रशियन सैनिक घट्ट पट्टेदार बनियानमध्ये दिसत होता. दुसर्‍या फोटोत, तो व्यक्ती बेडवर पडलेले अवस्थेत पिस्तूल घेऊन पोज देत होता. दरम्यान मला त्यापैकी एकही जण आकर्षक वाटला नाही. मी कधीही शत्रूशी बोलण्याचा विचार करणार नाही. मी टिंडरवर त्याची रिक्वेस्ट रिजेक्ट केली. पण असे बरेचसे आहेत जे मेसेज पाठवत होते.

मेसेजमध्ये काय झालं संभाषण

दरम्यान, Dasha Synelnikova 31 वर्षीय आंद्रेई (कथित रशियन सैनिक) सह एका मेसेजवर बोलली. दशाने आंद्रेईला विचारलं तू कुठे आहेस? तुम्ही खार्किवमध्ये आहात का? यावर आंद्रेई म्हणाला- अर्थात मी खार्किवमध्ये नाही पण मी जवळ आहे, फक्त 80 किमी दूर आहे.

दशानं पुन्हा विचारले- आम्हाला भेटण्याचा तुमचा काही प्लॅन आहे का? यावर आंद्रेईनं उत्तर दिलं - मी आनंदाने येईन पण 2014 पासून रशियन लोकांचे युक्रेनमध्ये स्वागत झालंनाही. दशाने पुन्हा विचारले- तुम्ही काय करता?, यावर आंद्रेईनं कोणतेही थेट उत्तर दिलं नाही.

रशियाकडून युक्रेनच्या विमानतळांवर बॉम्बहल्ले; लष्करी विमानतळ धुमसतानाचा Live Video

पण टिंडरवर येणारे सर्व मेसेज महिलेनं रशियन सैनिकांचे मेसेज असल्याचं सांगितले आहेत. रशियन सैन्याचा गणवेश परिधान केलेले लोक अनेक प्रोफाइलमध्ये दिसू लागले. महिलेनं त्यांचे स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत.

First published:
top videos

    Tags: President Vladimir Putin, Russia, Russia Ukraine, Tinder, Ukraine news