युक्रेन, 24 फेब्रुवारी: युक्रेनमधून (Ukraine Again) पुन्हा एक मोठी बातमी समोर येतेय. युक्रेनच्या केंद्रीय लष्करी कमांडनं (Ukraine's Central Military Command) रशियानं कीव बोरीस्पिल, निकोलायव्ह, क्रॅमतोर्स्क, खेरसन यासह अनेक विमानतळांवर बॉम्बहल्ला केल्याचा अहवाल दिला आहे. खार्किव लष्करी विमानतळ आता धुमसताना दिसत आहे. याचा व्हिडिओ समोर आला आहे.
एएफपीच्या वृत्तानुसार, आता रशियन सैन्यानं (Russian forces) म्हटलं की, त्यांनी युक्रेनच्या (Ukraine) लष्करी आणि हवाई तळांना लक्ष्य करून ते नष्ट केले आहेत. दुसरीकडे युक्रेननं हार मानणार नसल्याचं म्हटलं आहे. लुहान्स्क भागात रशियाची पाच विमाने (Russian planes) आणि एक रशियन हेलिकॉप्टर (Russian helicopter) पाडण्यात आल्याचं युक्रेनच्या लष्करानं म्हटलं आहे.
! Ukraine's central military command reports Russia bombed several airports, including Kyiv Boryspil, Nikolaev, Kramatorsk, Kherson. Kharkiv military airport is burning. pic.twitter.com/IOrfGZgPL4
— Christo Grozev (@christogrozev) February 24, 2022
युक्रेनची राजधानी कीवमध्ये रशियाने क्रूझ आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे. युक्रेनमधील ओडेसा येथील ब्लॅक सी बंदरात स्फोट झाल्याची माहिती एएफपीनं दिली आहे. गुरुवारी सकाळपासून युक्रेनच्या विविध भागातून स्फोटाचं वृत्त येत आहे. याआधी युक्रेनच्या पूर्वेकडील भाग आणि कीवमधून स्फोट झाल्याच्या बातम्या आल्या होत्या.
रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनमध्ये मार्शल लॉ लागू करण्यात आला आहे. युक्रेनकडून युद्ध थांबवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. राजधानी कीवचे विमानतळ रिकामे करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: President Vladimir Putin, Russia Ukraine, Vladimir putin