संयुक्त राष्ट्र, 14 एप्रिल : संयुक्त राष्ट्र कार्य दलाने (UN Task Force) आपल्या नवीन अहवालात जगातल्या देशांना अर्थव्यवस्थेबाबत चेतावणी दिली आहे. युक्रेन विरुद्ध रशियाच्या युद्धामुळे अनेक विकसनशील देशांच्या (developing countries) अर्थव्यवस्था पंगू होण्याची भीती आहे. कारण, या देशांना अन्न आणि इंधनाच्या वाढत्या किमतींचा (fuel prices) सामना करावा लागत असल्यानं त्यांना अधिक कठीण आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी बुधवारी हा अहवाल प्रसिद्ध केला. ते म्हणाले की कोविड-19 महामारी (Corona Pandemic), हवामान बदल आणि पुरेशा निधीच्या अभावामुळे आधीच अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी संघर्ष करत असलेल्या देशांमध्ये रशिया-युक्रेन युद्धामुळे अन्न, ऊर्जा आणि आर्थिक संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे.
युनायटेड नेशन्स एजन्सी फॉर प्रमोशन ऑफ ट्रेड अँड डेव्हलपमेंटच्या सरचिटणीस रेबेका ग्रिन्सपॅन यांनी अहवाल तयार करणाऱ्या टास्क फोर्सशी समन्वय साधला. त्या म्हणाल्या की, 107 देश अन्न, ऊर्जा आणि आर्थिक संकट या किमान एका घटकाचा सामना करत आहेत. तर यापैकी 69 देश या तिन्ही घटकांचा विचार करता गंभीर परिस्थितीचा सामना करत आहेत. रेबेका यांच्या मते, हे देश अतिशय कठीण आर्थिक परिस्थितीचा सामना करत आहेत. त्यांच्या सुटकेसाठी बाह्य निधी नाही. तसंच, कोणत्याही आर्थिक मदतीला वाव नाही.
हे वाचा - तालिबान अमेरिकन सैन्य सोडून गेलेली शस्त्रं पाकिस्तानला पाठवतोय, भारताविरुद्ध कट?
या अहवालात देशांना खुल्या बाजारपेठेतून अन्नपदार्थ आणि इंधनाचा स्थिर प्रवाह मिळवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. यासह आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांना या देशांना भांडवल अधिक मिळवून देण्यासाठी शक्य ते सर्वकाही करण्याचं आवाहन केलं आहे. येथे, संयुक्त राष्ट्रांचे निर्वासितांचे उच्चायुक्त फिलिपो ग्रँडी यांनी ट्विटरवर लिहिलंय की, 'युक्रेन सोडणाऱ्या निर्वासितांची संख्या 20 लाखांवर पोहोचली आहे. युद्ध सुरू झाल्यापासून मोठ्या संख्येने लोक स्थलांतर करू लागले आहेत. या लोकांनी युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये आश्रय घेतला आहे.'
जागतिक अन्न सुरक्षा समितीचे प्रमुख गॅब्रिएल फेरेरो डी लोमा-ओसोरियो (Gabriel Ferrero de Loma-Osorio) यांनी सांगितलं की, परिस्थिती चांगली नाही. कोरोना महामारीपूर्वी भूकबळींची संख्या हळूहळू वाढत होती. पण आता त्यात लक्षणीय वाढ झाली आहे. युनायटेड नेशन्स कमिटी फॉर द वॉर ऑन हंगरचे अधिकारी लोमा ओसोरिओ यांनी सांगितले की, कोरोना महामारीपूर्वीच्या तुलनेत सध्या जगात अंदाजे 16.1 कोटी लोक उपासमारीने ग्रस्त आहेत. सध्या त्यांची एकूण संख्या 82.1 कोटी असल्याचा अंदाज आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Economic crisis, Economy, Un