मराठी बातम्या /बातम्या /explainer /

Russia vs Ukraine | लष्कर आणि शस्त्रास्त्रांच्या बाबतीत रशिया युक्रेनपेक्षा शक्तिशाली, वाचा कोणाकडे किती सामर्थ्य

Russia vs Ukraine | लष्कर आणि शस्त्रास्त्रांच्या बाबतीत रशिया युक्रेनपेक्षा शक्तिशाली, वाचा कोणाकडे किती सामर्थ्य

Ruusia Vs Ukraine : लष्करी (Army) सामर्थ्याचा विचार केला तर रशिया (Russia) युक्रेनपेक्षा (Ukraine) कितीतरी अधिक शक्तिशाली आहे यात शंका नाही. सत्य हे देखील आहे की युक्रेन कोणत्याही बाबतीत रशियाच्या पुढे नाही. त्यानंतर गेल्या 15 वर्षात पुतिन यांच्या राजवटीत रशियन सैन्याचे बरेच आधुनिकीकरण झाले आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धात, प्रत्येकजण असे मानतो की लढाई एकतर्फी होईल.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde

मास्को, 24 फेब्रुवारी : वृत्तानुसार, रशियाने (Russia) युक्रेनविरुद्ध (Ukraine) युद्ध पुकारले आहे. सामर्थ्य, क्षेत्रफळ आणि सैन्याविषयी बोलायचे झाले तर रशिया या शेजारील देशापेक्षा कितीतरी पटीने अधिक शक्तिशाली आहे. गेल्या 15 वर्षांत रशियन सैन्याचे चित्र बदलले आहे. त्यांचे सैन्य आधुनिक झाले आहे. अशा स्थितीत रशियाचा हल्ला असाच सुरू राहिला आणि युक्रेनला कोणत्याही देशाकडून मदत मिळाली नाही, तर ही लढाई कमी-अधिक प्रमाणात एकतर्फी आहे.

एकेकाळी युक्रेन सोव्हिएत युनियनचा भाग होता आणि रशियाबरोबर होता. पण जेव्हा सोव्हिएत युनियन संपुष्टात आले तेव्हा ते 1991 मध्ये सोव्हिएत युनियनपासून वेगळे झाले. युक्रेनला स्वतंत्र देश म्हणून सर्वप्रथम मान्यता देणाऱ्या देशांपैकी भारत एक होता. मात्र, गेल्या तीन दशकांत युक्रेन आणि रशिया यांच्यातील संबंध कटू झाले आहेत. त्यामागे अनेक कारणे आहेत. युक्रेनचा नाटो देशांकडे झुकणे हे एक मोठे कारण आहे.

लष्करी खर्च आणि क्षेत्रफळ यात जमीन-आसमानाचा फरक

जर आपण क्षेत्राफळ पाहिलं तर विशाल रशियासमोर युक्रेन म्हणजे लहान मूल दिसते. रशियाचे क्षेत्रफळ युक्रेनच्या पाचपट जास्त आहे. रशियानंतर युक्रेन हा युरोपमधील दुसऱ्या क्रमांकाचा देश असला तरी तो हळूहळू विकसित होत आहे. रशिया त्यांच्या लष्करावर 61.7 अब्ज डॉलर खर्च करते तर युक्रेनचे संरक्षण बजेट 5.4 अब्ज डॉलर आहे. यावरुन तुम्हाला अंदाज येऊ शकतो.

रशिया Russia military power

लोकसंख्या - 14.6 कोटी

क्षेत्रफळ - 17,125,191 चौ. किमी

राजधानी - मॉस्को

भाषा - रशियन

युक्रेन Ukraine military power

लोकसंख्या - 4.1 कोटी

क्षेत्रफळ - 603,550 चौ. किमी

राजधानी - कीव

भाषा - युक्रेनियन

Ukraine Russia War: रशियाकडून युक्रेनच्या विमानतळांवर बॉम्बहल्ले; लष्करी विमानतळ धुमसतानाचा Live Video

युक्रेनचे सरकार रशियाविरोधी

स्वत:च्या पायावर उभे राहण्याबरोबरच रशियाची सर्वात मोठी समस्या ही आहे की युक्रेनमधील सध्याचे सरकार हे त्यांच्या विरोधातील आहे. युक्रेनच्या व्होलोडिमिर झेलेन्स्कीचे सरकार रशियाच्या विरोधात मानले जाते, या सरकारचा कल अमेरिका आणि युरोपीय देशांकडे आहे.

रशियाचे सैन्य प्रत्येक बाबतीत पुढे

रशियाकडे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सैन्य आहे. यात एकूण 9 लाख सैनिक आणि अधिकारी आहेत, तर युक्रेनच्या सशस्त्र दलात सुमारे 2.10 लाख लष्करी सामर्थ्य आहे, परंतु फरक असा आहे की रशियाचे सैन्य शस्त्रास्त्रे आणि आधुनिकीकरणाच्या बाबतीत युक्रेनपेक्षा खूप पुढे आहे. त्यांच्याकडे भरपूर उपकरणे आहेत, अशी शस्त्रे आहेत, जी जगात अतुलनीय असल्याचे म्हटले जाते.

रशिया विरुद्ध युक्रेन - सैन्याची शक्ती

रशिया

रशियन सशस्त्र सेना (2020) – 09 लाख

सैन्य 2.8 लाख

नौदल 1.5 लाख

हवाई दल 1.65 लाख

रॉकेट फोर्स 50,000

एअरबॉर्न 45,000

Russia-Ukraine: मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच कच्च्या तेल दराचा भडका

युक्रेन

सशस्त्र दल एकूण 209,000

सैन्य 1.45 लाख

नौदल 11,000

हवाई दल 45,000

एअरबोर्न 8,000

टँकची ताकद

टँक नेहमीच रशियन सैन्याची ताकद राहिली आहेत. रशियाकडे 12,420 युद्ध रणगाडे आहेत, तर युक्रेनकडे फक्त 2596 आहेत, म्हणजे खूपच कमी. रशियाकडे बख्तरबंद लष्करी वाहनांची संख्या 30 हजारांच्या वर आहे, तर युक्रेनमध्ये ही संख्या 12303 आहे.

रशिया विरुद्ध युक्रेन - सैन्याची शक्ती

रशिया

स्पेशल ऑपरेशन्स फोर्स 1000

रेल्वे फोर्स 29,000

कमांड आणि सपोर्ट 1.8 लाख

पॅरा मिलिटरी 5.5 लाख

20 लाख राखीव सैन्य

अण्वस्त्रे - 1600 सक्रिय, एकूण 6850

Russia-Ukraine War: रशियाकडून युक्रेनच्या विमानतळांवर बॉम्बहल्ले, भयंकर VIDEO

युक्रेन

विशेष ऑपरेशन्स फोर्स - माहिती नाही

पॅरा मिलिटरी -102,000

नॅशनल गार्ड - 60,000

सीमा रक्षक - 42,000

राखीव 9 लाख

अण्वस्त्रे 00

हवेतील ताकदीच्या बाबतीत रशिया खूप पुढे

रशियाची ताकद अवकाशात नेहमीच उंच राहिली आहे. त्यांचे वर्चस्व संपूर्ण जगाने ओळखले आहे. रशियाकडे 4173 विमाने आहेत, जी युक्रेनच्या 772 विमानांपेक्षा सहापट जास्त आहे. रशियाकडे 318 लढाऊ विमाने आहेत तर युक्रेनकडे फक्त 60 आहेत.

रशियाचा नौदल ताफाही खूप मोठा

या दोन्ही देशांच्या नौदलाच्या ताफ्यातही जमीन-आसमानाचा फरक आहे. रशियाच्या नौदल ताफ्यात 605 जहाजे आणि 30 पाणबुड्या आहेत, तर युक्रेनकडे फक्त 38 नौदल जहाजे आहेत आणि पाणबुड्या नाहीत. ही आकडेवारी सर्व विश्वसनीय साईट्सवरून घेण्यात आली आहे.

First published:

Tags: Russia, Russia Ukraine, Ukraine news, War