Home /News /videsh /

BREAKING: PM मोदी आणि झेलेन्स्की यांच्यात 35 मिनिटं फोनवर चर्चा, या मुद्द्यांवर दिला भर

BREAKING: PM मोदी आणि झेलेन्स्की यांच्यात 35 मिनिटं फोनवर चर्चा, या मुद्द्यांवर दिला भर

Russia-Ukraine War: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलन्स्की यांच्या फोनवरून संवाद साधला आहे. 35 मिनिटं झालेल्या या संवादात दोन्ही नेत्यांनी अनेक पैलूंवर बातचित केली आहे.

    नवी दिल्ली, 07 मार्च: मागील काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेन या दोन देशात युद्ध सुरू (Russia Ukraine war) आहे. या दोन देशात सुरू असलेल्या युद्धाकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. अनेक देश मध्यस्थी करत हे युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. दोन्ही देशांनी एकत्र बसून चर्चेच्या माध्यामातून यावर तोडगा काढावा, यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे प्रयत्न केले जात आहे. पण दोन्ही देश युद्धातून माघार घ्यायला तयार नाहीत. गेल्या बारा दिवसांपासून युक्रेनमध्ये दोन्ही देशात युद्ध सुरू आहे. यामध्ये सामान्य नागरिकांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे. यामध्ये अनेक भारतीय नागरिकांचा देखील समावेश आहे. अनेक भारतीय विद्यार्थी अद्याप युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. याच पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलन्स्की (President Volodymyr Zelensky) यांच्याशी फोनवरून संवाद साधला (Spoke on call) आहे. 35 मिनिटं झालेल्या या संवादात दोन्ही नेत्यांनी अनेक पैलूंवर बातचित केली आहे. यावेळी पीएम मोदी यांनी युक्रेनमधील सद्यस्थितीचा आढावा घेतला आहे. हेही वाचा- NATO नं दिला 'धोका', युक्रेनची भारताला भर Live ब्रिफिंगमध्ये विनंती; म्हणाले... तसेच रशिया आणि युक्रेन यांनी चर्चेच्या माध्यमातून वादावर तोडगा काढण्यासाठी सुरू केलेल्या चर्चेचं पंतप्रधान मोदी यांनी कौतुक केलं आहे. तसेत युक्रेनच्या युद्धभूमीतून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी युक्रेन सरकारनं केलेल्या मदतीबद्दल पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचे आभार मानले आहेत. तसेच सुमीमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांत युक्रेन सरकारनं सहकार्य करावं, असंही मोदी यांनी यावेळी म्हटलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Narendra modi, Pm modi, Russia Ukraine, Ukraine news

    पुढील बातम्या