Home /News /videsh /

NATO नं दिला 'धोका', युक्रेनची भारताला भर Live ब्रिफिंगमध्ये विनंती; म्हणाले...

NATO नं दिला 'धोका', युक्रेनची भारताला भर Live ब्रिफिंगमध्ये विनंती; म्हणाले...

युद्धग्रस्त भागातून परदेशी विद्यार्थी आणि नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी गोळीबार थांबवण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.

    कीव, 06 मार्च: रशिया (Russia) युक्रेनवर (Ukraine) सातत्यानं हल्ले करत आहे. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा (Ukraine's Foreign Minister Dimitro Kuleba) यांनी भारताला रशियाला युद्ध थांबवण्यास सांगण्याचं आवाहन केलं आहे. टीव्हीवर संबोधित करताना, कुलेबा यांनी रशियावर युद्धविराम (ceasefire) कराराचं उल्लंघन केल्याचा आरोप केला. युद्धग्रस्त भागातून परदेशी विद्यार्थी आणि नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी गोळीबार थांबवण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. कुलेबा म्हणाले, 30 वर्षांपासून युक्रेन हे आफ्रिका आणि आशियातील हजारो विद्यार्थ्यांसाठी स्वागतार्ह घर होते. युक्रेननं परदेशी विद्यार्थ्यांना जाण्यासाठी ट्रेनची व्यवस्था केली आहे. हॉटलाइन्सची स्थापना केली आहे. दूतावासांसोबत काम करत आहे. युक्रेन सरकार त्यांच्यासाठी सतत काम करत आहे. VIDEO: 7 पिढ्यांमध्ये पहिल्यांदा घरामध्ये झाला मुलीचा जन्म, आई-वडिलांनी थेट चंद्रावरची जमीन दिली गिफ्ट!  ज्या देशांचे नागरिक युक्रेनमध्ये आहेत त्यांची सहानुभूती मिळवण्याचा रशिया प्रयत्न करत असल्याचा दावा युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केला. परदेशी विद्यार्थ्यांच्या बाबतीत रशियानं मदत केल्यास या सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढले जाईल, असे ते म्हणाले. मी भारत, चीन आणि नायजेरियाच्या सरकारांना विनंती करतो की त्यांनी रशियाला गोळीबार थांबवावा आणि नागरिकांना बाहेर जाण्याची परवानगी द्यावी, असे ते म्हणाले. याशिवाय रशियाशी विशेष संबंध जोडलेले भारतासह सर्व देश रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना आवाहन करू शकतात की, हे युद्ध सर्वांच्या हिताच्या विरोधात आहे, असे कुलेबा म्हणाले. त्यांनी असा युक्तिवाद केला की संघर्ष संपवणं सर्व देशांच्या हिताचं आहे. कुलेबा म्हणाले, भारत हा युक्रेनमधील कृषी उत्पादनांचा सर्वात मोठा ग्राहक आहे. हे युद्ध असंच सुरू राहिल्यास नवीन पिकांची पेरणी करणं आपल्यासाठी कठीण होईल. जागतिक आणि भारतीय अन्न सुरक्षेच्या दृष्टीनं हे युद्ध थांबवण हिताचे आहे. युद्ध थांबवण्याची मागणी करण्यासाठी त्यांनी सामान्य भारतीयांना रशियावर दबाव आणण्याचं आवाहन केलं. युक्रेन लढत आहे कारण आमच्यावर हल्ला झाला आणि आम्हाला आमच्या भूमीचं रक्षण करायचं आहे कारण पुतिन आमच्या अस्तित्वाचा अधिकार ओळखत नाहीत, असंही कुलेब यांनी म्हटलं आहे. परराष्ट्र मंत्रालयानं शनिवारी सांगितलं की, ऑपरेशन गंगा अंतर्गत आतापर्यंत सुमारे 13,300 लोक युक्रेनमधून 63 फ्लाइटमधून भारतात परतले आहेत. ते म्हणाले की, गेल्या 24 तासांत सुमारे 2,900 वाहतूक करणारी 15 उड्डाणे परतली आहेत. महापौर किशोरी पेडणेकरांवर नारायण राणेंचा गंभीर आरोप एका ब्रीफिंगमध्ये परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले, गेल्या 24 तासांत सुमारे 2,900 नागरिकांसोबत 15 उड्डाणे दाखल झाली आहेत. ऑपरेशन गंगा अंतर्गत आतापर्यंत 63 उड्डाणांमधून सुमारे 13,300 लोक भारतात परतले आहेत. यासाठी 13 उड्डाणे पुढील 24 तास निश्चित आहेत. 21,000 हून अधिक लोकांनी युक्रेन सोडलं असल्याची माहितीही त्यांनी दिली.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: India, Russia Ukraine, Russia's Putin

    पुढील बातम्या