नवी दिल्ली, 12 जानेवारी : रशिया आणि युक्रेमध्ये जवळपास गेल्या 11 महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा समावेश हा जगातील मोजक्या शक्तिशाली नेत्यांमध्ये होतो. मात्र रशियामध्ये असाही एक व्यक्ती आहे जो पुतिन यांच्यापेक्षाही अधिक शक्तिशाली आहे. त्याच्या एका शद्बावर पुतिन यांनी 6 आणि 7 जानेवारीला युद्ध विरामाची घोषणा केली होती. पॅट्रिआर्क किरिल असं या व्यक्तीचं नाव असून, पॅट्रिआर्क किरिल हे रशियन अध्यात्मिक धर्मगुरू आहेत. ऑर्थोडॉक्स ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर त्यांनी युद्धविरामाची घोषणा करण्यात यावी असं म्हटलं होतं. त्यानंतर रशियाने दोन दिवस युद्ध विरामाची घोषणा केली. युद्ध विरामाची विनंती ‘द हिंदूने’ दिलेल्या वृत्तानुसार रशियन ऑर्थोडॉक्स ख्रिसमसच्या पार्श्वभूमीर पाच जानेवारी रोजी पॅट्रिआर्क किरिल यांनी दोन्ही देशांना युद्ध विरामाची विनंती केली होती. त्यानंर काही तासांमध्येच रशियाने 6 जानेवारीच्या दुपारपासून ते 7 जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत संपूर्ण सीमा रेषेवर युद्धविरामाची घोषणा केली. रशियन ऑर्थोडॉक्स ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर पुतिन यांना युद्धविराम जाहीर करावा लागला याचं आणखी एक कारण म्हणजे ऑर्थोडॉक्स नागरिकाचं मोठ्या संख्येनं युद्ध क्षेत्रात वास्तव्य आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन आम्ही दोन दिवसांचा युद्धविराम जाहीर करतो असं पुतीन यांनी म्हटलं होतं. हेही वाचा : बॉयफ्रेंडच्या कुटुंबानी दिलेलं जेवण आवडलं नाही; तरुणीचं धक्कादायक पाऊल थेट.. युद्धाचे समर्थन दरम्यान दुसरीकडे मात्र रशियन ऑर्थोडॉक्स चर्चचे नेते पॅट्रिआर्क किरिल यांनी युक्रेनवरील रशियाने केलेल्या हल्ल्याचं समर्थन केलं आहे. किरील यांनी अध्यात्मिक आणि वैचारिक आधारावर या युद्धाचं समर्थन केलं आहे. तसचं त्यांनी युद्धभूमीवर जाणाऱ्या सैनिकांना आशीर्वाद दिला असून, रशिया आणि युक्रेमधील सर्व लोक एकच असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.