नवी दिल्ली, 11 जानेवारी : रिलेशनशिपमध्ये असणारे लोक लग्नाच्या निर्णयापर्यंत पोहोचले की ते आपल्या पालकांना याबद्दल सांगतात. मग पालक आपल्या मुलाने किंवा मुलीने निवडलेल्या पार्टनरला भेटण्यासाठी घरी बोलावतात. अशाच एका प्रकरणात बॉयफ्रेंडच्या घरी जाऊन आल्यानंतर एका तरुणीने ब्रेकअप केलं. खरं तर तिचं ब्रेकअप करण्याचं कारण ऐकूनही तुम्ही कपाळावर हात मारून घ्याल. ही घटना चीनमध्ये घडली आहे. नावडतं जेवन दिलं म्हणून ब्रेकअप चीनमधील एका तरुणीने तिच्या बॉयफ्रेंडशी ब्रेकअप केलं. त्याचं कारण म्हणजे बॉयफ्रेंडच्या पालकांनी पहिल्या भेटीत तिला आवडत नसलेलं जेवण बनवलं होतं. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटत असेल पण ही घटना अगदी खरी आहे. बॉयफ्रेंडच्या पालकांनी नावडतं जेवण दिल्याने नाराज झालेल्या गर्लफ्रेंडने चक्क ब्रेकअप केलंय. या तरुणीचं नाव अद्याप कळू शकलेलं नाही. नेमकं काय घडलं? 20 वर्षांच्या या तरुणीने तिच्या बॉयफ्रेंडच्या पालकांच्या घरी दोन दिवसांच्या भेटीदरम्यान तिला जेवायला दिलेल्या पदार्थांचे फोटो शेअर केले. ती तरुणी आपल्या बॉयफ्रेंडच्या पालकांना भेटण्यासाठी उत्सुक होती. तसेच त्यांना भेटताना ती थोडी घाबरलीही होती. जेव्हा ती तिच्या बॉयफ्रेंडच्या कुटुंबासह जेवायला बसली तेव्हा टेबलवर सर्व्ह केलेल्या डिशेस पाहून तिला धक्काच बसला. तरुणीने तिच्या भेटीदरम्यान वाढलेल्या जेवणाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात नूडल्स विथ फ्राईड एग्स, पमकीन पॉरीज, स्टिअर-फ्राय आणि वेगवेगळे थंड पदार्थ होते. तिच्या बॉयफ्रेंडच्या पालकांनी त्यांच्या पहिल्या भेटीसाठी विशेष तयारी करावी अशी अपेक्षा असल्याने त्या डिशेस पाहून ती निराश झाली होती. हेही वाचा : सापाला मारल्याच्या गुन्ह्यात तरुण फरार; पोलिसांनी सापाचं पोस्टमार्टम केलं अन्… माहिती असुनही तेच जेवन दिलं “त्याने मला सांगितले की सामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनात हेच जेवण असतं. खरं तर त्याला माहीत होतं की मला नूडल्स आवडत नाहीत, तरीही प्रत्येक वेळी त्यांनी नूडल डिश वाढल्या,” असं या तरुणीने म्हटलं आहे. या प्रकारानंतर दोन दिवसांनी तिने तिचं रिलेशनशिप संपवण्याचा निर्णय घेतला. तिने तिचं सामान भरलं आणि तुझ्या कुटुंबासोबत राहू शकत नाही, असं बॉयफ्रेंडला सांगून ती निघून गेली. हेही वाचा : Video : स्टंटबाजी पडली महागात; पोलिसांनी अशी शिक्षा केली आता कधीही बसता येणार नाही वाहनात नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया दरम्यान, ही घटना व्हायरल झाल्यानंतर नेटकरी यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. एक युजर म्हणाला, “बरं झालं तिला लग्न करण्यापूर्वीच बॉयफ्रेंडचं कुटुंब तिच्याशी चांगलं वागणार नाही हे कळालं.” दुसर्याने लिहिलं, “त्याचं कुटुंब गरीब आहे की नाही याबद्दल बोलायला नको. पण त्यांच्यापैकी कोणीही तुला गांभीर्याने घेतलं नाही.” ‘ती तरुणी तिच्या बॉयफ्रेंडच्या पालकांना आवडली नसावी, म्हणून ते तसं वागले, असं दिसतंय,’ ‘आम्हीही घरी रोज नूडल्स खातो,’ अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.