वॉश्गिंटन, 25 फेब्रुवारी: रशिया-युक्रेन युद्धाच्या (Russia-Ukraine War) मुद्द्यावर अमेरिका भारताशी चर्चा करणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (US President Joe biden) यांनी गुरुवारी सांगितले की, रशियाच्या लष्करी कारवाईनंतर युक्रेनच्या वाढत्या संकटावर भारताशी चर्चा करणार आहोत. युक्रेन संकटावर व्हाईट हाऊसमध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी राष्ट्राध्यक्षांना जेव्हा विचारण्यात आलं की, रशियाच्या हल्ल्यावर भारत पूर्णपणे अमेरिकेच्या पाठीशी उभा आहे का? तर याला उत्तर देताना त्यांनी थोडा वेळ विचार केला असं दिसून आलं.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रात्री रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवर सुमारे 25 मिनिटं चर्चा केली. मात्र भारताकडून होत असलेल्या प्रयत्नांवर अमेरिका समाधानी नाही. कदाचित यामुळेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना रशिया-युक्रेन संकट सोडवण्याच्या प्रयत्नात भारतासोबत असण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी स्पष्ट उत्तर दिले नाही. भारतासोबत चर्चा सुरू असल्याचं ते म्हणाले.
Russia Ukraine War: जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी पुन्हा खरी! 2014 मधील Tweet Viral
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना विचारण्यात आलं की, भारत हा अमेरिकेचा प्रमुख संरक्षण भागीदार असल्यानं रशिया-युक्रेन संकट सोडवण्यात अमेरिकेसोबत आहे का? या प्रश्नावर बायडेन म्हणाले की, आम्ही भारताशी बोलत आहोत. प्रकरण पूर्णपणे सुटलेलं नाही. खरं तर युक्रेन संकटाबाबत भारत आणि अमेरिकेची भूमिका सारखी नाही असं मानलं जातं. कोणतीही एक बाजू घेणं भारतासाठी कठीण होत आहे. अमेरिका आणि रशिया हे दोन्ही भारताचे मित्र आहेत. या दोघांशीही त्याचे खूप जुनं नातं आहे.
दरम्यान दुसरीकडे हे संकट सोडवण्यासाठी भारत आपल्या पातळीवर प्रयत्न करत आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रात्री रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवर सुमारे 25 मिनिटं चर्चा केली. संवादातूनच कोणताही तोडगा निघू शकतो, असे मोदींनी यावेळी ठणकावून सांगितलं. मुत्सद्देगिरीनेच शांतता प्रस्थापित होऊ शकते. हिंसाचार तात्काळ संपवण्याचे आवाहन मोदींनी पुतीन यांना केलं. ते म्हणाले की, रशिया आणि नाटोमधील मतभेद केवळ चर्चेनेच सोडवले जाऊ शकतात.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी एका निवेदनात म्हटलं आहे की, पुतिन यांनी पूर्वनियोजित युद्धाचा पर्याय निवडला आहे. ज्याचा लोकांच्या जीवनावर विनाशकारी परिणाम होईल. या हल्ल्यातील लोकांचा मृत्यू आणि नाश यासाठी केवळ रशियाच जबाबदार असेल. अमेरिका आणि त्यांचे मित्र देश एकत्र येऊन त्याला निर्णायक पद्धतीने उत्तर देतील, असे ते म्हणाले. मात्र या युद्धात अमेरिकन सैन्य सहभागी होणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.
रशिया-युक्रेन वॉर: युद्धाच्या पहिल्या दिवशी 137 लोकांचा बळी, शेकडो जखमी
रशिया आणि युक्रेनमधील युद्धात जीवित आणि मालमत्तेच्या हानीचा आकडा वाढत आहे. युक्रेनमध्ये युद्धाच्या पहिल्याच दिवशी सुमारे 74 लष्करी पायाभूत सुविधा नष्ट झाल्याचा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं केला आहे. युक्रेननं रशियावर 203 हल्ले केल्याचा आरोप केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: America, Joe biden, Russia, Russia Ukraine, Ukraine news