कीव, 07 एप्रिल : रशिया-युक्रेनमधील युद्ध 43व्या दिवशी देखील सुरू आहे.
(Russia-Ukraine War) दोन्ही देशांपैकी एकही देश माघार घ्यायला तयार नाही आहे. यूक्रेनच्या मारियुपोल मध्ये रशियाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. शहरात आतापर्यंत 5000 लोकांचा मृत्यू झाला आहे. यातच एटलांटिक ट्रिटी ऑर्गनाइजेशनचे
(NATO) जनरल सेक्रेटरी जेन्स स्टोल्टेनबर्ग म्हणाले आहेत की, यूक्रेन विरोधातील रशियाने सुरू केलेल्या या युद्धाला वर्षही लागू शकते. यासाठी रशियन आक्रमणाचा मुकाबला करण्यासाठी मित्र राष्ट्रांनी युक्रेनला पाठिंबा देणे सुरू ठेवले पाहिजे.
त्याच वेळी, अमेरिकेच्या संरक्षण विभाग पेंटागॉनचे प्रेस सेक्रेटरी जॉन किर्बी यांनी बुधवारी दावा केला की युक्रेन रशियाविरुद्ध युद्ध जिंकू शकतो. यामागे पुतिन यांची युक्ती अपयशी असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ते म्हणाले की, पुतीन यांना एकाही धोरणात्मक उद्दिष्टात यश आलेले नाही.
यावरुन अमेरिकेच्या संसदेत विधेयक मंजूर -
युक्रेनमध्ये होत असलेल्या युद्ध गुन्ह्यांची चौकशी करण्याची मागणी अमेरिकन संसदेने केली. त्यासाठीच्या विधेयकावर बुधवारी रात्री मतदान झाले. 418 खासदारांनी समर्थनार्थ मतदान केले, तर 6 रिपब्लिकन खासदारांनी प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले.
रशियालाही मोजावी लागली युद्धाची किंमत, महागाई 45 टक्क्यांनी वाढली, पैसे काढण्यावरही मर्यादा
अमेरिका युक्रेनला किलर ड्रोन देणार -
युक्रेनला युद्धात मदत करण्यासाठी अमेरिका 10 स्विचब्लेड ड्रोन देणार आहे. ते मैल दूरवरून टाकीला अचूक लक्ष्य करू शकते. इतकेच नाही तर स्विचब्लेड हा रोबोटिक स्मार्ट बॉम्ब आहे, जो कॅमेरे, मार्गदर्शन यंत्रणा आणि स्फोटकांनी सुसज्ज आहे. ते अगदी मैल दूरवरून स्वयंचलित मोडमध्ये त्यांच्या लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी प्रोग्राम केले जाऊ शकतात.
बायडेन यांचे पुतीन यांच्यावर कारवाई करण्याचे आवाहन -
बुचा
हत्याकांडानंतर अमेरिकेतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी एकदा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना युद्धाचे गुन्हेगार ठरवून त्यांच्यावर खटला चालवण्याची मागणी केली. बायडेन म्हणाले की, बुचामध्ये जे झाले ते सर्वांनी पाहिले आहे. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.