नवी दिल्ली, 11 जानेवारी: अमेरिकेतून (America) भारतात (India) डुकराच्या मांसाची (Pork Meat) आयात (Import) करायला केंद्र सरकारनं (Union Government) अखेर परवानगी (Permission) दिली आहे. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी परवानगी देण्यात आली असून ऐतिहासिक पाऊल म्हणून या घटनेकडे पाहिलं जात आहे. अमेरिकेतील डुकरांपासून तयार केलेली विविध उत्पादनं आता भारतात आयात करणं या निर्णयामुळे शक्य होणार आहे. या निर्णयामुळे भारताची बाजारपेठ अमेरिकेसाठी खुली झाली असून अमेरिकेनं या निर्णयाचं जोरदार स्वागत केलं आहे. काय आहे निर्णय?अमेरिकेतून भारतात येणाऱ्या विविध कृषी उत्पादनांपैकी डुक्कर आणि संबंधित उत्पादने हे एक महत्त्वाचं प्रॉडक्ट आहे. मात्र इतर कृषी उत्पादनांप्रमाणं डुकराचं मांस भारतात आयात करायला आतापर्यंत सरकारनं परवानगी दिली नव्हती. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी परवानगी देण्यात आली असून भारताचे दरवाजे आता पोर्क आणि पोर्क प्रॉ़डक्टसाठी खुले झाले आहेत. डुकराच्या मांसाचा मोठा व्यापारअमेरिकेतून होणाऱ्या वेगवेगळ्या वस्तूंच्या निर्यातीपैकी डुकरांचं मांस आणि त्यापासून तयार होणाऱ्या उत्पादनांचं प्रमाण मोठं आहे. 2020 मधील आकडेवारीनुसार अमेरिका हा डुकरांच्या मांसाचं उत्पादन करणारा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश होता, तर या पदार्थांची निर्यात करणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश होता. अमेरिकेनं गेल्या वर्षात जवळपास 5 लाख 70 हजार कोटी रुपयांच्या डुकरांच्या मांसाची निर्यात केली आहे. या निर्णयामुळे अमेरिकेची निर्यात अधिकच वाढणार असून भारताच्या बाजारपेठ अमेरिकी मांसाला व्यापाराची मुभा मिळणार आहे.
हे वाचा -
व्यापारी संबंधभारत आणि अमेरिकेतील व्यापारी संबंध दृढ करण्याच्या दृष्टीनं गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात दोन्ही देशाच्या अधिकाऱ्यांमध्ये संयुक्त बैठक पार पडली होती. त्यात अमेरिकी पोर्कसाठी भारतीय बाजारपेठ खुली करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. त्याला प्रतिसाद देत केंद्र सरकारनं जलद हालचाली करत भारतीय बाजारपेठ अमेरिकी पोर्कसाठी खुली केली आहे.
Published by:desk news
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.