मराठी बातम्या /बातम्या /विदेश /पुतीन विरोधक ऍलेक्सी नवालनी संकटात, रशियानं टाकलं दहशतवाद्यांच्या यादीत

पुतीन विरोधक ऍलेक्सी नवालनी संकटात, रशियानं टाकलं दहशतवाद्यांच्या यादीत

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळख असलेल्या ऍलेक्सी नवालनी यांना आता दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्यात आलं आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळख असलेल्या ऍलेक्सी नवालनी यांना आता दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्यात आलं आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळख असलेल्या ऍलेक्सी नवालनी यांना आता दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्यात आलं आहे.

मॉस्को, 25 जानेवारी: रशियाचे (Russia) राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (President Vladimir Putin) यांचे कट्टर आणि जाहीर विरोधक (Open Critic) ऍलेक्सी नवालनी (Alexei Navalny) यांना रशिया प्रशासनाने ‘दहशतवादी आणि उग्रवादी’ (Terrorist and Extremist) जाहीर केलं आहे. सध्या रशियाच्या तुरुंगात बंद असलेल्या नवानली यांना दहशतवादी ठरवण्यात आलं असून पुतीन यांना विरोध केल्याची किंमत त्यांना चुकवावी लागत असल्याची चर्चा रशियात रंगली आहे.

काय आहे प्रकरण?

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे जाहीर विरोधक म्हणून ओळख असणाऱे ऍलेक्सी नवालनी हे गेल्या काही वर्षांत रशियाच्या राजकारणात उदयाला आलेले पुतीन विरोधक म्हणून ओळखले जातात. रशिया सरकारनं सध्या त्यांना तुरुंगात डांबलं असून त्यांच्यावर विविध आरोप ठेवण्यात आले आहेत. ताज्या माहितीनुसार त्यांच्यावर आणि त्यांच्या संघटनेनवर दहशतवादी असल्याचा आरोप ठेवण्यात आला असून नवालनी यांच्या सहकाऱ्यांवरदेखील दहशतवादी असल्याचे आरोप निश्चित करण्यात आले आहेत. नवानली यांच्या अँटि करप्शन फाउंडेशन या संस्थेला आणि त्याच्या इतर 9 सदस्यांनाही दहशतवादी ठरवून त्यांच्याविरुद्ध चौकशी सुरू करण्यात आली आहे.

पुतीन यांचे कट्टर विरोधक

गेल्या वर्षी पुतीन यांच्याविरोधात उठाव करून वातावरण पेटवून दिल्यामुळे ऍलेक्सी नवालनी चर्चेत आले होते. सरकारनं पुतीन विरोधकांची धरपकड सुरू केल्यानंतर ते जर्मनीला गेले होते. तिथं त्यांच्यावर विषप्रयोग झाल्यामुळे ते अत्यवस्थ होते. उपचारांनतर बरे होऊन गेल्या वर्षी ते पुन्हा रशियात परतले होते. रशियात परत येताक्षणी त्यांना सरकारकडून अटक करण्यात आली होती आणि तुरुंगात डांबण्यात आलं होतं. त्यांचे इतर सहकारी पुतीन यांच्या भीतीने देश सोडून पळाले होते. त्यातील बहुतांश सहकारी परत आलेले नाहीत. नवालनी मात्र लढा देण्याची घोषणा करत मायदेशी परतले होते.

हे वाचा- 'अमेरिकन ड्रीम'पायी गेला बळी, 3 वर्षीय मुलासह कुटुंबातील 4 जणांचा गोठून मृत्यू

तालिबानच्या यादीत नवानली

रशियाकडून ज्या ज्या व्यक्तींना आणि गटांना दहशतवादी ठरवण्यात आलं आहे, त्यात तालिबान आणि आयसीस यांचा समावेश आहे. आता त्याच गटात नवालनी आणि त्यांच्या अँटि करप्शन फाउंडनेशनचा समावेश करण्यात आला आहे. रशियामध्ये हुकूमशाहीची झलक पाहायला मिळत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सध्या रंगते आहे.

First published:
top videos

    Tags: Politics, President Vladimir Putin, Russia, Terrorist