Home /News /videsh /

'अमेरिकन ड्रीम'पायी गेला बळी, 3 वर्षीय मुलासह कुटुंबातील 4 जणांचा गोठून मृत्यू

'अमेरिकन ड्रीम'पायी गेला बळी, 3 वर्षीय मुलासह कुटुंबातील 4 जणांचा गोठून मृत्यू

भारतीय नागरिकांमध्ये परदेशात जाण्याचं आकर्षण कायमच दिसतं. विशेषत: युनायडेट स्टेट्स (US), ग्रेट ब्रिटन (Great Britain), दक्षिण आफ्रिका (South Africa), कॅनडा (Canada) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) या ठिकाणी भारतीय लोकांची संख्या लक्षणीय आहे. दरम्यान या अट्टहासापायी एका कुटुंबाने जीव गमावला आहे.

पुढे वाचा ...
मुंबई, 25 जानेवारी: भारतीय नागरिकांमध्ये परदेशात जाण्याचं आकर्षण कायमच दिसतं. विशेषत: युनायडेट स्टेट्स (US), ग्रेट ब्रिटन (Great Britain), दक्षिण आफ्रिका (South Africa), कॅनडा (Canada) आणि ऑस्ट्रेलिया(Australia) या ठिकाणी भारतीय लोकांची संख्या लक्षणीय आहे. नोकरीनिमित्त किंवा काही दिवसांच्या ट्रिपसाठी गेल्यास फारशा अडचणी येत नाहीत. मात्र, जेव्हा भारतीय लोक परदेशात स्थायिक होण्याच्या हेतूनं जातात तेव्हा त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. काही वेळा तर नियमांचं उल्लंघन करत लोकं याठिकाणी पोहोचतात. परिणामी त्यांना तिथे शिक्षादेखील भोगावी लागल्याची अनेक उदाहरणं निदर्शनास आलेली आहेत. 19 जानेवारी 2022 रोजी, यूएस-कॅनडा सीमेजवळील (US Canada Border) मिनिसोटा राज्यात अमेरिकन अधिकाऱ्यांनी बेकायदेशीरपणे (Illegally) अमेरिकेत प्रवेश करणाऱ्या भारतीय लोकांच्या एका गटाला ताब्यात घेतलं. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यातील एका चार सदस्यीय कुटुंबाचा कडाक्याच्या थंडीनं मृत्यू (Indian Family Death) झाला. अमेरिका-कॅनडा सीमेवर झालेल्या या घटनेचा ह्युमन ट्रॅफिकिंगच्या (Human Trafficking) अँगलनं तपास करण्यात येत आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनी आणखी सात भारतीयांना ताब्यात घेतलं आहे. हे सर्व लोक गुजरातचे असून ते सध्या अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहत असल्याचं निष्पन्न झालं आहे. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा गुजराती लोकांमध्ये अमेरिकेबाबत असलेलं जीवघेणं आकर्षण अधोरेखित झालं आहे. द वायरनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. हे वाचा-लसीकरण झालेल्या प्रवाशांसाठी ब्रिटीशांचे दरवाजे पुन्हा खुले, असे बदलले नियम ट्रम्प प्रशासनानं (Trump administration) अमेरिका आणि मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्यास सुरुवात केली होती. तेव्हापासून, कागदपत्र नसलेले स्थलांतरित मोठ्या संख्येनं कॅनडामधून अमेरिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत. मेक्सिकन सीमेवर भारतासारखेच उष्णकटिबंधीय हवामान (tropical climate) आहे, तर कॅनडाच्या सीमेवर हाडं गोठवणारी थंडी (freezing climate) असते. यूएस-कॅनडाच्या याच सीमेजवळ उणे 35 डिग्री सेल्सियस (-35 degrees Celsius) तापमानात एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाला आहे. जगदीश पटेल (वय 35 वर्षे), पत्नी वैशाली पटेल (वय 33 वर्षे), विहांगी पटेल (वय 12 वर्षे) आणि धार्मिक पटेल (वय 3 वर्षे) अशी मृत्यू झालेल्या भारतीयांची नावं आहेत. हे कुटुंब गुजरातमधील डिंगुचा येथील मूळ रहिवासी होतं. वैध व्हिसाशिवाय परदेशी नागरिकांना यूएसमध्ये आणण्याच्या ऑफर देण्याच्या एका एजंटच्या जाळ्यात हे कुटुंबं अडकलं होतं. त्यांनी एजंटला जवळपास 65 लाख रुपये दिले होते, असं डिंगुचा येथील एका रहिवाशानं वाइब्स ऑफ इंडियाच्या समोर उघड केलं आहे. डिंगुचा गावातील नागरिकांचा एक मोठा गट कॅनडाला गेला होता. पटेल कुटुंब त्याच गटाचा भाग होतं. सूत्रांनी व्हाइब्ज ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार या गटातील इतर सदस्य अद्यापही बेपत्ता आहेत. हे सर्व लोक सर्वात अगोदर नॉर्थ डकोटा (North Dakota) येथे लँड होणार होते आणि त्यानंतर पुढील मार्गाक्रमण करणार होते. गुजरातमधील 'अमेरिकन ड्रीम'ची बळी ठरलेली पटेल फॅमिली आर्थिकदृष्ट्या एकदम स्थिर होती. मृत्यू झालेले जगदीश पटेल हे डिंगुचा येथील एका नावाजलेल्या शाळेत शिक्षक होते. तरीही, त्यांनी अमेरिकेत जाण्याचा निर्णय का घेतला? हा प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे. या प्रश्नाचं उत्तर डिंगुचा येथील काही रहिवाशांनी दिलं आहे. जगदीशला अनेक वर्षांपासून आपल्या कुटुंबासह यूएसला जायचं होतं. त्याच्या गावातील अर्ध्याहून अधिक कुटुंबातील सदस्य सध्या अमेरिकेत स्थायिक झालेले आहेत. गुजरातमधील पटेल समाजामध्ये (Patel Community) अमेरिकेत स्थायिक होण्याला खूप महत्त्व आहे. असं करणं त्यांच्यासाठी वैयक्तीक आणि सामाजिक प्रतिष्ठेचा (social prestige) विषय ठरतो. या कारणामुळं जगदीश यांनासुद्धा अमेरिकेत स्थायिक होणं गरजेचं वाटत होतं, अशी माहिती पटेल फॅमिलाला ओळखत असलेल्या एका व्यक्तीनं दिली. हे वाचा-मुस्लीम मंत्र्याच्या हकालपट्टीची चौकशी करा, ब्रिटीश पंतप्रधानांचे आदेश जगदीश पटेल ज्या डिंगुचा गावचे (Dingucha Village) रहिवासी होते, तिथे प्रत्येक कुटुंबातील किमान एक सदस्य यूएसमध्ये स्थायिक झालेला नसेल तर ते कमीपणाचं मानलं (family insult) जातं. गुजरातची राजधानी गांधीनगरपासून (Gandhinagar) 12 किलोमीटर अंतरावर तीन हजार लोकसंख्येचं हे डिंगुचा गाव आहे. सध्या या गावातील एक हजार 800 हून अधिक लोक अमेरिकेत राहतात. डिंगुचामधील प्रत्येक घरात तुम्हाला कॉस्टको कँडी (Costco candy) आणि हॅलेप्पिनो वेफर्स (jalepeño wafers) आढळतील. या गोष्टीतून त्यांचं अमेरिका प्रेम लक्षात येतं. पटेलबहुल असलेल्या डिंगुचातील स्थानिकांना या गोष्टीचा अभिमान वाटतो की, 70च्या दशकाच्या सुरुवातीपासूनच त्यांचे लोक अमेरिकेत स्थलांतरित झालेले आहेत. डिंगुचा गावातील रहिवाशांच्या मते, पटेल कुटुंबाचा मृत्यू नक्कीच दुख:द आहे. गावातील लोक अमेरिकेला गेलेल्या लोकांच्या गटाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. चार लोकांचा जीव गेला तरीही डिंगुचावर अमेरिकन स्वप्नाची मोहिनी कायम आहे. यूएस(US), यूके(UK), कॅनडा (Canada) आणि मेक्सिकोमध्ये (Mexico) राहणाऱ्या छोट्या गावातील भारतीय लोकांची नेमकी संख्या जाणून घेण्याचा प्रयत्न वाइब्ज ऑफ इंडिया करत आहे. परंतु, अद्याप संपूर्ण आकडेवारी मिळवण्यात त्यांना यश आलेलं नाही. हे सर्व प्रकरण पाहिल्यानंतर असा प्रश्न पडतो की, गुजराती लोकांचं हे 'अमेरिकन ड्रीम' काय आहे ज्यासाठी ते सतत प्रयत्नशील आहेत? आजही अनेक गुजराती लोकांवर अमेरिकेचा प्रभाव आहे. गुजरात हे असं राज्य आहे जिथे एमबीए (MBA) झालेल्या उच्चशिक्षित व्यक्तीदेखील आपल्या स्वप्नाचा पाठपुरावा करण्यासाठी अमेरिकेत जाते. मग तिला तिथे जाऊन डोनट्स विकावे लागू दे किंवा स्वच्छतागृहं साफ करवी लागू दे. अमेरिका खरोखर श्रमिकांच्या कष्टाचा आदर करते, असा ठाम समज गुजरातींचा आहे. अवैधपणे अमेरिकेत वास्तव्यासाठी जाणारे जगदीश पटेल हे काही पहिलेच गुजराती नाहीत. यापूर्वीदेखील अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. गेल्या वर्षी, उत्तर गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील एका 24 वर्षीय व्यक्तीनं स्थानिक राजकारण्यांच्या छळाला कंटाळून आपल्या कुटुंबासह देश सोडण्याचा निर्णय घेतला होता. एका एजंटच्या मदतीने तो मेक्सिकन सीमेवर (Mexican border) पोहोचला होता. त्या ठिकाणावरून स्थानिक एजंट बेकायदेशीरपणे सीमा ओलांडणाऱ्या लोकांच्या गटाची ने-आण करत होते. त्याला आणि त्याच्या गटातील इतरांना युएस बॉर्डर अथॉरिटीजनं (US border authorities) अटक केली आणि लुईसियानामधील (Louisiana) डिटेंशन सेंटरमध्ये त्यांची रवानगी केली. त्या तरुणानं अमेरिकेत जाण्यासाठी एजंटला 30 लाख रुपये दिल्याचं सांगितलं जातं. त्याचप्रमाणं काही वर्षांपूर्वी उत्तर भारतातील एक महिला तिच्या मुलीसह मेक्सिकोहून अॅरिझोनाच्या वाळवंटातून (Arizona desert) अमेरिकेत जाण्याचा प्रयत्न करत होती. कडक उन्हात 22 तास घालवल्यानंतर तिचा आणि तिच्या मुलीचा मृत्यू झाला. या घटनांमुळे आणखी काही प्रश्‍न निर्माण होतात. ते म्हणजे, आपला जीव धोक्यात घालून देश सोडण्याइतपत लोक हताश झाले आहेत का? स्टार्ट अप किंवा नवउद्योजकतेला चालना देण्याचा सरकारी प्रयत्न अशा भारतीयांना भारतात ठेवण्यास उपयुक्त ठरू शकेल का?भारतीयांना त्यांच्याच देशात उज्ज्वल भविष्याची हमी मिळेल का? या प्रश्नांची उत्तरं येत्या काळात मिळतील, अशी अपेक्षा आहे.
First published:

Tags: United states, United States of America

पुढील बातम्या