मराठी बातम्या /बातम्या /विदेश /सेम टू सेम पुतिन! रशियाच्या राष्ट्राध्यक्षांसारखं दिसणं पडतंय महाग, मदतीची याचना करतोय हा इसम

सेम टू सेम पुतिन! रशियाच्या राष्ट्राध्यक्षांसारखं दिसणं पडतंय महाग, मदतीची याचना करतोय हा इसम

पुतिन यांच्यासारखं दिसण्यामुळे त्याची खूप चर्चा होत होती; पण रशियाने युक्रेनवर (Russia Attacked Ukraine) आक्रमण केल्यानंतर ही गोष्ट या व्यक्तीच्या आयुष्यातली सर्वांत मोठी अडचण बनली आहे.

पुतिन यांच्यासारखं दिसण्यामुळे त्याची खूप चर्चा होत होती; पण रशियाने युक्रेनवर (Russia Attacked Ukraine) आक्रमण केल्यानंतर ही गोष्ट या व्यक्तीच्या आयुष्यातली सर्वांत मोठी अडचण बनली आहे.

पुतिन यांच्यासारखं दिसण्यामुळे त्याची खूप चर्चा होत होती; पण रशियाने युक्रेनवर (Russia Attacked Ukraine) आक्रमण केल्यानंतर ही गोष्ट या व्यक्तीच्या आयुष्यातली सर्वांत मोठी अडचण बनली आहे.

    पोलंड, 26 फेब्रुवारी: रशिया-युक्रेनमधील युद्धाच्या (Russia Ukraine War) परिस्थितीदरम्यान एका व्यक्तीला अजबच त्रास सहन करावा लागत आहे. ही व्यक्ती म्हणजे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासारखा (Putin) चेहरा असणारा व्यक्ती आहे. पुतिन यांच्यासारखं दिसण्यामुळे त्याची खूप चर्चा होत होती; पण रशियाने युक्रेनवर (Russia Attacked Ukraine) आक्रमण केल्यानंतर ही गोष्ट या व्यक्तीच्या आयुष्यातली सर्वांत मोठी अडचण बनली आहे. आता त्या माणसाला भीती वाटत आहे, की युक्रेनवरच्या हल्ल्यामुळे युद्धविरोधी आंदोलक पुतिन समजून त्याला ठार मारतील. स्लाव्हिक सोबला असं या व्यक्तीचं नाव आहे.

    पुतिन यांच्यासारख्या दिसणाऱ्या स्लाव्हिक सोबला यांनी जीव वाचवण्यासाठी मदत मागितली आहे. त्यांनी सांगितलं, की युद्ध सुरू झाल्यापासून त्यांना भीती वाटते आहे. त्यांच्यावर कधीही हल्ला होऊ शकतो, असं त्यांना वाटत आहे. 53 वर्षीय स्लाविक सोबला पोलंडमध्ये व्रोका याठिकाणी राहतात. पुतिन यांनी युक्रेनमध्ये केलेल्या विशेष लष्करी कारवाईचा फटका त्यांना बसू शकतो, अशी भीती त्यांना आहे. ज्या ठिकाणी स्लाविक राहतात, तिथे 10 पैकी एक जण युक्रेनचा नागरिक आहे. त्यामुळे या परिस्थितीत त्यांच्या जीवाला मोठा धोका आहे. नागरिकांच्या रोषाचे ते कधीही बळी पडू शकतात अशी भीती त्यांना आहे.

    हे वाचा-मिलिटरी पॉवरमध्ये हे देश TOP 10! भारत या स्थानी; युक्रेन पहिल्या 20 मध्येही नाही

    'डेली स्टार'सोबत आपली भीती शेअर करताना स्लाव्हिक म्हणाले, की युद्धापूर्वी ते रस्त्यावर फिरायला घाबरत नव्हते. मात्र आता त्यांना बाहेर पडण्यावर भीती वाटते. अचानक आपल्यावर हल्ला होऊ शकतो, अशी भीती त्यांना वाटते. ते पुतिनसारखे दिसतात, असे अनेक जण त्याआधीही म्हणायचे. पूर्वी ते या गोष्टीला आपली ओळख समजायचे पण आता हिच ओळख त्यांच्या जीवासाठी धोका बनली आहे. स्लाव्हिक यांच्या पत्नीने सांगितलं, की ते पुतिन यांचा अभिनय पैशांसाठी नाही, तर लोकांच्या मनोरंजनासाठी करत असत.

    हे वाचा-Russia Ukraine War | युक्रेनवर रशियाचा हल्ला चीनसाठी चांगली बातमी का नाही?

    स्लाव्हिक यांना यूकेमधली एक लुकअलाइक्स एजन्सी (Lookalikes Agency) रिप्रेझेंट करते. ती कंपनी स्लाव्हिक यांचे सर्व शो स्पॉन्सर करते. गेल्या आठ वर्षांपासून स्लाव्हिक पुतिन यांची अ‍ॅक्टिंग करत आहेत, यातून ते पैसे कमावतात. पण हा त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत नाही आहे. स्लाव्हिक यांचा वाहतूक व्यवसाय (Transport business) असून, पुतीन बनून ते अतिरिक्त पैसे कमावतात. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून नागरिकांचा पुतिन यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. त्यामुळे आता ते पुतिनसारखे दिसणारे म्हणून काम करू इच्छित नाहीत आणि जीवाला धोका असल्याच्या भीतीने त्यांनी आता सुरक्षा मागितली आहे.

    First published:
    top videos

      Tags: President Vladimir Putin, Russia, Russia Ukraine, Russia's Putin, Vladimir putin