नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी: युक्रेन आणि रशिया यांच्यात नुकतंच युद्ध (
Russia-Ukraine War) सुरू झालं आहे. रशिया युक्रेनवर सातत्याने हल्ले (
Russia attacked on Ukraine) करत असून, आतापर्यंत अनेकांना या युद्धात जीव गमवावा लागला आहे. युक्रेनच्या तुलनेत रशिया प्रचंड शक्तिशाली आहे. त्यामुळे लवकरच रशिया युक्रेनवर ताबा मिळवेल की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या युद्धानंतर जगात कोणता देश सर्वांत शक्तिशाली आहे, कोणत्या देशाचं लष्करी सामर्थ्य सर्वाधिक आहे, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. याच बाबींचा आढावा इथे घेतला आहे.
अमेरिका सर्वांत शक्तिशाली तर रशिया दुसऱ्या क्रमांकावर
रशियाकडे जगातल्या दुसऱ्या क्रमांकाचं शक्तिशाली सैन्य (
Second Powerful Military) आहे. अमेरिका या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. या अहवालात ग्लोबल फायरपॉवरने (
Global FirePower) जारी केलेल्या आकडेवारीचा हवाला देऊन अमेरिकेचं सैन्य जगातलं सर्वांत शक्तिशाली असल्याचं नमूद केलं आहे. ग्लोबल फायरपॉवरने एक यादी तयार केली आहे. त्यामध्ये देशांना त्यांच्या लष्करी सामर्थ्याच्या आधारावर क्रमांक दिले आहेत.
हे वाचा-शूरवीर सैनिक! रशियाचे रणगाडे रोखण्यासाठी पुलासह स्वतःलाच बाँबने दिलं उडवून
ग्लोबल फायरपॉवरचे निकष
ग्लोबल फायरपॉवरने ही यादी तयार करण्यासाठी 50 घटक विचारात घेतले. या पॉवर इंडेक्समध्ये अमेरिका 0.0453 गुणांसह प्रथम क्रमांकावर आहे. 2020 मध्ये अमेरिकेचं डिफेन्ससाठी सातशे बिलियन डॉलर अर्थात 5,25,38,78,00,00,000.01 रुपयांचं बजेट होतं. रशिया दुसऱ्या क्रमांकावर असून, त्यांचा स्कोअर 0.0501 आहे. रशियाकडे सुमारे 9,00,000 सैनिक आहेत. तिसऱ्या क्रमांकावर चीन असून, त्यांच्याकडे 20 लाख सैनिक आहेत. चौथ्या क्रमांकावर भारत आहे. असं असलं तरीही अनेकदा भारताने चीनला धडा शिकवला आहे. भारताकडे पॉवर इंडेक्स 0.0979 आहे.
युक्रेन कोणत्या नंबरवर?
यादीत भारत आणि फ्रान्सनंतर ब्रिटनचा क्रमांक लागतो. ब्रिटन 8व्या क्रमांकावर आहे. ब्राझीलला पहिल्या 10 मध्ये स्थान मिळालं आहे. सध्याच्या परिस्थितीत रशियाचा सामना करणाऱ्या युक्रेनचं लष्कर टॉप-20 मध्येही नाही. अशा स्थितीत त्याचा रशियासमोर निभाव लागणं कठीण असून, त्याला अमेरिका आणि 'नाटो'च्या सहकार्याची किती गरज आहे, हे दिसून येतं. या यादीत युक्रेन 22 व्या क्रमांकावर आहे.
हे वाचा-Russia-Ukraine War: रशिया विरूद्ध युद्धात उतरणार बॉक्सिंग चॅम्पियन
स्कोअरनुसार टॉप 10 देश (Top 10 Military Force) कोणते?
1. अमेरिका - 0.0453
2. रशिया - 0.0501
3. चीन - 0.0511
4. भारत - 0.0979
5. जपान - 0.1195
6. दक्षिण कोरिया - 0.1195
7. फ्रान्स - 0.1283
8. यूके - 0.1382
9. पाकिस्तान - 0.1572
10. ब्राझील - 0.1695
दरम्यान, 22व्या क्रमांकावर असलेला युक्रेन दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या रशियाच्या आक्रमणापुढे हिमतीने उभा आहे आणि प्रत्युत्तर देतोय; मात्र या बलशाली रशियन लष्करापुढे त्यांचा निभाव लागण्याची शक्यता कमीच आहे. आता या युद्धाचे काय परिणाम होतील आणि हे युद्ध कधी थांबेल, हे नजीकच्या भविष्यकाळात कळेलच.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.