रशिया, 3 एप्रिल: आक्षेपार्ह पोस्टविरोधात रशियातील (Russia) मॉस्को कोर्टानं (Moscow Court) ट्विटरला (Twitter) दंड ठोठावला आहे. रशियातील इंटरनेट नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ट्विटरला 8.9 दशलक्ष रबल्सचा दंड ठोठवण्यात आला आहे. आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगूनही पावलं न उचलल्याने कोर्टाने ट्विटरला दणका दिला आहे. चुकीची आणि चिथावणीखोर माहिती पसरवण्यात अल्पवयीन मुलांचा सहभाग, अंमली पदार्थांचं पोस्टद्वारे समर्थन आणि चाइल्ड पोर्नोग्राफी यासारखे कंटेन्ट ट्विटरला हटवण्यास सांगितले होते. मात्र याकडे कानाडोळा केल्याने अखेर कोर्टाने ट्विटरला दंड ठोठावला आहे. हा दंड ट्विटरला 60 दिवसांच्या भरण्यास सांगितला आहे. मागील महिन्यात रशियाच्या दूरसंचार नियामक रोजकोमनादजोरने ट्विटरवर कारवाईचे संकेत दिले होते. तेव्हापासून ट्विटर वापरावर बंधन येऊ लागली होती. तसेच येत्या दिवसात ट्विटर बंदी घातली जाईल असा इशाराही दिला होता.
डेटा चोरीची भीती? Account डिलीट न करताही तुम्ही सेफ ठेवू शकता Facebook वरची पर्सनल माहितीरशियाचे 2012 सालापासून सोशल मीडियावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी रशियाने सोशल मीडियावरील चुकीची माहिती आणि आक्षेपार्ह पोस्ट ब्लॅकलिस्ट करण्याचा कायदा पारीत केला आहे. त्यानंतर सोशल मीडिया मॅसेजिंग अॅप, वेबसाईट्स यावर चुकीची माहिती पसरविल्याप्रकरणी कारवाई केली जात आहे.
काही दिवसांपूर्वी भारत सरकारने ट्विटरवर कारवाईचा बडगा उचलला होता. चुकीची आणि चिथावणीखेर माहिती पसरवणाऱ्या ट्विटरच्या जवळपास 1 हजार 178 खात्यांवर कारवाई करण्यास सांगितलं होतं. ही खाती पाकिस्तान आमि खलिस्तानशी संबंधित असल्याचं सांगण्यात आलं होतं. केंद्र सरकारच्या वाढत्या दबावानंतर अखेर मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने 97 टक्के खाती बंद केली होती.