जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / रशियाचं Supersonic Bomber विमान ताफ्यात दाखल, NATO सोबत वाद सुरू असताना केलं पहिलं उड्डाण

रशियाचं Supersonic Bomber विमान ताफ्यात दाखल, NATO सोबत वाद सुरू असताना केलं पहिलं उड्डाण

रशियाचं Supersonic Bomber विमान ताफ्यात दाखल, NATO सोबत वाद सुरू असताना केलं पहिलं उड्डाण

युक्रेनवरून रशिया आणि नाटो यांच्यातील तणाव वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर रशियानं आपलं नवं क्षेपणास्त्रवाहू विमान ताफ्यात दाखल केलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मॉस्को, 18 जानेवारी: रशियानं (Russia) नुकतंच व्हाईट स्वॅन सुपरसॉनिक बॉम्बर (White Swan Supersonic Bomber) विमान आपल्या ताफ्यात दाखल केलं आहे. हे विमान पहिल्यांदाच आकाशात झेपावलं असून त्यात लक्ष्याच्या वेध घेण्यासाठी अनेक आधुनिक उपकरणं बसवण्यात आली आहेत. सध्या युक्रेनच्या (Ukraine) मुद्द्यावरून निर्माण झालेल्या रशिया विरुद्ध नाटो (Russia vs Nato) यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर या बॉम्बरचं अनावरण हा रशियानं दिलेला इशारा मानला जात आहे. रशियाकडून दबाव वाढवण्यासाठी या विमानाचा वापर केला जात असल्याची चर्चा आहे.   काय आहे वैशिष्ट्य? ‘Tu-160M व्हाईट स्वॅन बॉम्बर’ असं याचं नाव आहे. क्षेपणास्त्र वाहून नेण्याची अचाट क्षमता असलेल्या या विमानात जुनं तंत्रज्ञान 80 टक्के बदलण्यात आलं आहे. हे विमान 1980 साली रशियन वायूदलाच्या ताफ्यात दाखल झालं होतं. त्या वेळोवळी अनेक तांत्रिक बदल होत गेले. या विमानाच्या मदतीनं हव्या त्या परिसरात पारंपरिक आणि आण्विक शस्त्रास्त्रं डागणं शक्य होणार आहे. एकदा इंधनाची टाकी भरल्यानंतर हे विमान सलग 25 तास हवेत राहू शकतं आणि 25 हजार किलोमीटरपेक्षा अधिक अंतर पार करू शकतं.   तणाव वाढला रशिया आणि नाटो संघटना यांच्यात गेल्या काही दिवसांपासून तणावाचं वातावरण असून युक्रेन मुद्द्यावरून रशिया आक्रमक झाला आहे. युक्रेन आणि युरोपीय देशांची वाढती जवळीक ही रशियासाठी चिंतेचा विषय बनली आहे. युक्रेनला नाटो संघटनेत सभासदत्व मिळू नये, यासाठी रशिया आक्रमक आहे. अमेरिका आणि नाटोनं तसं लेखी आश्वासन आपल्याला द्यावं, अशी मागणी रशियाने केली आहे. आपल्या मागणीसाठी रशियाने दबाव वाढवला असून युक्रेनच्या सीमेवर सैन्यही तैनात करण्यात आलं आहे.   हे वाचा -

इशारे आणि धमक्या रशियानं युक्रेनवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तर आपण निर्बंध लादू, अशी तंबी अमेरिकेनं दिली आहे, तर अमेरिका आणि नाटो देशांनी आपल्याला सात दिवसांत युक्रेनबाबत लेखी आश्वासन द्यावं, अन्यथा परिणामांना सामोरं जावं, असा इशारा युक्रेननं दिला होता. 

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात