मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

अखेर रशियाने युक्रेनवर हल्ला का केला? या महत्त्वाच्या मुद्द्यांमधून घ्या जाणून

अखेर रशियाने युक्रेनवर हल्ला का केला? या महत्त्वाच्या मुद्द्यांमधून घ्या जाणून

रशियाच्या सीमेलगत असलेला युक्रेन हा देश 'नाटो'चा सदस्य होऊ नये, अशी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन (President Vladimir Putin) यांची भूमिका आहे. युक्रेन आणि रशियात तणाव निर्माण होण्यासाठी काही गोष्टी कारणीभूत आहेत. जाणून घ्या काय आहेत यामागची कारणं...

रशियाच्या सीमेलगत असलेला युक्रेन हा देश 'नाटो'चा सदस्य होऊ नये, अशी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन (President Vladimir Putin) यांची भूमिका आहे. युक्रेन आणि रशियात तणाव निर्माण होण्यासाठी काही गोष्टी कारणीभूत आहेत. जाणून घ्या काय आहेत यामागची कारणं...

रशियाच्या सीमेलगत असलेला युक्रेन हा देश 'नाटो'चा सदस्य होऊ नये, अशी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन (President Vladimir Putin) यांची भूमिका आहे. युक्रेन आणि रशियात तणाव निर्माण होण्यासाठी काही गोष्टी कारणीभूत आहेत. जाणून घ्या काय आहेत यामागची कारणं...

पुढे वाचा ...
नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी: युक्रेनला (Ukraine) नाटोचं (NATO) सभासदत्व मिळू नये, यासाठी रशिया (Russia) आक्रमक झाला आहे. 'नाटो'चा पूर्वेकडील विस्तार थांबवण्याची मागणी करत रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे. रशियाच्या सीमेलगत असलेला युक्रेन हा देश 'नाटो'चा सदस्य होऊ नये, अशी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन (President Vladimir Putin) यांची भूमिका आहे. त्यामुळे रशियाने युक्रेनविरोधात यु्द्ध (Russia-Ukraine War) सुरू केलं आहे. यामुळे युरोपमध्ये युद्धाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. युक्रेन आणि रशिया दरम्यानची तणावाची स्थिती पाहता युक्रेनची राजधानी कीवमधल्या भारतीय दूतावासाने (Indian Embassy) तेथील भारतीय नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार, युक्रेनमध्ये राजकीय अनिश्चिततेचे वातावरण आहे. तुम्ही शांतता बाळगावी. घर, हॉटेल्स किंवा रस्त्यात कुठेही असाल तिथं सुरक्षित राहण्याचा सल्ला नागरिकांना देण्यात आला आहे. दरम्यान युक्रेन आणि रशियात तणाव निर्माण होण्यासाठी काही गोष्टी कारणीभूत आहेत. जाणून घ्या काय आहेत यामागची कारणं... हे वाचा-व्लादिमीर पुतिन यांचे विशेष विमान म्हणजे अभेद्य किल्ला! >> 2014 मध्ये रशिया समर्थक राष्ट्रपतींची हकालपट्टी झाल्यावर रशियाने युक्रेनवर हल्ला केला होता. तेव्हापासून आतापर्यंत या संघर्षात 14 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. >> डोनबास क्षेत्रासह पूर्व युक्रेनमधील संघर्ष टाळण्यासाठी रशिया आणि युक्रेनने मिन्स्क शांतता करारावर (Minsk Peace Agreement) स्वाक्षरी केली. परंतु, अजूनही संघर्ष सुरुच असल्याने आम्ही संघर्ष क्षेत्रात शांतता सैनिक पाठवत असल्याचं रशियानं म्हटलं आहे. दुसरीकडे पाश्चिमात्य देशांनी याला 'रशियाने केलेली फसवणूक' असं म्हटलं आहे. >> या दोन्ही देशांदरम्यानचा तणाव कमी व्हावा, यासाठी काही आठवड्यांपूर्वी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) हे मॉस्को येथे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा करण्याकरिता गेले होते. हे वाचा-लष्कर आणि शस्त्रास्त्रांच्या बाबतीत रशिया आणि युक्रेनमध्ये कोणाकडे किती सामर्थ्य >> रशिया दीर्घकाळापासून युरोपियन संघटना, नाटो आणि युरोपियन युनियनच्या दिशेने जाण्याच्या युक्रेनच्या हालचालींचा विरोध करत आहे. >> पुतीन यांनी दावा केला आहे की, 'युक्रेन हा पश्चिमेकडील देशांच्या हातांतील कळसूत्री बाहुली असून, तो कधीही विकसित देश नव्हता.' युक्रेन नाटो (नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन) मध्ये सामील होणार नाही, याची हमी पुतीन यांनी पाश्चिमात्य देशांकडून मागितली आहे. >> पूर्वीच्या सोव्हिएत युनियनमधला (Soviet Union) देश म्हणून युक्रेनचे रशियाशी सामाजिक संबंध आहेत. येथे मोठ्या प्रमाणात रशियन भाषा बोलली जाते. परंतु, रशियाच्या आक्रमणानंतर हे संबंध बिघडले आहेत. >> युरोपियन युनियनच्या सीमेवर रशिया आणि युक्रेनमध्ये सध्या निर्माण झालेली तणावाची स्थिती युरोपियन युनियनसाठी चिंतेची बाब बनली आहे. यामुळेच मोठ्या संख्येने नाटो देशांचा समावेश असलेली युरोपियन युनियन रशियावर निर्बंध लादण्याची घोषणा करत आहे. हे वाचा-युक्रेन सैन्यांच्या शस्त्रांनी भरलेल्या गोदामात Blast, एयरस्पेस ही केलं बंद >> रशियाने केलेल्या हल्ल्याबाबत युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्विटरवर म्हटले आहे की, 'पुतीन यांनी युक्रेनविरूद्ध मोठ्या युद्धाची घोषणा केली आहे. युक्रेनमधल्या शांत शहरांवर हल्ले होत आहेत. हे एक आक्रमक युद्ध आहे. युक्रेन स्वतःचा बचाव करत युद्ध जिंकेल. जगाने पुतीन यांना रोखलं पाहिजे. काहीतरी कृती करण्याची हीच वेळ आहे.'
First published:

Tags: Russia, Russia Ukraine, Ukraine news

पुढील बातम्या