कीव, 4 मे : रशिया आणि युक्रेनमध्ये मागील दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून युद्ध सुरू आहे. (Russia-Ukraine War) यामध्ये युक्रेनचे अनेक सैनिक मारले गेले आहेत. यातच आणखी एक बातमी समोर आली आहे. रशियन सैन्याने मंगळवारी मारियुपोलमधील स्टील प्लांटवर हल्ला (Attack on Mariupol Steel Plant) केला, ज्याला प्रतिकार करण्याचे शेवटचे ठिकाण मानले जाते. युक्रेनच्या सैन्याने ही बातमी दिली. आठवड्याच्या शेवटी प्लांटच्या खाली असलेल्या बंकरमधून डझनभर नागरिक बाहेर काढले गेले. ते सुरक्षित शहरात पोहोचल्यानंतर लगेचच हा हल्ला सुरू झाला.
रशियन सैन्याचा हल्ला
युक्रेनसाठी संयुक्त राष्ट्रसंघाचे (UN) मानवतावादी मदत समन्वयक ओसनात लुबारानी यांनी सांगितले की, बाहेर काढण्याच्या प्रयत्नांमुळे, 101 महिला, पुरुष, मुले आणि वृद्धांना बंकरमधून बाहेर काढण्यात यश आले आहे. जे जोवस्ताल स्टीलवर्क्सच्या (Ajostaal Steelworks) खाली आहे. त्यांनी तेथे दोन महिने आश्रय घेतला होता. मात्र, जे तेथे राहिले त्यांच्यासाठी चांगली बातमी नाही. कारण युक्रेनच्या सैन्याने म्हटले आहे की रशियन सैन्याने प्लांटवर हल्ले सुरू केले आहेत. युक्रेनच्या अझोव्ह रेजिमेंटचे डेप्युटी कमांडर स्वीयात्सलाव पालमर म्हणाले की, रशियन सैन्य चिलखती वाहने आणि टाक्यांच्या मदतीने जोरदार हल्ला करत आहेत.
हे वाचा-पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डॅनिश पंतप्रधान फ्रेडरिकसन यांच्या चर्चेचे साक्षीदार बनले मेरीनबर्ग
युक्रेनचे उपपंतप्रधान इरयाना वेरेशचुक यांनी सांगितले की, प्लांटमध्ये किती युक्रेनियन सैनिक लपले आहेत हे माहित नाही. परंतु रशियन अंदाजानुसार एका आठवड्यापूर्वी ही संख्या 2,000 होती आणि त्यापैकी 500 जखमी झाल्याचे वृत्त आहे. तसेच शेकडो नागरिकही तेथे आहेत.
हे वाचा-2 लाख मुलांसह 11 लाख युक्रेनियन नागरिक युद्धकैदी? सर्वांना रशियाला नेल्याचा दावा
रशियासाठी मारियुपोलवरील विजय का आहे महत्त्वाचा?
रशियाने मारियुपोल ताब्यात घेणं म्हणजे युक्रेनच्या युद्धातील विजयासारखं आहे, असं विश्लेषकांचं म्हणणं आहे. तज्ज्ञांच्या मते, अझोव्ह समुद्राच्या किनार्यावरील युक्रेनचं मारियुपोल हे बंदराचं शहर ताब्यात घेतल्यानं रशियाला त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या क्रिमियापासून डोनेस्तक प्रजासत्ताकपर्यंतचा भूमार्ग उपलब्ध होईल. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी युक्रेनवर हल्ला करण्यापूर्वी डोनेस्तक आणि लुहान्स्क प्रजासत्ताकांना स्वतंत्र प्रदेश म्हणून मान्यता दिली. अशा स्थितीत मारियुपोल ताब्यात घेणं ही रशियाच्या दृष्टीने मोठी बाब आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Russia, Russia Ukraine, Ukraine news, War