पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं डेन्मार्कमध्ये आगमन होताच जंगी स्वागत करण्यात आलं. पंतप्रधान मेट्टे फ्रेडरिकसन आणि इतर लोक विमानतळावर उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान मेट्टे फ्रेडरिकसन त्यांच्या 18 व्या शतकातील अधिकृत निवासस्थान मेरीनबोर्ग येथे. फिरताना त्यांच्यात चर्चा झाली.
मोदींना डॅनिश पंतप्रधानांनी त्यांच्या मेरीनबोर्ग येथील शासकीय निवासस्थानी भेट दिली. त्यांनी तिथे लावलेले ओडिशातील एक पट्टचित्र पाहिले, ज्यामध्ये राम दरबाराचे चित्र होते. हे चित्र मोदींनी गेल्या वर्षी भारत दौऱ्यावर असताना फ्रेडरिकसन यांना भेट म्हणून दिलं होतं.
फ्रेडरिकसन म्हणाल्या, 'मला तुम्हाला सांगायचं आहे की, राजकारणी नेत्याला कसं अभिवादन करावं, हे तुम्हाला खरोखर माहित आहे. कृपया डॅनिश लोकांना ते कसं केलं जातं ते शिकवा.'
मोदींनी ट्विटरवर म्हटले आहे की, “पंतप्रधान फ्रेडरिकसेन यांच्याशी चांगल्या प्रकारे संभाषण करण्यासाठी मारिनबर्गमध्ये योग्य जागा उपलब्ध करून देण्यात आली. भारत-डेन्मार्क संबंध अधिक दृढ करण्यासाठी आम्ही व्यापक चर्चा केली.