मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

जेव्हा पंतप्रधानच वाहतुकीचे नियम मोडतात! ऋषी सुनक यांना सीटबेल्ट न लावणं महागात पडलं

जेव्हा पंतप्रधानच वाहतुकीचे नियम मोडतात! ऋषी सुनक यांना सीटबेल्ट न लावणं महागात पडलं

ब्रिटनमध्येही वाहतुकीचे नियम खूप कडक आहेत. भारतीय वंशाचे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना धावत्या कारमध्ये सीटबेल्ट न लावल्याने दंड ठोठावण्यात आला आहे, यावरून तिथल्या वाहतुकीच्या नियमांचा अंदाज तुम्हाला लावता येईल

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

लंडन 21 जानेवारी : रस्ते अपघात टाळण्यासाठी आणि वाहन चालकांच्या सुरक्षेसाठी वाहतुकीचे नियम असतात. पण, बऱ्याचदा या नियमांचं सर्रासपणे उल्लंघन होताना दिसतं. ब्रिटनमध्येही वाहतुकीचे नियम खूप कडक आहेत. भारतीय वंशाचे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना धावत्या कारमध्ये सीटबेल्ट न लावल्याने दंड ठोठावण्यात आला आहे, यावरून तिथल्या वाहतुकीच्या नियमांचा अंदाज तुम्हाला लावता येईल. ऋषी सुनक स्वतः गाडी चालवत नव्हते, ते मागच्या सीटवर बसले होते, तरीही त्यांना दंड ठोठावण्यात आला आहे. ते धावत्या कारमध्ये सोशल मीडियासाठी व्हिडिओ बनवत होते. त्यांचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर ब्रिटनमधील पोलिसांनी कारवाई केली आहे. या संदर्भात ‘नवभारत टाइम्स’ने वृत्त दिलंय.

पंतप्रधान ऋषी सुनक यांचे निवासस्थान, 10 डाउनिंग स्ट्रीटमधून या संदर्भात एका निवेदन देण्यात आलंय. “ऋषी सुनक यांनी त्यांची चूक मान्य केली आहे आणि माफी मागितली आहे. ते दंड भरण्यास तयार आहेत," असं त्यात म्हटलंय. दरम्यान, ब्रिटनमध्ये जर एखाद्या प्रवाशाने सीट बेल्ट लावला नाही तर त्याला 10,000 रुपयांचा दंड आकारला जातो. तसेच हे प्रकरण कोर्टात गेल्यास त्याला 50,000 हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. ऋषी सुनक यांनी हा व्हिडिओ बनवला तेव्हा ते उत्तर इंग्लंडमधील लँकेशायरमध्ये होते. व्हिडिओमध्ये, सुनक सरकारच्या 'लेव्हलिंग अप' खर्चाच्या नव्या फेरीचा प्रचार करताना दिसत होते.

ऋषी सुनक यांना दुसऱ्यांदा ठोठावला दंड

सरकारमध्ये असताना ऋषी सुनक यांनी दंड भरण्याची ही पहिली नव्हे तर दुसरी वेळ आहे. जून 2020 मध्ये डाउनिंग स्ट्रीट इथं तत्कालीन पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या वाढदिवसाच्या पार्टीला उपस्थित असताना कोरोना व्हायरस नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांना दंड ठोठावण्यात आला होता. फिक्स पेनल्टी नोटीस आल्यानंतर 28 दिवसांच्या आत दंड भरावा लागतो, किंवा त्या विरोधात कोर्टात आव्हान द्यावं लागतं. या प्रकरणी कोणी कोर्टात गेल्यास पोलीस प्रकरणाचा आढावा घेतात आणि दंड मागे घ्यायचा की न्यायालयात लढा द्यायचा, हे ठरवतात.

आश्चर्य! 60 वर्षात पहिल्यांदाच चीनच्या लोकसंख्येत घट; भारत सर्वाधिक लोकसंख्येच्या मार्गावर

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान झाले खूश

भारतीय वंशाचे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना दंड ठोठावण्यात आला आहे. याबद्दल पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्विट केलंय. 'हे कायद्याचे राज्य आहे, इथे कायद्यापेक्षा वर कोणीही नाही. हाच श्रीमंत आणि गरीब देशांमधील फरक आहे. एनआरओ नाही, कोणत्याही शक्तिशाली व्यक्तीवर ट्विट करण्यासाठी अटक नाही आणि कमकुवत न्याय व्यवस्थाही नाही. न्याय हा रियासत-ए-मदीनाचा आधार आहे,' असं इम्रान खान यांनी ट्विटमध्ये लिहिलंय.

First published:

Tags: Traffic Rules