माद्रिद, 20 ऑक्टोबर : ज्वालामुखीच्या उद्रेकापाशी अडकून पडलेल्या (Rescue of a dog trapped near volcano by drone) एका कुत्र्याची सुटका करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. स्पेनच्या केनरी आयलंडवर ज्वालामुखीचा (Volcano in Canary island in Spain) उद्रेक झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून या ज्वालामुखीतून ज्वालारस बाहेर पडत असून परिसरात तो पसरू लागला आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकाला सुरुवात झाल्यानंतर या परिसरातील (All citizens shifted to safer place) सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. मात्र एक कुत्रा त्याच परिसरात अडकून पडल्याचं दिसून आलं आहे.
कुत्र्याच्या सुटकेसाठी प्रयत्न
कुत्रा जर लावारसाच्या संपर्कात आला, तर भाजून आणि जळून त्याचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे या कुत्राला लवकरात लवकर त्या ठिकाणाहून उचलून सुरक्षित स्थळी आणण्यासाठी सरकारी यंत्रणा प्रयत्नशील आहेत. त्यासाठी स्पॅनिश कंपनीनं ड्रोनच्या माध्यमातून कुत्र्याला उचलण्याचा प्लॅन तयार केला आहे. यापूर्वी हेलिकॉप्टरच्या मदतीनं कुत्र्याची सुटका करण्याचा प्लॅन तयार करण्यात आला होता. मात्र या परिसरात लावारस असल्यामुळे कमालीची उष्णता असून हेलिकॉप्टरला खाली उतरताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे हेलिकॉप्टरचा प्लॅन रद्द करून त्याऐवजी ड्रोनचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अशी होणार सुटका
ड्रोनच्या माध्यमातून कुत्र्याच्या सुटकेचा प्रयत्न कितपत यशस्वी होईल, याविषयी अनेकांना शंका आहेत. ड्रोन उडाल्यापासून तो परत येईपर्यंतची सर्व प्रक्रिया केवळ 4 मिनिटांत पूर्ण करावी लागणार आहे. या ऑपरेशनला अधिक वेळ लागला, तर ड्रोनची बॅटरी संपून कुत्र्याच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. दुसरं म्हणजे या ड्रोनला कुत्रा कसा प्रतिसाद देईल, याबाबतही साशंकता आहे. ड्रोन पाहून कुत्रा दूर पळाला, तर या रेस्क्यु ऑपरेशनमध्ये नवं आव्हान निर्माण होऊ शकतं.
हे वाचा- चमत्कारच! डुकराच्या किडनीचे माणसाच्या शरीरात यशस्वी प्रत्यारोपण, संशोधकांना यश
नवा इतिहास
ड्रोनच्या माध्यमातून एखाद्या कुत्र्याची सुटका होणं, ही जगाच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. हे ऑपरेशन यशस्वी झालं, तर तो एक नवा विश्वविक्रम असणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.