मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /चमत्कारच! डुकराच्या किडनीचे माणसाच्या शरीरात यशस्वी प्रत्यारोपण, संशोधकाचं सर्वात मोठं यश

चमत्कारच! डुकराच्या किडनीचे माणसाच्या शरीरात यशस्वी प्रत्यारोपण, संशोधकाचं सर्वात मोठं यश

ही किडनी देखील व्यवस्थित काम करत आहे. शास्त्रज्ञांच्या या प्रत्यारोपणाकडे एक मोठा शोध म्हणून पाहिले जात आहे. यामुळे भविष्यात प्राण्यांचे अवयव वापरून मानवी जीव वाचवण्याची शक्यता वाढली आहे.

ही किडनी देखील व्यवस्थित काम करत आहे. शास्त्रज्ञांच्या या प्रत्यारोपणाकडे एक मोठा शोध म्हणून पाहिले जात आहे. यामुळे भविष्यात प्राण्यांचे अवयव वापरून मानवी जीव वाचवण्याची शक्यता वाढली आहे.

ही किडनी देखील व्यवस्थित काम करत आहे. शास्त्रज्ञांच्या या प्रत्यारोपणाकडे एक मोठा शोध म्हणून पाहिले जात आहे. यामुळे भविष्यात प्राण्यांचे अवयव वापरून मानवी जीव वाचवण्याची शक्यता वाढली आहे.

न्यूयॉर्क, 20 ऑक्टोबर : अमेरिकेतील शास्त्रज्ञांना तात्पुरते डुकराचे मूत्रपिंड (किडनी) मानवी शरीराशी जोडण्यात यश आलं (Pig kidney transplant in human) आहे. एवढेच नाही तर ही किडनी देखील व्यवस्थित काम करत आहे. शास्त्रज्ञांच्या या प्रत्यारोपणाकडे एक मोठा शोध म्हणून पाहिले जात आहे. यामुळे भविष्यात प्राण्यांचे अवयव वापरून मानवी जीव वाचवण्याची शक्यता वाढली आहे. मात्र, या प्रकरणातील सविस्तर अहवालाची अद्याप प्रतीक्षा आहे.

हे प्रकरण आहे न्यूयॉर्क, अमेरिकेतील. रॉयटर्सच्या अहवालानुसार, न्यूयॉर्क शहरातील NYU Langen हेल्थ सेंटर (NYU) येथील डॉक्टरांच्या तज्ज्ञ टीमने ही शस्त्रक्रिया केली. ही शस्त्रक्रिया अत्यंत टप्प्याटप्प्याने करण्यात आली आहे. त्याची तयारी देखील अतिशय ठोस पद्धतीने करण्यात आली होती. मूत्रपिंड प्रत्यारोपणापूर्वी, डुकराचे जनुक बदलले गेले जेणेकरून मानवी शरीर ताबडतोब त्याचे अवयव नाकारू शकणार नाही.

अहवालानुसार ही प्रत्यारोपण प्रक्रिया ब्रेन डेड रुग्णावर करण्यात आली. रुग्णाच्या किडनीने काम करणे बंद केले होते, परंतु, त्याला लाइफ सपोर्टमधून काढून टाकण्यापूर्वी डॉक्टरांनी त्यांच्या कुटुंबीयांकडून या चाचणीसाठी परवानगी मागितली होती, त्यानंतर त्यांनी हा प्रयोग केला. तीन दिवसांपर्यंत डुकराचे मूत्रपिंड (Pig kidney) ब्रेन डेड रुग्णाच्या रक्तवाहिन्यांशी जोडलेले होते. हे मूत्रपिंड शरीराबाहेर ठेवले होते.

हे वाचा - T20 World Cup मधला Sixer King कोण? कोणाच्या नावावर सर्वाधिक रन आणि विकेट? पाहा सगळी Records

डॉक्टरांनी प्रत्यारोपणाची ही संपूर्ण प्रक्रिया सामान्य असल्याचे म्हटले आहे. दुसर्‍या प्राण्याचे मूत्रपिंड मानवी शरीरात यशस्वीपणे प्रत्यारोपित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. जरी यापूर्वी अनेक चाचण्या झाल्या आहेत, परंतु प्रत्येक वेळी प्रत्यारोपण अयशस्वी झाले. अमेरिकन डॉक्टरांचे हे यश मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या दिशेने वरदान ठरू शकते.

हे वाचा - या देशात पुन्हा सुरू झाला Corona virus चा हाहाकार; दररोज 1000 हून अधिक रुग्णांचा मृत्यू, चिंताजनक स्थिती

किडनी प्रत्यारोपणाची सरासरी प्रतीक्षा सुमारे 3 ते 5 वर्षे असते, असेही अहवालात नमूद केले आहे. जगभरात एक लाखाहून अधिक लोक अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत. यामध्ये देखील सुमारे 90 हजार असे लोक आहेत, ज्यांना फक्त किडनी प्रत्यारोपण हवे आहे.

First published:
top videos

    Tags: Health, Kidney sell, Research