नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर : अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा (Barack Obama) यांनी आपल्या नव्या पुस्तकात, कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांचा उल्लेख केला आहे. ओबामा यांनी ‘ए प्रॉमिसिड लँड’ (A promised Land) या आपल्या आत्मचरित्रात कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना चिंताग्रस्त आणि कमी योग्यतेचे असे वर्णन केले आहे. ओबामांनी राहुल हे चिंताग्रस्त आणि स्वत:बाबत अपरिपक्व असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी आपल्या पुस्तकात राहुल गांधींची तुलना एका विद्यार्थ्याशी केली आहे, ज्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे जो शिक्षकांनाही प्रभावित करतो मात्र या विषयात प्राविण्य मिळवण्याची त्याच्याकडे योग्यता नाही आहे किंवा आवड नाही आहे. याखेरीज माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा उल्लेख करताना ते म्हणाले की, त्यांच्यात एक प्रकारची खोल निष्ठा आहे. वाचा- कमला हॅरिसनंतर भारतातील आणखी एका लेक अमेरिकेत मोठ्या पदी पुतिन आणि बायडन यांचाही उल्लेख ओबामा यांच्या पुस्तकातील अंशांचा उल्लेख नायजेरियाच्या लेखक चिमांडा नोगजी आदिचि यांनी आपल्या ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ मध्ये प्रकाशित केलेल्या पुस्तक समीक्षेत आहे. राहुल गांधी आणि मनमोहन सिंग यांच्या व्यतिरिक्त या पुस्तकात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष जो बायडन यांचाही उल्लेख आहे. बराक ओबामा यांचे पुस्तक त्यांच्या वैयक्तिक जीवनापेक्षा त्यांच्या राजकीय भूमिकेवर अधिक केंद्रित आहे. अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी राजकारणाच्या त्यांच्या सुरुवातीच्या काळापासून ओसामा बिन लादेनच्या हत्येपर्यंत अनेक मुद्द्यांविषयी लिहिले आहे. वाचा- सत्ताबदल करण्यासाठी ट्रम्प यांची आणखी एक चाल, पेंटागॉनमध्ये केले बदल 2017 मध्ये राहुल गांधी यांची भेट घेतली महत्त्वाची बाब म्हणजे 2017 मध्ये बराक ओबामा जेव्हा भारत दौर्यावर आले तेव्हा त्यांनी राहुल गांधींची भेट घेतली. बराक ओबामा यांची भेट घेतल्यानंतर राहुल यांनी ट्वीट केले की, ‘माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी माझी चर्चा झाली. पुन्हा एकदा त्यांना भेटून छान वाटले’. (नीरज कुमारचा रिपोर्ट)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.